Lokmat Sakhi >Beauty > आवळ्याची आणि जास्वंदाची पूड सातत्याने वापरा, पाहा केस आणि त्वचेवर काय होते जादू, पाहा कधी वापरायची

आवळ्याची आणि जास्वंदाची पूड सातत्याने वापरा, पाहा केस आणि त्वचेवर काय होते जादू, पाहा कधी वापरायची

Use amla and hibiscus powder regularly, see what magic happens to your hair and skin, see when to use it : जास्वंद आणि आवळ्याची पूड वापरणे फार फायद्याचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2025 13:04 IST2025-09-15T13:03:34+5:302025-09-15T13:04:55+5:30

Use amla and hibiscus powder regularly, see what magic happens to your hair and skin, see when to use it : जास्वंद आणि आवळ्याची पूड वापरणे फार फायद्याचे.

Use amla and hibiscus powder regularly, see what magic happens to your hair and skin, see when to use it | आवळ्याची आणि जास्वंदाची पूड सातत्याने वापरा, पाहा केस आणि त्वचेवर काय होते जादू, पाहा कधी वापरायची

आवळ्याची आणि जास्वंदाची पूड सातत्याने वापरा, पाहा केस आणि त्वचेवर काय होते जादू, पाहा कधी वापरायची

सौंदर्य जपण्यासाठी महिला अनेकविध पर्याय करुन पाहतात. मात्र काहीच फायदा होत नाही. अनेकदा महागड्या ट्रिटमेंट्स जे करु शकत नाही ते आपल्या घरात असणाऱ्या साध्या गोष्टी शकतात. (Use amla and hibiscus powder regularly, see what magic happens to your hair and skin, see when to use it)सौंदर्य टिकवण्यासाठी जर तुम्हीही विविध उपाय करता तर एकदा घरी जास्वंद पूड आणि आवळा पूड आणून नक्की वापरुन पाहा. अगदी साधा उपाय आहे मात्र त्वचा आणि केस एकदम सुंदर होतील.  

आवळा पूड आणि जास्वंदाची पूड या दोन्ही आयुर्वेदीकदृष्ट्या अतिशय गुणकारी मानल्या जातात. आवळा म्हणजेच भारतीय आवळा (Indian Gooseberry) हे जीवनसत्त्व सी, अँटी ऑक्सिडंट्स, लोह, कॅल्शियम आणि फायबरने समृद्ध असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते, रक्तशुद्धी होते तसेच शरीरातील सूज आणि थकवा कमी होतो. आवळा पूड नियमित सेवन केल्यास यकृताची कार्यक्षमता सुधारते. साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. दुसरीकडे जास्वंदाची पूड (Hibiscus Powder) ही अँथोसायनिन्स, फ्लॅव्होनॉइड्स, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व ए आणि सी तसेच अमिनो ॲसिड्सने भरलेली असते. ही पूड रक्तशुद्धी, रक्तदाब नियंत्रण आणि पचन सुधारण्यास मदत करते तसेच शरीराला थंडावा देते.

या दोन्ही पावडरींचा वापर आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही मोठ्या प्रमाणावर केला जातो. आवळा पूड पाण्यात किंवा खोबरेल तेलात मिसळून केसांना लावल्यास केसांना मजबुती, चमक आणि अकाली पांढरे होण्यापासून संरक्षण देते. जास्वंदाची पूड केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर आहे. ती लावल्याने केसांची गळती कमी होते, केस मऊ व दाट होतात. त्वचेसाठी आवळा पूड फेसपॅकमध्ये वापरल्यास त्वचा उजळते आणि डाग कमी होतात.

जास्वंद केसांसाठी फार पोषक असते. जास्वंदाचे फुल कायम मिळणे आणि ते वापरणे जर कठीण जाते तर घरी जास्वंदाची पूड आणून ठेवा. जास्वंदाची पूड त्वचेला ओलावा देते. या दोन्ही पावडरींचा नियमित व योग्य वापर केल्यास आरोग्य, त्वचा व केस यांच्यात नैसर्गिक बदल जाणवतो. केसांसाठी या दोन्ही गोष्टी फारच औषधी आहेत. 

Web Title: Use amla and hibiscus powder regularly, see what magic happens to your hair and skin, see when to use it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.