>ब्यूटी > Shahnaz husain's Beauty Tips : 'या' ४ चुकांमुळे कमी वयातच चेहऱ्याची त्वचा सैल पडते; स्किन टाईटनिंगसाठी शेहनाज हुसैनच्या खास टिप्स

Shahnaz husain's Beauty Tips : 'या' ४ चुकांमुळे कमी वयातच चेहऱ्याची त्वचा सैल पडते; स्किन टाईटनिंगसाठी शेहनाज हुसैनच्या खास टिप्स

Shahnaz husain's Beauty Tips : त्वचेची काळजी घेताना काही चुका टाळल्यास वाढत्या वयात वय वाढीच्या खुणांपासून लांब राहता येऊ शकतं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 03:05 PM2021-09-13T15:05:03+5:302021-09-13T15:42:00+5:30

Shahnaz husain's Beauty Tips : त्वचेची काळजी घेताना काही चुका टाळल्यास वाढत्या वयात वय वाढीच्या खुणांपासून लांब राहता येऊ शकतं. 

shahnaz husain's Beauty Tips : Beauty expert shahnaz husain shares 5 mistakes that becomes reason behind skin sagging | Shahnaz husain's Beauty Tips : 'या' ४ चुकांमुळे कमी वयातच चेहऱ्याची त्वचा सैल पडते; स्किन टाईटनिंगसाठी शेहनाज हुसैनच्या खास टिप्स

Shahnaz husain's Beauty Tips : 'या' ४ चुकांमुळे कमी वयातच चेहऱ्याची त्वचा सैल पडते; स्किन टाईटनिंगसाठी शेहनाज हुसैनच्या खास टिप्स

Next

वयाची  तीशी ओलांडल्यानंतर शरीरात अनेक बदल येत असतात. या बदलांमुळे त्वचेवर  परिणाम होतो. अनेकांची त्वचा कमी वयातच सैल व्हायरल सुरूवात होते. अनेकदा महिला याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे  दिवसेंदिवस त्या अधिक वयस्कर दिसू लागतात.  सौंदर्य तज्ञ शहनाज हुसेन म्हणतात, ''30 वर्षानंतर महिलांनी त्यांच्या त्वचेची अधिक काळजी घेतली पाहिजे. जर त्यांनी हे केले नाही तर त्वचा ओघळू शकते आणि लोक लवकर म्हातारे दिसू लागतात. त्वचेवरील सैलपणा नको असल्यास रोजच्या जगण्यात काही बदल करायला हवा. त्वचेची काळजी घेताना काही चुका टाळल्यास वाढत्या वयात वय वाढीच्या खुणांपासून लांब राहता येऊ शकतं. 

1) संतुलित आहार न घेणं

शहनाज म्हणतात की, "जर तुमची तब्येत चांगली असेल तरच तुम्ही सुंदर दिसाल. परंतु जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचा तुमच्या सौंदर्यावरही परिणाम होतो. म्हणूनच तुम्ही चांगले अन्न खाणे खूप महत्वाचे आहे, जे तुमच्या त्वचेच्या आरोग्याला देखील लाभदायक ठरू शकते. खरं तर, अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना असे वाटते की चेहऱ्यावरील सर्व दोष मेकअपने लपवता येतात. पण तसे नाही. महिलांनी चांगले खावे आणि तणावाला कसे सामोरे जावे हे माहित असले पाहिजे. कारण या दोन्ही गोष्टींचा त्वचेवर परिणाम होतो. ''

2) स्किन टाईपनुसार काळजी न घेणं

सहसा स्त्रियांना त्यांचा स्किन टाईप काय आहे हे देखील माहित नसते. एवढेच नाही, ते वापरत असलेली सौंदर्य उत्पादने देखील त्यांच्या त्वचेच्या प्रकारानुसार नसतात. शहनाज म्हणतात की, ''हे देखील त्वचा सैल होण्याचे एक मोठे कारण आहे. जर तुम्ही तेलकट त्वचेवर क्रीम ब्रेस्ड उत्पादने लावली तर त्याचा तुमच्या त्वचेवर परिणाम होईल. दुसरीकडे, जर तुम्ही कोरड्या त्वचेवर वॉटर बेस्ड उत्पादने वापरत असाल तर ते तुमच्या त्वचेलाही हानी पोहोचेल. कोरड्या त्वचेच्या स्त्रियांनी चांगल्या क्रीमने मालिश करणे आवश्यक आहे, यामुळे त्वचा घट्ट होईल.

३) रात्री चेहरा स्वच्छ न करणं

अनेक स्त्रिया फक्त सकाळी त्वचा स्वच्छ करतात, तर रात्रीच्या वेळी त्वचा स्वच्छ करणं त्यांना तेवढं महत्त्वाचं वाटत नाही. यामुळे तुमच्या खराब झालेल्या त्वचेच्या पेशी दुरुस्त होत नाहीत. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेकअप काढून टाकणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही हे केले नाही तर तुमच्या त्वचेला योग्य ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे त्वचेवर सैलपणा येतो. 

४) चेहरा सतत धुवत राहणं

जर तुम्ही दिवसातून अनेक वेळा चेहरा स्वच्छ केलात, तर हे त्वचेच्या सॅगिंगचे कारण देखील असू शकते. हे आपल्या त्वचेची पीएच लेव्हल खराब करते. यामुळे तुम्हाला मुरुमे येऊ शकतात. शहनाज सांगतात की, 'चेहरा दिवसातून फक्त 2 ते 3 वेळा स्वच्छ केला पाहिजे.'

