lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > सौंदर्य खुलवण्यासाठी असा करा बेसनपिठाचा वापर, उपाय एक फायदे अनेक.

सौंदर्य खुलवण्यासाठी असा करा बेसनपिठाचा वापर, उपाय एक फायदे अनेक.

सौंदर्यतज्ञ्ज्ञ म्हणतात स्वयंपाकघरात जसं बेसनपीठ महत्त्वाचं आहे तसंच सौंदर्यसाधनेतही बेसनपीठ तितकंच महत्त्वाचं आणि परिणामकारक आहे . फार पूर्वीपासून बेसनपिठाचा उपयोग अंगावरील मळ काढण्यासाठी स्क्रबर म्हणून केला जातो. पण त्वचा निरोगी राहाण्यासाठी आणि नैसर्गिकपणे चमकण्यासाठीही बेसनपीठ हे उपयुक्त आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 03:34 PM2021-06-10T15:34:40+5:302021-06-10T15:38:24+5:30

सौंदर्यतज्ञ्ज्ञ म्हणतात स्वयंपाकघरात जसं बेसनपीठ महत्त्वाचं आहे तसंच सौंदर्यसाधनेतही बेसनपीठ तितकंच महत्त्वाचं आणि परिणामकारक आहे . फार पूर्वीपासून बेसनपिठाचा उपयोग अंगावरील मळ काढण्यासाठी स्क्रबर म्हणून केला जातो. पण त्वचा निरोगी राहाण्यासाठी आणि नैसर्गिकपणे चमकण्यासाठीही बेसनपीठ हे उपयुक्त आहे.

Use gram flour to reveal beauty, one of the many benefits of the remedy. | सौंदर्य खुलवण्यासाठी असा करा बेसनपिठाचा वापर, उपाय एक फायदे अनेक.

सौंदर्य खुलवण्यासाठी असा करा बेसनपिठाचा वापर, उपाय एक फायदे अनेक.

Highlightsबेसनपिठास सुपर क्लीन्जर म्हटलं जातं. बेसनपिठ चेहेऱ्यास लावून त्वचेवरच्या मृतपेशी काढून टाकता येतात.बेसनपिठानं चेहेऱ्यावर मसाज केल्यास चेहेऱ्यावरचे केस कमी होतात.उन्हामुळे चेहेऱ्यावर काळेपणा येतो, काळे डाग पडतात. ते काढून टाकण्यासाठी बेसनपिठाचा उपयोग होतो.

 बेसनपीठ हा स्वयंपाकातला अतिशय महत्त्वाचा घटक. साधे पदार्थ, चमचमीत पदार्थ, भाज्या, आमट्या, धिरडे, गोडाचे पदार्थ अशा विविध पदार्थांसाठी बेसनपीठ हे लागतंच. सौंदर्यतज्ञ्ज्ञ म्हणतात स्वयंपाकघरात जसं बेसनपीठ महत्त्वाचं आहे तसंच सौंदर्यसाधनेतही बेसनपीठ तितकंच महत्त्वाचं आणि परिणामकारक आहे . फार पूर्वीपासून बेसनपिठाचा उपयोग अंगावरील मळ काढण्यासाठी स्क्रबर म्हणून केला जातो. पण त्वचा निरोगी राहाण्यासाठी आणि नैसर्गिकपणे चमकण्यासाठीही बेसनपीठ हे उपयुक्त आहे. बेसनपिठाच्या उपयोगानं त्वचा कोरडी पडते अशी अनेकांची तक्रार असते. पण बेसनपीठ त्वचेसाठी वापरताना इतर घटकही त्यात समाविष्ट करावे लागतात. त्यात काही चूक झाली तर मग त्वचा कोरडी होण्याच्या समस्या उद्भभवतात. त्वचेचं सौंदर्य वाढवणारं हे बेसनपीठ आपण कसं वापरतो, कशा सोबत वापरतो याला खूप महत्त्व आहे.

त्वचेसाठी बेसनपीठ कसं वापराल?

