lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > नितळ त्वचेसाठी किती पैसे खर्च कराल? कडुनिंबाच्या फेसपॅकनं मिळेल मनासारखं सौंदर्य 

नितळ त्वचेसाठी किती पैसे खर्च कराल? कडुनिंबाच्या फेसपॅकनं मिळेल मनासारखं सौंदर्य 

नुसते भारंभार ब्यूटी प्रोड्क्टस वापरुन सौंदर्य मिळत नाही. त्यासाठी नेमका एकच उपाय करायला हवा. कडुनिंबाच्या लेपानं (neem face pack for clear skin) त्वचेच्या अनेक समस्या सहज सुटतात. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 06:55 PM2022-07-09T18:55:46+5:302022-07-09T19:04:04+5:30

नुसते भारंभार ब्यूटी प्रोड्क्टस वापरुन सौंदर्य मिळत नाही. त्यासाठी नेमका एकच उपाय करायला हवा. कडुनिंबाच्या लेपानं (neem face pack for clear skin) त्वचेच्या अनेक समस्या सहज सुटतात. 

Use neem face pack for clear skin. Easy home remedy for natural beauty | नितळ त्वचेसाठी किती पैसे खर्च कराल? कडुनिंबाच्या फेसपॅकनं मिळेल मनासारखं सौंदर्य 

नितळ त्वचेसाठी किती पैसे खर्च कराल? कडुनिंबाच्या फेसपॅकनं मिळेल मनासारखं सौंदर्य 

Highlights त्वचा संवेदनशील असू देत नाही तर कोरडी किंवा तेलकट .. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी कडुनिंबाचा फेसपॅक फायदेशीर ठरतो. कडुनिंबाच्या लेपानं त्वचेचा पोत सुधारतो. 

त्वचा स्वच्छ होण्यासाठी, चेहेऱ्यावरील मुरुम, पुटकुळ्या, डाग, काळपटपणा निघून जाण्यासाठी किती प्रकारचे ब्यूटी प्रोडक्टस वापरले जातात. यात कितीतरी पैसे खर्च होतात पण मनासारखी नितळ त्वचा हे स्वप्नच राहातं. ब्यूटी  प्रोड्क्टस वापरुन नितळ त्वचेचं स्वप्न पूर्ण होवू शकत नाही त्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर करुन उपाय करायला हवेत ( natural remedy for beauty)  असं सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात. यासाठी सोप्यात सोपा उपाय म्हणजे कडुनिंबाचा फेसपॅक (neem face pack) . या एका उपायानं त्वचेस अनेक लाभ (neem face pack  for clear skin) मिळतात. 

Image: Google

कडुनिंबाच्या लेपाचे फायदे

1. त्वचा संवेदनशील असली, त्वचेला कसली ॲलर्जी होत असल्यास त्वचेला कडुनिंबाचा लेप लावणं हा फायदेशीर उपाय आहे. 

2. तेलकट आणि कोरड्या त्वचेसाठीही कडुनिंबाच्या लेपाचा वापर करता येतो. 

3. कडुनिंबाच्या लेपामुळे त्वचेचा पोत सुधारतो. कडुनिंबात ॲण्टिऑक्सिडण्ट गुणधर्म असतात. यामुळे चेहेऱ्यावरील काळे डाग, काळपटपणा, खराब त्वचा निघून जावून त्वचा स्वच्छ दिसते. 

4. कडुनिंबात असलेल्या जिवाणुविरोधी गुणधर्मामुळे चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या कमी होतात. कडुनिंबाच्या लेपामुळे त्वचेवर त्वचेस हानिकारक जिवाणुंची निर्मिती होत नाही. 

5. कडुनिंबाच्या लेपानं चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या निघून जातात. त्वचा कोरडी पडत नाही. तसेच त्वचेला येणारी खाजही कमी होते. 

6. ब्लॅकहेडस, व्हाइटहेडस काढण्यासाठी महागड्या स्क्रबची आवश्यकता नाही. कडुनिंबाच्या लेपानं ब्लॅकहेड्स , व्हाइटहेड्स सहज निघून जातात. 

7. कडुनिंबाच्या लेपामुळे त्वचेवर अतिरिक्त तेलाची निर्मिते होवून चेहेरा तेलकट दिसत नाही. तसेच चेहेऱ्यावरील उघडी रंध्रं बंद होण्यास मदत होते. 

Image: Google

Image: Google

कडुनिंबाचा लेप कसा तयार करावा?

त्वचेस अनेक फायदे देणारा कडुनिंबाचा लेप तयार करण्यासाठी 1 चमचा कडुनिंबाची पावडर, 2 चमचे कोरफड जेल घ्यावं. कडुनिंबाची पावडर बाहेर आयुर्वेदिक औषधांच्या द्कानात चांगल्या गुणवत्तेची मिळते. घरीही कडुनिंबाची पावडर तयार करता येते. यासाठी कडुनिंबाची पानं धुवून सुकवून घ्यावीत. सुकलेली कडुनिंबाची पानं मिक्सरमधून बारीक वाटून घेऊन त्याची पावडर तयार करावी. 
कडुनिंबाचा लेप तयार करण्यासाठी एका वाटीत 1 चमचा कडुनिंब पावडर आणि 2 चमचे कोरफडचा गर/ जेल घ्यावा. दोन्ही गोष्टी एकत्र नीट मिसळून घेऊन लेप तयार करावा.

Image: Google

कडुनिंबाचा लेप चेहेऱ्यास लावण्यापूर्वी चेहेरा गुलाब पाण्यानं स्वच्छ करुन घ्यावा. नंतर कडुनिंबाचा लेप चेहेऱ्यावर हलक्या हातानं मसाज करत लावावा. लेप लावल्यानंतर 15 मिनिटांनी चेहेरा थंडं पाण्यानं धुवावा. चेहेरा सूती रुमालानं टिपून घ्यावा. 
 

Web Title: Use neem face pack for clear skin. Easy home remedy for natural beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.