Join us
Daily Top 2Weekly Top 5

चविष्ट आणि सोपे डिटॉक्स वॉटर तयार करा १० मिनिटांत, त्वचेला पोषण आणि पोटाला आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2026 16:33 IST

Prepare delicious and easy detox water in 10 minutes, nourish your skin and soothe your stomach : त्वचेसाठी चांगले आणि पौष्टिक डिटॉक्स पाणी तयार करा.

उन्हाळ्यात शरीर पटकन थकते, घामामुळे पाणी कमी होते आणि त्वचा निस्तेज दिसू लागते. विविध प्रॉडक्ट्स अशा वेळी वापरण्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र त्यांचा वापर करण्याची वेळच येणार नाही जर तुम्ही फक्त एक असा उपाय केला तर. (Prepare delicious and easy detox water in 10 minutes, nourish your skin and soothe your stomach.)उन्हाचा त्रास वाढत चालला असेल तर अशावेळी साध्या पाण्याऐवजी नैसर्गिक घटकांनी तयार केलेले डिटॉक्स पाणी शरीराला ताजेतवाने ठेवते. तयार करायला अगदी सोपे असते. मोठ्या बॉटलमध्ये तयार करुन ठेवायचे. नंतर गरजेनुसार प्यायचे. 

गुलाब पाणी, सब्जा, लिंबू, पुदिना, काकडी आणि बीट यांचा वापर करून तयार केलेले हे पाणी केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरते. या डिटॉक्स पाण्यातील प्रत्येक घटकाची खासियत आहे. गुलाब पाणी शरीराला थंडावा देतं आणि त्वचेची चमक वाढवायला मदत करतं. सब्जा पाण्यात भिजवल्यावर फुगतो आणि शरीराला आतून थंड ठेवतो, तसेच पोट साफ ठेवण्यास मदत करतो. लिंबामध्ये असलेले व्हिटामिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो. पुदिन्याची पाने पचन सुधारतात आणि ताजेपणा देतात. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीर हायड्रेटेड राहते, तर बीट रक्तशुद्धी करून ऊर्जा वाढवण्यास मदत करते.

हे डिटॉक्स पाणी तयार करणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम एक लिटर स्वच्छ पाणी घ्या. त्यात एक चमचा सब्जा बी घाला. त्यानंतर काही काकडीचे पातळ काप, थोडे बीटाचे काप, काही पुदिन्याची पाने, अर्ध्या लिंबाचा रस आणि एक ते दोन चमचे गुलाब पाणी घाला. हे मिश्रण किमान तासभर फ्रिजमध्ये ठेवून द्या, म्हणजे सर्व घटकांचे गुण पाण्यात उतरतील. नंतर हे पाणी दिवसभर थोड्या-थोड्या प्रमाणात प्या.

नियमितपणे हे डिटॉक्स पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते, त्वचा ताजीतवानी राहते, पचन सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. उन्हाळ्यात कृत्रिम पेयांऐवजी असे नैसर्गिक डिटॉक्स पाणी निवडल्यास आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही टिकवून ठेवता येते.

English
हिंदी सारांश
Web Title : Easy Detox Water: Refreshing Summer Drink for Skin and Gut

Web Summary : Beat the summer heat with homemade detox water. Infused with rose water, basil seeds, lemon, mint, cucumber, and beetroot, it cools the body, boosts immunity, aids digestion and purifies blood. A refreshing and healthy alternative to artificial drinks.
टॅग्स :ब्यूटी टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी