Join us
Daily Top 2Weekly Top 5

आपणही आंघोळीनंतर करता का 'ही' गंभीर चूक? पाहा थोड्या आळसाने त्वचेचं कसं होतं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:47 IST

Skin Care Tips : ओला टॉवेल योग्यरीत्या न वाळवल्यास आणि त्याच्या स्वच्छतेची योग्य ती काळजी घेतल्यास कोणते धोके वाढू शकतात ते पाहूयात.

Skin Care Tips : सकाळच्या घाईगडबडीत आपण अनेकदा आंघोळीनंतरचा ओला टॉवेल कुठेही टाकून देतो किंवा विसरतो. पण ही सामान्य वाटणारी सवय तुमच्या त्वचेला मोठा त्रास देऊ शकते. ओला टॉवेल योग्यरीत्या न वाळवल्यास आणि त्याच्या स्वच्छतेची योग्य ती काळजी घेतल्यास कोणते धोके वाढू शकतात ते पाहूयात.

ओल्या टॉवेलमुळे वाढणारे धोके

ओला टॉवेल बेड, खुर्ची किंवा कोणत्याही कोपऱ्यात टाकून दिल्यास काही तासांतच त्यावर Staphylococcus aureus, E. coli सारखे बॅक्टेरिया वाढू लागतात. यामुळे त्वचा सेंसिटिव होऊ शकते. एक्झिमा, पिंपल्स, लाल चट्टे येण्याचा धोका वाढतो. ज्यांना आधीपासून त्वचेचे आजार आहेत, त्यांच्या समस्या अधिक आणखी गंभीर होऊ शकतात.

टॉवेल हायजीन कशी राखावी?

फेस टॉवेल – १–२ वेळा वापरल्यावर लगेच धुवा.

बाथ टॉवेल – ३–४ वेळा वापरल्यानंतर धुणे आवश्यक.

वापर झालेला टॉवेल खोलीत ओला ठेवू नका. सरळ उन्हात किंवा मोकळ्या हवेत वाळवा.

चांगल्या क्वालिटीचे अँटी-बॅक्टेरियल व लगेच कोरडे होणारे टॉवेल वापरा.

कुणाशीही टॉवेल शेअर करू नका, यामुळे बॅक्टेरिया आणि डेड स्किनही शेअर होतात.

जुने, रफ किंवा खूप कडक झालेले टॉवेल ताबडतोब बदला.

त्वचेसाठी कॉटन टॉवेल सर्वोत्तम. सेंसिटिव स्किनसाठीही हेच सर्वोत्तम मानले जाते.

या चुका अजिबात करू नका

टॉवेल धुताना जास्त डिटर्जंट किंवा फॅब्रिक सॉफ्टनर वापरणे.

टॉवेल जीन्स, ब्लँकेट किंवा केस गळणाऱ्या कपड्यांबरोबर मशीनमध्ये धुणे किंवा सुकवणे.

टॉवेल पूर्णपणे वाळण्याआधीच फोल्ड करून ठेवणे.

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid These Post-Bath Mistakes for Healthy Skin: Expert Tips

Web Summary : Damp towels breed bacteria, causing skin issues like eczema and acne. Wash face towels after 1-2 uses, bath towels after 3-4. Air dry towels and use antibacterial cotton options. Avoid sharing and harsh detergents for healthy skin.
टॅग्स :त्वचेची काळजीहेल्थ टिप्स