५) फेस मास्क चुकीच्या पद्धतीनं लावणं

अनेक महिलांना फेस मास्क लावण्याची योग्य पद्धत माहित नाही. त्या संपूर्ण चेहरा फेस मास्कने झाकतात. अगदी डोळ्यांखाली आणि ओठांच्या आसपासही त्या फेस मास्क लावतात. चेहऱ्यावरील या दोन्ही ठिकाणांची त्वचा नाजूक असते. येथे फेस मास्क लावल्याने स्ट्रेचिंग होते, ज्यामुळे त्वचा सैल होऊ लागते.

६) पुरेसं पाणी न पिणं

रोज नियमितपणे पाणी पिणे हे केवळ शरीर निरोगी ठेवण्यासाठीच नव्हे तर त्वचा निरोगी ठेवण्यासाठी देखील खूप महत्वाचे आहे. आपण पुरेसे पाणी न पिल्यास, त्वचा डिहायड्रेट होते. यामुळे स्किन सॅगिंगची समस्याही होऊ शकते. म्हणून दिवसभरातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं. 
 

Web Title: shahnaz husain's Beauty Tips : Beauty expert shahnaz husain shares 5 mistakes that becomes reason behind skin sagging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

लॉंग शर्ट आणि नो पॅण्ट! ही कोणती अजब फॅशन, अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर होताहेत ट्रोल - Marathi News | New trend of fashion: No pant trend, long shirt or T shirt with no wearing pants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लॉंग शर्ट आणि नो पॅण्ट! ही कोणती अजब फॅशन, अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर होताहेत ट्रोल

Fashion Trend: काही अभिनेत्रींचे फोटो तुम्ही पाहिले का? लांब शर्ट आणि नो पॅण्ट (long shirt or t shirt with no pants) अशा लूकमधले? त्यांच्याकडे पाहून आपल्याला काहीतरी चुकल्याचुकल्या सारखं वाटतं... पण हे असंच असतं म्हणे.... फॅशनची नवी तऱ्हा.... ...

Social Viral : बापरे! हेअर डायमुळे महिलेची अशी काही दशा झाली; पाहाल तर कलर करण्याआधी १० वेळा विचार कराल - Marathi News | Social Viral : Women head swelled up after hair dye use blinded for four days | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बापरे! हेअर डायमुळे महिलेची झाली अशी काही अवस्था; पाहाल तर कलर करण्याआधी १० वेळा विचार कराल

Social Viral : हेअर डाई लावल्यानंतर त्यांचा चेहरा भयंकर सुजला होता. याशिवाय डोक्यावर आणि त्वचेवर लाल  पुरळ उठले. ...

Hair Care: हेअर वॉशसाठी वापरा रिव्हर्स ट्रिक, शाम्पू करण्याआधी करा ही स्टेप! - Marathi News | Hair Care: Use the reverse trick for hair wash, do this step before shampoo! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair Care: हेअर वॉशसाठी वापरा रिव्हर्स ट्रिक, शाम्पू करण्याआधी करा ही स्टेप!

How to wash hair : हिवाळ्यात त्वचा कोरडी होते, तसेच केसही ड्राय होतात. त्यामुळे ते रूक्ष, कोरडे आणि निस्तेज दिसतात. असं होऊ नये, म्हणून हिवाळ्यात केस धुण्यासाठी रिव्हर्स ट्रिक (reverse method of hair wash) वापरा..  केसांचं होईल अधिक पोषण.... ...

Vitamin Deficiency : 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे उद्भवतो जीवघेणा कॅन्सर; बचावासाठी आहार कसा घ्यायचा? वाचा - Marathi News | Vitamin deficiency : Vitamin e rich food vitamin e deficiency or disease and symptoms vitamin e natural source | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे उद्भवतो जीवघेणा कॅन्सर; जाणून घ्या लक्षणं, योग्य आहार

Vitamin Deficiency : रक्तात व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी होऊ लागते, ज्यामुळे अॅनिमिया होऊ शकतो. ...

Weight Lose Tips : वजन घटवण्यासाठी रोज चालायला जाताय? आधी या ८ सवयी बदला झटपट मिळेल रिजल्ट - Marathi News | Weight Lose Tips : Ayurveda expert guides how to swap out 8 bad habits for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : ना डाएट, ना जीम; वजन घटवण्याासाठी फक्त या ८ सवयी बदला अन् नेहमी मेंटेन राहा

Weight Lose Tips : तुम्ही जर वजन झपाट्याने कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. ...

Sexual Health : खूप कमी लोकांना माहीत असतं हॅप्पी Sex लाईफचं 'हे' सिक्रेट; समोर आला रिसर्च - Marathi News | Sexual health : Sex life secrets emotional understanding fantasy in bedroom relationship experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :....म्हणून पार्टनर कितीही चांगला असला तरी जोडप्यांचं Sex लाईफ खराब असतं; समोर आला रिसर्च

Sexual health : संशोधकांच्यामते सेक्स हा स्वत:सोबत पार्टनरला जाणून घेण्याचा एक मार्ग आहे. संशोधकांनी लैगिंक जीवन चांगलं बनवण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. ...