गालावरचे ओपन पोर्स ही आजकाल अनेकांना होणारी एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. ओपन पोर्स म्हणजे त्वचेवरील रोमछिद्रे जी जास्त मोठी दिसतात. काही वेळा अगदीच उठून दिसतात. ज्यामुळे चेहरा फारच डागाळलेला दिसायला लागतो. (skincare tips, home remedies, open pores on the face - Does the face look rough? 4 easy remedies to reduce open pores)हळूहळू त्यात मळ, तेल साचायला लागतो. एवढेच नाही तर बॅक्टेरिया साचल्यामुळे पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्सची समस्या वाढते. ओपन पोर्सची अनेक कारणे असतात. त्वचेत जास्त प्रमाणात तेल तयार होणे फार त्रासदायक ठरते. तेलकट त्वचा असेल तर रोमछिद्रे मोठी दिसायला लागतात. अनेक कारणांमुळे त्वचेतील कोलेजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्वचेची लवचिकता घटते आणि पोर्स अधिक स्पष्ट दिसतात. सूर्यप्रकाशामुळे, अतिवाऱ्यामुळे त्वचा जास्त खराब होते. ज्यामुळे पोर्स कायमस्वरूपी ओपनच राहू शकतात. चुकीची त्वचा स्वच्छता, वारंवार चेहर्यावर हात लावणे, धूळ-माती व प्रदूषण, चुकीचा आहार, हार्मोनल बदल, आणि पुरेसे हायड्रेशन न मिळाल्यामुळे ओपन पोर्स वाढतात.
१. घरगुती उपायांनी ओपन पोर्सची तीव्रता कमी करता येते आणि त्वचेला निरोगी ठेवता येते. सर्वात आधी चेहरा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. दिवसातून दोनदा सौम्य फेसवॉशने चेहरा धुणे, त्वचेतला वाढलेला तेलकटपणा कमी करण्यास मदत करते.
२. बर्फाचा वापर हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. स्वच्छ बर्फाचे तुकडे कपड्यात गुंडाळून काही सेकंद गालांवर फिरवल्यास त्वचेतील रक्ताभिसरण वाढते आणि पोर्स तात्पुरते आकसतात. फक्त बर्फ थेट त्वचेला लावायचा नाही. कापडात किंवा रुमालात बांधून लावायचा.
३. टोमॅटोचा रस किंवा काकडीचा रस चेहर्यावर लावल्यास त्वचेतील तेल कमी होते आणि पोर्स घट्ट होण्यास मदत होते. टोमॅटो त्वचेसाठी फार फायद्याचा ठरतो.
४. हळद आणि चंदनाची पेस्ट तयार करुन लावल्यास त्वचा जास्त सुंदर होतेच. मात्र ओपन पोर्स कमी होतात. चेहरा मऊ व छान दिसतो.
हे उपाय नियमित केल्याने हळूहळू पोर्सचा आकार कमी होऊ लागतो. पण त्यासाठी सातत्य आवश्यक असते. योग्य आहार, पुरेसे पाणी, नियमित मॉइश्चरायझिंग आणि प्रदूषणाचा त्रास होणार नाही यासाठी घरगुती उपाय महत्त्वाचे आहेत. ओपन पोर्स पूर्णपणे नाहीसे करणे शक्य नसले तरी, त्याची तीव्रता कमी करता येते.