Join us  

मानेवर मळ साचलाय-काळे थर दिसतात? ३ उपाय करा, टॅनिंग गायब-ग्लोईंग दिसेल मानेची त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 11:01 AM

Neck Tanning Removal Tips : गरमीच्या दिवसांत काळवंडलेली मान पाहिल्यानंतर सगळ्यात आधी प्रश्न पडतो ते म्हणजे  मानेचा काळेपणा घालवण्यासाठी काय उपाय करता येतील.

मानेवर काळपटपणा आला (Neck Tanning) तर साबणाने कितीही घासले तरी फरक दिसून येत नाही. ऊन्हाळ्याच्या दिवसांत  चेहऱ्याबरोबरच मान काळी पडणं खूपच कॉमन आहे. (Beauty Tips) चेहरा चांगला दिसावा यासाठी अनेकजणी फेअरनेस क्रिमचा वापर करतात पण जर चेहऱ्यापेक्षा मान जास्त काळवंडली असेल तर  मानेकडे सहज कोणाचेही लक्ष जाते. (Neck Tanning Removal Tips) गरमीच्या दिवसांत काळवंडलेली मान पाहिल्यानंतर सगळ्यात आधी प्रश्न पडतो ते म्हणजे  मानेचा काळेपणा घालवण्यासाठी काय उपाय करता येतील. काही सोप्या घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही मानेवरचे काळे थर आणि टॅनिंग कमी करू शकता. (How To Remove Tanning From Neck)

मानेचं टॅनिंग घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय (Tanning Removal Tips)

१) हळद आणि दही

मानेचा काळेपणा दूर करण्याासाठी तुम्ही हळद आणि दह्याचा वापर करू शकता.  यासाठी २ चमचे दह्यात अर्धा चमचा हळद पावडर घाला हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिसळून पेस्ट  तयार  करा. २० मिनिटांनी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा त्यानंतर पाण्याने धुवा. चांगल्या परिणामांसाठी दोन ते तीन वेळा याचा वापर करा.

उर्फी जावेदच्या ग्लोंईग-स्पॉटलेस त्वचेचं सिक्रेट; किचनमधल्या 'या' ३ वस्तूंचा लावते फेसपॅक

2) ऑलिव्ह ऑईल

मानेसाठी सिरम सहज तयार करता येतो. यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळून बाटलीत भरून ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी मानेवर लावा. हे द्रावण काळी मान दूर करण्यास मदत करेल. काही दिवस लावल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येतो कारण हे मिश्रण नैसर्गिक ब्लीचसारखे काम करते आणि टॅनिंग दूर करण्यात प्रभावी आहे.

नारळ फोडण्याचं किचकट काम होईल एकदम सोपं; २ सेकंदात नारळ फुटून खोबरं येईल हातात

३) बटाट्याचा रस

नॅच्युरल ब्लीचप्रमाणे काम करते. बटट्याचा रस टॅनिंग आणि मळ काढण्यास प्रभावी ठरतो.  एक बटाटा घ्या, पिळून त्याचा रस काढा. ते कापसात घेऊन मानेवर लावा आणि 10 ते 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर धुवा. काही दिवस रोज वापरल्यानंतर त्याचा उत्तम परिणाम दिसून येईल आणि मानेवरील काळेपणा निघून जाईल. याशिवाय खोबरेल तेलात साखर मिसळून हे मिश्रण मानेला लावल्याने  मानेचा काळेपणा दूर होईल.  साखर एक नैसर्गिक स्क्रबरप्रमाणे काम करते.  ज्यामुळे टॅनिंग सहज निघण्यास मदत होते आणि मान चमकदार दिसते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहेल्थ टिप्स