ऑफिस, समारंभ, पार्टी किंवा बाहेर जातानाही मेकअप केल्याने चेहरा ताजातवाना आणि सुंदर दिसतो. आजकाल मेकअप रोज करणे एकदम कॉमन आहे. मात्र जितके मेकअप करणे महत्त्वाचे आहे, तितकेच तो योग्य पद्धतीने उतरवणे आणि त्वचेची काळजी घेणेही गरजेचे आहे. मेकअप करताना आणि पुसताना काही छोट्या कृती लक्षात ठेवल्या, तर त्वचेला त्रास होत नाही आणि तिचे नैसर्गिक सौंदर्य टिकून राहते. मेकअप करताना सर्वात आधी त्वचा स्वच्छ असणे खूप महत्त्वाचे आहे. (These mistakes while applying makeup can be very dangerous, will make your face permanently ugly )चेहरा नीट धुऊन, टोनर आणि हलका मॉइश्चरायझर लावल्यानंतरच मेकअप करा. यामुळे मेकअप त्वचेवर चांगला बसतो आणि पोअर्स बंद होत नाहीत. त्वचेनुसार योग्य प्रॉडक्ट्स निवडणेही तितकेच आवश्यक आहे. कोरड्या त्वचेसाठी क्रीम-बेस्ड तर तेलकट त्वचेसाठी जेल किंवा मॅट प्रॉडक्ट्स वापरल्यास त्वचा सुरक्षित राहते.
मेकअप करताना ब्रश, स्पंज किंवा बोटे स्वच्छ असावीत. घाणेरडे ब्रश वापरल्यास त्वचेवर जंतुसंसर्ग, पिंपल्स आणि रॅशेस येण्याची शक्यता वाढते. तसेच फार जाड मेकअपचा थर लावणे टाळावे. हलका मेकअप त्वचेसाठी नेहमीच चांगला असतो. जास्त प्रमाणात लावल्यावर तो दिसतोही विचित्र आणि नीट बसत नाही.
दिवस संपल्यानंतर मेकअप उतरवणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. अनेकजण थकव्यामुळे किंवा आळशीपणामुळे मेकअप न काढताच झोपतात, पण याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. मेकअप उतरवताना चेहरा जोरात चोळू नये. कापसावर किंवा मऊ कपड्यावर मेकअप रिमूव्हर, नारळ तेल किंवा मायसेलर वॉटर घेऊन हळूवारपणे मेकअप पुसावा. डोळ्यांचा मेकअप काढताना विशेष काळजी घ्यावी. डोळ्यांवर रिमूव्हर लावलेला कापूस काही सेकंद ठेवून मग हलक्या हाताने पुसल्यास पापण्या तुटत नाहीत आणि डोळ्यांची त्वचा दुखावली जात नाही.
मेकअप उतरवल्यानंतर चेहरा सौम्य फेसवॉशने धुणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेवर राहिलेले मेकअपचे अंश, धूळ आणि घाण पूर्णपणे निघून जाते. नंतर टोनर लावल्यास पोअर्स स्वच्छ होतात आणि त्वचा ताजीतवानी वाटते. शेवटी त्वचेनुसार मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीम लावल्यास त्वचेला पोषण मिळते आणि ती रात्रीत पूर्ववत होते.
मेकअप काढताना किंवा चेहरा धुताना खूप गरम पाणी वापरु नये. कोमट किंवा साधे पाणी त्वचेसाठी अधिक सुरक्षित असते. आठवड्यातून एक-दोन वेळा सौम्य स्क्रब केल्यास मृत त्वचा निघून जाते, पण रोज स्क्रब करणे टाळावे. थोडक्यात सांगायचे तर, मेकअप हा सौंदर्य वाढवण्यासाठी असतो, त्वचेला त्रास देण्यासाठी नाही. योग्य पद्धतीने मेकअप करणे, तो नीट पुसणे आणि नंतर त्वचेची काळजी घेणे या सवयी त्वचा निरोगी, स्वच्छ आणि तेजस्वी ठेवतात.
Web Summary : Makeup enhances beauty, but proper application and removal are crucial. Clean skin, gentle removal with appropriate products, and post-cleansing skincare routine are essential for healthy, radiant skin. Avoid harsh scrubbing and hot water.
Web Summary : मेकअप सुंदरता बढ़ाता है, लेकिन सही ढंग से लगाना और निकालना ज़रूरी है। स्वस्थ, चमकदार त्वचा के लिए साफ त्वचा, उपयुक्त उत्पादों से कोमल सफाई और सफाई के बाद त्वचा की देखभाल ज़रूरी है। कठोर स्क्रबिंग और गर्म पानी से बचें।