उन्हाळा सुरू झाला की घामामुळे आणि उष्णतेमुळे केसांच्या अनेक समस्या डोकं वर काढतात. विशेषतः शालेय वयातील लहान मुलींमध्ये या दिवसांत डोक्यात उवा आणि लिखा होण्याचे प्रमाण प्रचंड वाढते. खेळताना किंवा एकत्र वावरताना एका मुलीकडून दुसऱ्या मुलीकडे या उवा सहज पसरतात. सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही समस्या वेळीच लक्षात घेतली नाही, तर डोक्यात उवांचा अक्षरशः खच पडतो. यामुळे डोक्याला खाज सुटणे, पुरळ येणे आणि केसांचे आरोग्य बिघडणे असे त्रास मुलींना सहन करावे लागतात(oil to remove lice and nits from first use).
बाजारात मिळणारी रासायनिक शॅम्पू किंवा औषधे अनेकदा केसांसाठी (how to get rid of lice fast at home naturally) घातक ठरू शकतात. अशा वेळी आपल्या आजी-पणजीच्या काळातील पारंपारिक आणि घरगुती आयुर्वेदिक उपाय असरदार ठरतात. नैसर्गिक औषधी घटकांपासून तयार केलेले हे खास तेल केवळ (how to remove nits from hair) उवा-लिखांचा नायनाट करत नाही, तर केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना मजबुतीही देते. घरच्याघरीच हे आयुर्वेदिक तेल कसं तयार करायचं आणि त्याचा (best homemade oil for lice treatment in children) योग्य वापर कसा करायचा ते पाहूयात.
उवा आणि लिखांचा नायनाट करेल 'हे' घरगुती तेल...
साहित्य:-
१. १०-१५ कडुलिंबाची ताजी पाने.
२. एक मध्यम आकाराचा कांदा (कांद्याऐवजी तुम्ही कारल्याचा वापरदेखील करू शकता).
३. २००-२५० ग्राम मोहरीचे तेल
४. तुरटीचा एक छोटा तुकडा.
५. कापराची एक वडी
लेकीसाठी पहिली ब्रेसियर निवडताना लक्षात ठेवा १० टिप्स! वयात येणाऱ्या मुलीसाठी आवश्यक काळजी...
तेल बनवण्याची पद्धत...
सर्वात आधी कडुनिंबाची ताजी पाने हाताने चांगली क्रश करून घ्या, म्हणजेच त्याचे छोटे तुकडे करा. गॅसवर लोखंडी कढई गरम करायला ठेवा आणि त्यात हे कडुनिंबाच्या पानांचे तुकडे टाका. आता एक कांदा सालीसकट जाडसर कुटून घ्या आणि कढईत टाका. त्यानंतर त्यात मोहरीचे तेल मिसळा आणि थोडे शिजवून घ्या. आता तुरटीचा एक छोटा तुकडा घेऊन त्याची पावडर करा आणि ती तेलात मिसळा. हे सर्व मिश्रण साधारण १५ मिनिटे मध्यम आचेवर चांगले शिजू द्या. दुसरीकडे कापराच्या वडीची पावडर करून घ्या. लक्षात ठेवा, कापूर तेल शिजत असताना टाकायचा नाही. तेल तयार झाल्यावर ते गाळून ज्या बाटलीत भरणार आहात, त्यामध्ये कापराची पावडर टाका. तेल पूर्णपणे थंड झाल्यावर कापरासोबत नीट मिक्स करून बाटली स्टोअर करा. तुमचे उवा घालवण्याचे घरगुती तेल तयार आहे.
तेलाचा वापर कधी आणि कसा करावा?
तेल वापरण्यापूर्वी ते हलके कोमट करून घ्या. हे कोमट तेल स्काल्पवर नीट लावा. तेल लावून झाल्यानंतर २ ते ३ तास किंवा रात्रभर तसेच राहू द्या. यानंतर बारीक दातांच्या कंगव्याने विंचरून मेलेल्या उवा आणि लिखा काढून टाका. यामुळे अगदी सहजपणे डोके स्वच्छ होईल. या प्रक्रियेनंतर तुमच्या नियमित शाम्पूने केस धुवा. पहिल्याच वापरामध्ये बहुतांश उवा आणि लिखा संपून जातील.
हे तेल वापरण्याचे फायदे...
१. कडुलिंबाची पाने :- कडुलिंबामध्ये 'अझार्डिराक्टिन' नावाचे कीटकनाशक तत्व असते, जे उवांचे जीवनचक्र रोखण्यास मदत करते. यातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्मांमुळे डोक्यातील खाज कमी होते आणि संसर्गापासून संरक्षण मिळते.
२. कांदा :- कांद्यामध्ये गंधकाचे प्रमाण भरपूर असते, ज्याचा तीव्र वास उवांना सहन होत नाही आणि त्या मरतात. कांद्याचा रस केसांच्या मुळांना पोषण देतो, ज्यामुळे उवांच्या त्रासामुळे कमकुवत झालेले केस पुन्हा मजबूत होतात.
३. मोहरीचे तेल :- मोहरीचे तेल हे नैसर्गिकरीत्या चिकट आणि तीव्र असते, ज्यामुळे उवांचा श्वास गुदमरतो आणि त्या सहजपणे बाहेर निघतात. हे तेल डोक्यातील आर्द्रता टिकवून ठेवते आणि केसांचा कोरडेपणा दूर करते.
४. तुरटी :- तुरटीमध्ये निर्जंतुकीकरण करण्याचे गुणधर्म असतात, जे लिखा सुकवून केसांपासून वेगळे करण्यास मदत करतात. हे डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
५. कापूर :- कापराचा थंडगार स्पर्श आणि उग्र वास उवांना बेशुद्ध करतो, ज्यामुळे बारीक फणीने विंचरताना त्या सहज बाहेर पडतात.
Web Summary : Summer brings lice, especially to school girls. This homemade Ayurvedic oil effectively eliminates lice and nits while nourishing hair. It uses readily available ingredients like neem, onion, mustard oil, alum, and camphor. Regular use ensures a lice-free scalp and healthier hair.
Web Summary : गर्मी जूँ लाती है, खासकर स्कूली लड़कियों के लिए। यह घरेलू आयुर्वेदिक तेल प्रभावी रूप से जूँ और लीख को खत्म करता है और बालों को पोषण देता है। इसमें नीम, प्याज, सरसों का तेल, फिटकरी और कपूर जैसी आसानी से उपलब्ध सामग्री का उपयोग होता है। नियमित उपयोग जूँ-मुक्त खोपड़ी और स्वस्थ बालों को सुनिश्चित करता है।