उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सूर्याच्या तीव्र किरणांचा त्वचेवर होणारा परिणाम टाळणं खूप कठीण असतं. त्यामुळे चेहरा, मान, हात आणि पाय यावर टॅनिंग होतं, त्वचा काळवंडते आणि नैसर्गिक चमक कमी होते. (Potato is a game changer for the skin! Use potato in this way, better results than expensive creams)अनेक जण यासाठी महागडे प्रॉडक्ट्स वापरतात, पण काही वेळा घरगुती उपायही तितकेच प्रभावी ठरतात. अशाच उपायांमध्ये बटाटा हा अतिशय सोपा, स्वस्त आणि उपयुक्त पर्याय मानला जातो.
बटाट्यामध्ये त्वचेसाठी फायदेशीर असे अनेक घटक आढळतात. त्यात विशेषतः व्हिटॅमिन सी असतं, जे त्वचेसाठी फार फायद्याचं असतं. सुधारण्यास मदत करतं आणि डल स्किनला उजळपणा देतं. याशिवाय बटाट्यात अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेवर होणाऱ्या नुकसानाविरुद्ध काम करतात. बटाट्यातील नैसर्गिक एन्झाइम्स आणि स्टार्च त्वचेला थंडावा देतात, त्यामुळे उन्हामुळे होणारी जळजळ, लालसरपणा किंवा रापलेपणा कमी होतो. काही प्रमाणात बटाट्यात नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्मही असतात, ज्यामुळे त्वचेवरील टॅन हलके होण्यास मदत मिळते.
टॅनिंग कमी करण्यासाठी बटाट्याचा वापर अतिशय सोप्या पद्धतीने करता येतो. बटाट्याचे पातळ काप करून ते थेट त्वचेवर हलक्या हाताने चोळल्यास त्यातील रस त्वचेत मुरतो आणि काळेपणा कमी होण्यास मदत होते. तसेच बटाटा किसून त्याचा रस काढून तो कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर किंवा टॅन झालेल्या भागावर लावता येतो. हा रस काही वेळ त्वचेवर राहू दिल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि हळूहळू टॅनिंग कमी होण्याची प्रक्रिया सुरू होते. काही जण बटाट्याचा रस इतर नैसर्गिक घटकांसोबतही वापरतात, पण फक्त बटाटा वापरला तरीही त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. काळवंडलेली त्वचा सुधारण्यासाठी सातत्य खूप महत्त्वाचं असतं. एक-दोन वेळा वापर करून लगेच फरक दिसेलच असं नाही, पण नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग हळूहळू एकसारखा दिसू लागतो. त्वचा मऊ, तजेलदार आणि फ्रेश वाटू लागते. विशेष म्हणजे बटाटा हा नैसर्गिक असल्यामुळे केमिकलयुक्त उत्पादनांच्या तुलनेत त्वचेला कमी त्रासदायक ठरतो.
याशिवाय बटाटा त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करतो, त्यामुळे त्वचा जास्त चिकट किंवा ऑयली वाटत नाही. उन्हाळ्यात घाम आणि तेलकटपणामुळे होणाऱ्या त्वचेच्या समस्यांवरही हा एक साधा उपाय ठरतो. काही वेळा बटाट्याचा वापर डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठीही केला जातो, कारण त्यातील थंडावा आणि सौम्य गुणधर्म त्वचेला आराम देतात.
Web Summary : Potatoes offer a simple, affordable way to combat summer skin issues like tanning. Rich in Vitamin C and antioxidants, potatoes lighten skin, reduce inflammation, and control oiliness. Regular use yields soft, radiant, and fresh skin, a natural alternative to chemical products.
Web Summary : आलू टैनिंग जैसी गर्मियों की त्वचा की समस्याओं से निपटने का एक सरल, किफायती तरीका है। विटामिन सी और एंटीऑक्सिडेंट से भरपूर, आलू त्वचा को हल्का करता है, सूजन को कम करता है और तेल को नियंत्रित करता है। नियमित उपयोग से त्वचा मुलायम, चमकदार और ताज़ा होती है, जो रासायनिक उत्पादों का एक प्राकृतिक विकल्प है।