Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावर सुरकुत्या इतक्या की ऐन पंचविशीत चेहऱ्यावर चाळिशी दिसते? तुरटी ‘अशी’ लावा, तारुण्य येईल परत

चेहऱ्यावर सुरकुत्या इतक्या की ऐन पंचविशीत चेहऱ्यावर चाळिशी दिसते? तुरटी ‘अशी’ लावा, तारुण्य येईल परत

Alum For Wrinkles : ३० वयातच सुरकुत्या दिसू लागल्यानं अकाली म्हातारे दिसण्याचं ओझं वाहावं लागतं. पण आपली ही समस्या दूर करण्यासाठी तुरटी फायदेशीर ठरू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 19:40 IST2025-07-04T15:34:21+5:302025-07-04T19:40:01+5:30

Alum For Wrinkles : ३० वयातच सुरकुत्या दिसू लागल्यानं अकाली म्हातारे दिसण्याचं ओझं वाहावं लागतं. पण आपली ही समस्या दूर करण्यासाठी तुरटी फायदेशीर ठरू शकते.

To get wrinkle free skin use alum know how to use it | चेहऱ्यावर सुरकुत्या इतक्या की ऐन पंचविशीत चेहऱ्यावर चाळिशी दिसते? तुरटी ‘अशी’ लावा, तारुण्य येईल परत

चेहऱ्यावर सुरकुत्या इतक्या की ऐन पंचविशीत चेहऱ्यावर चाळिशी दिसते? तुरटी ‘अशी’ लावा, तारुण्य येईल परत

Alum For Wrinkles : चेहऱ्यावरील सुरकुत्या वाढत्या वयाची निशाणी असतात. म्हणजे म्हातारपणीच त्वचेवर सुरकुत्या दिसत होत्या. पण आजकाल असं झालंय की, कमी वयातच त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत. ज्याला वाढता स्ट्रेस, कमी झोप, उन्ह, प्रदूषण आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी या गोष्टी जबाबदार असतात. ३० वयातच सुरकुत्या दिसू लागल्यानं अकाली म्हातारे दिसण्याचं ओझं वाहावं लागतं. पण आपली ही समस्या दूर करण्यासाठी तुरटी (Alum) फायदेशीर ठरू शकते.

स्किन एक्सपर्ट डॉ. चांदणी जैन यांनी एनबीटीला सांगितलं की, तुरटीमधील अ‍ॅंटी-सेप्टिक आणि टायटनिंग गुण त्वचा टाइट करून सुरकुत्या कमी करतात. तुरटीनं स्किनमधील पोर्स टाइट होतात, त्वचेतील ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो. रोज काही मिनिटं तुरटीनं चेहरा धुतल्यानं किंवा याचा लेप लावल्यानं लगेच फरक दिसून येतो.

या लेखात आपण हेच समजून घेणार आहोत की, तुरटीनं त्वचेचा फायदा कसा होतो, तुरटीचा वापर कसा करावा आणि वापरत असताना काळजी काय घ्यावी. जर फायदा हवा असेल तर योग्य पद्धत माहीत असणं खूप महत्वाचं ठरतं. नाही तर फायद्याऐवजी नुकसानच होऊ शकतं.

सुरकुत्यांवर कसा प्रभाव करते तुरटी

तुरटीमध्ये असे काही तत्व असतात जे सैल पडलेल्या त्वचेला टाइट करतात. जसजसं वय वाढत जातं, त्वचेमधील कोलेजनचं प्रमाण कमी होऊ लागतं. ज्यामुळे लवचिकपणा कमी होतो आणि सुरकुत्या वाढू लागतात. तुरटीनं त्वचेचा वरचा थर अलगदपणे टाइट होतो, ज्यामुळे पोर्स छोटे होतात आणि त्वचा टाइट दिसते. तसेच यातील अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण त्वचेचा इन्फेक्शनपासून बचाव करतात आणि त्वचेचा रंगही खुलवतात. नियमितपणे तुरटी लावल्यास फाइन लाइन्स आणि सुरकुत्या हळूहळू कमी होऊ लागतात. 

तुरटी लावण्याची योग्य पद्धत

तुरटी चेहऱ्यावर लावण्याआधी तुकटा पाण्यात थोडा ओला करा. नंतर हा तुकटा चेहऱ्यावर फिरवा, खासकरून जिथे सुरकुत्या जास्त असतात, जसे की, डोळ्यांच्या खाली, कपाळावर आणि गालांवर. जवळपास दोन ते तीन मिनिटांपर्यंत हलक्या हातानं मसाज करा. नंतर चेहरा पाण्यानं धुवा. काही लोक तुरटी बारीक करून याचा फेसपॅकही बनवतात. ज्यात गुलाबजलही टाकलं जातं. पण जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर आधी पॅच टेस्ट करावी. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही तुरटी चेहऱ्यावर लावू शकता.

इतरही फायदे

तुरटीच्या मदतीनं केवळ सुरकुत्या दूर होतात असं नाही तर त्वचेसंबंधी इतरही अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. यानं पिंपल्स घालवण्यास, डाग-चट्टे दूर करण्यास आणि स्किन टोन सुधारण्यास मदत होते. त्वचेचा इन्फेक्शन आणि बॅक्टेरियापासून बचाव होतो. तुरटीचा लेप लावल्यानं ब्लॅकहेड्सही कमी होतात. 

कधी आणि किती वेळ करावा वापर?

तुरटी चेहऱ्यावर लावण्याची सगळ्यात चांगली वेळ रात्री झोपण्याआधीची असते. यावेळी त्वचा रिलॅक्स मोडमध्ये असते आणि चांगल्या पद्धतीनं गोष्टी अ‍ॅब्जॉर्ब करते. आठवड्यातून ३ ते ४ वेळा याचा वापर करू शकता. ज्यांची त्वचा ऑयली आहे, ते रोज याचा वापर करू शकतात. पण ड्राय त्वचा असेल तर तुरटीनं चेहरा धुतल्यावर मॉइश्चरायजर लावा. 

Web Title: To get wrinkle free skin use alum know how to use it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.