Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > कुठलीच नसेल भाजी तरी बटाटा राजी हे जितकं खरं तितकाच बटाटा असरदार त्वचाविकारांवर, पाहा उपाय

कुठलीच नसेल भाजी तरी बटाटा राजी हे जितकं खरं तितकाच बटाटा असरदार त्वचाविकारांवर, पाहा उपाय

Natural skin treatment at home, DIY potato face mask for better glow : बटाटा त्वचेसाठी ठरतो फार चांगला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2026 14:18 IST2026-02-24T14:14:06+5:302026-02-24T14:18:44+5:30

Natural skin treatment at home, DIY potato face mask for better glow : बटाटा त्वचेसाठी ठरतो फार चांगला.

Natural skin treatment at home, DIY potato face mask for better glow | कुठलीच नसेल भाजी तरी बटाटा राजी हे जितकं खरं तितकाच बटाटा असरदार त्वचाविकारांवर, पाहा उपाय

कुठलीच नसेल भाजी तरी बटाटा राजी हे जितकं खरं तितकाच बटाटा असरदार त्वचाविकारांवर, पाहा उपाय

बटाटा हा आपल्या स्वयंपाकात आवर्जुन वापरला जाणारा साधा घटक आहे. लहान मुलांनाही बटाटा भाजी फार आवडते. भजी, वडा, मसाला डोसा आणि इतरही अनेक पदार्थ करताना बटाटा तर हवाच. एखादी भाजी कमी पडत असेल तर त्यातही आपण बटाटा घालतो. बटाटा फक्त खाण्यासाठीच नाही तर त्वचेच्या निगेसाठीही अत्यंत उपयुक्त ठरु शकतो. (Natural skin treatment at home, DIY potato face mask for better glow )अनेक घरगुती उपायांमध्ये बटाट्याचा रस, किस किंवा पेस्ट वापरली जाते. नैसर्गिक घटकांनी भरलेला बटाटा त्वचेचा तजेला वाढवण्यासाठी, डाग कमी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी मदत करु शकतो.

बटाट्यामध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. हे एक प्रभावी अँटी ऑक्सिडंट असून त्वचेतील फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा तजेलदार आणि निरोगी दिसते. व्हिटॅमिन सी कोलेजन निर्मितीस मदत करते, ज्यामुळे त्वचा सुंदर आणि लवचिक राहते. याशिवाय बटाट्यात एन्झाइम्स आणि नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेवरील काळे डाग, पिग्मेंटेशन आणि टॅनिंग कमी करण्यास मदत होऊ शकते. ओठांभोवतीचा किंवा डोळ्यांखालील काळसरपणा कमी करण्यासाठीही काही लोक बटाट्याचा रस वापरतात. डोळ्यांखाली सूज किंवा काळी वर्तुळे असतील तर थंड बटाट्याच्या चकत्या ठेवण्याचा उपाय लोकप्रिय आहे. काखेतील काळे डाग घालवण्यासाठीही बटाट्याचे काप फिरवणे फायद्याचे ठरते.

बटाट्यातील स्टार्च आणि पाणी त्वचेला थंडावा देतात. उन्हामुळे किंवा अ‍ॅलर्जीमुळे त्वचेवर लालसरपणा, जळजळ किंवा हलकी सूज आली असेल तर बटाट्याची पेस्ट लावल्याने आराम मिळू शकतो. म्हणूनच सनबर्नसाठीही बटाट्याचा वापर घरगुती उपाय म्हणून केला जातो. तेलकट त्वचा असलेल्या लोकांसाठीही बटाटा उपयोगी ठरू शकतो. त्यातील नैसर्गिक घटक त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करतात. नियमित वापरल्यास त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसू शकते.

कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी त्वचेच्या एका छोट्या भागावर चाचणी करून पाहणे आवश्यक आहे. काही लोकांना बटाट्यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते. तसेच त्वचेच्या गंभीर समस्यांसाठी केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

Web Title : आलू: त्वचा का रक्षक! त्वचा की समस्याओं के लिए सरल घरेलू उपचार।

Web Summary : रसोई के अलावा, आलू त्वचा के लिए फायदेमंद है। विटामिन सी और एंजाइम से भरपूर, यह काले धब्बे, टैनिंग और सूजन से लड़ता है। आलू काले घेरे को हल्का कर सकता है, सूजन को कम कर सकता है और सनबर्न को शांत कर सकता है, जिससे त्वचा चमकदार बनती है। उपयोग करने से पहले हमेशा एलर्जी की जांच करें।

Web Title : Potato: A skin savior! Simple home remedies for skin problems.

Web Summary : Beyond the kitchen, potatoes offer skin benefits. Rich in vitamin C and enzymes, they combat dark spots, tanning, and inflammation. Potato can lighten dark circles, reduce swelling, and soothe sunburns, making skin radiant. Always test for allergies before use.