चेहेऱ्याच्या त्वचेवर मृतपेशी वाढल्या की त्वचा निर्जिव दिसायला लागते. या मृत पेशी त्वचेवरच्या छिद्रांना झाकून टाकतात . त्याचा परिणाम म्हणजे चेहेऱ्यावर मुरुम -पुटकुळ्या येतात. ब्लॅकहेडस येतात. या समस्या घालवण्यासाठी बेसनपीठ वापरावं. बेसनपिठास सूपर क्लीन्जर म्हटलं जातं. बेसनपीठ चेहेऱ्यास लावून त्वचेवरच्या मृतपेशी काढून टाकता येतात. त्यासाठी बेसनाचा लेप करावा. त्यासाठी बेसनपीठ, तांदळाचं पीठ, मक्याचं पीठ आणि दूध घ्यावं. हे सर्व जिन्नस एकत्र करावं. हा लेप किमान दहा मिनिटं हलक्या हातानं मसाज करत चेहेऱ्यास लावावा.नंतर पाण्यानं चेहेरा स्वच्छ करावा.

  • बेसनपिठानं चेहेऱ्यावर मसाज केल्यास चेहेऱ्यावरचे केस कमी होतात. चेहेऱ्यावरचे केस कमी करण्यासाठी बेसनपीठ वापरायचं असेल तर आधी चेहेऱ्याला वाफ घ्यावी. यामुळे त्वचेवरची रंध्र मोकळी होतात. बेसनपिठाने चेहेरा घासल्यास अनेकांचा चेहेरा सुजतो. ही समस्या उद्भभवू नये यासाठी वाफ घ्यावी. आणि मग बेसनपिठाचा लेप करावा. त्यासाठी बेसनपीठ, हळद, मोहरीचं तेल, कोरफडीचा गर आणि लवेण्डर तेल घ्यावं. हे सर्व एकत्र करुन त्याचा लेप करावा. हा लेप चेहेऱ्यावर जिथे जास्त केस आहेत तिथे लावावा. लेप सुकल्यानंतर एक ओला कपडा घ्यावा आणि केसांच्या विरुध्द दिशेनं तो घासावा. आठवड्यातून दोन तीन वेळेस हा उपाय केल्यास चेहेऱ्यावरचे नकोसे केस कमी होतात.
  •  उन्हामुळे चेहेऱ्यावर काळेपणा येतो, काळे डाग पडतात. ते काढून टाकण्यासाठी बेसनपिठाचा उपयोग होतो. बेसनपिठाच्या उपयोगानं चेहेऱ्याच्या त्वचेचा पोत सुधारतो. बेसनपिठात क्लींजिगचे गुणधर्म असल्यानं चेहेऱ्यास चमक येते. चेहेरा उजळ आणि तजेलदार करण्यासाठी बेसनाचा लेप उपयोगी पडतो. यासाठी बेसनपीठ, लिंबाचा रस, दही आणि हळद घ्यावी. सर्व जिन्नस चांगलं एकत्र करावं. हा लेप आपल्या चेहेऱ्यास आणि मानेला लावावा. लेप पूर्ण सुकला की थंड पाण्यानं धुवावा. चेहेरा उजळवण्यासाठी हा लेप रोज लावला तर परिणामकारक ठरतो.

  •  बेसनपिठात झिंक असतं. त्याचा उपयोग चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या जाण्यास होतो. यासाठी बेसनाचा लेप करताना बेसनपीठ, हळद, ताजं दूध घ्यावं. ते एकत्र करावं. हा लेप चेहेरा आणि मानेस लावावा. वीस पंचवीस मिनिटांनी कोमट पाण्यानं चेहेरा धुवावा. जोपर्यंत चेहेऱ्यावरच्या मुरुम पुटकुळ्या जात नाही तोपर्यंत हा उपाय सुरु ठेवावा.
  • त्वचा तेलकट ही जन्मत: किंवा संप्रेरकांमधे झालेल्या बदलांनी तेलकट होवू शकते. तेलकट त्वचा अनेक समस्यांना आमंत्रण देते आणि चेहेरा खराब होतो. तेलकट त्वचेची समस्या घालवण्यासाठी बेसनपिठाचा उपयोग होतो. बेसनातील सुपर क्लींजींग गुणधर्मामुळे चेहेरा स्वच्छ होतो. तेलकट त्वचेसाठी बेसनाचा लेप वापरताना बेसनपीठ आणि गुलाब पाणी घ्यावं. ते एकत्र करावं. वीस मिनिटानंतर लेप सुकला की गार पाण्यानं चेहेरा धुवावा. रोज हा उपाय केल्यास त्वचेचा तेलकटपणा जातो आणि चेहेर सुंदरही होतो.

Web Title: Use gram flour to reveal beauty, one of the many benefits of the remedy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.