Join us
Daily Top 2Weekly Top 5

पिंपल्सचे काळे डाग, व्रण होतील गायब! जायफळ ज्येष्ठमधाची डार्कस्पॉट रिमूव्हल क्रीम वाचवेल पार्लरचा खर्च...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2026 13:01 IST

natural remedy for dark spots & pigmentation on face : nutmeg and mulethi face pack : how to get rid of dark spots & pigmentation : घराच्याघरीच जायफळ - ज्येष्ठमधाची क्रीम कशी तयार करायची, पाहा स्पॉटलेस त्वचेसाठी घरगुती उपाय...

चेहऱ्यावर पिंपल्स येणं ही फारच कॉमन समस्या असली तरी आपल्यापैकी अनेकींना ती त्रासदायकच वाटते. चेहऱ्यावर पिंपल्स गेले तरी त्यांचे काळे डाग अनेक दिवस तसेच राहतात आणि त्वचेचा नैसर्गिक ग्लो कमी झाल्यासारखा वाटतो. चेहऱ्यावर पिंपल्स येणे जितके त्रासदायक असते, त्याहून अधिक त्रासदायक असतात त्यांनी मागे सोडलेले काळे डाग. हे डाग तुमच्या सौंदर्यात अडथळा ठरतात त्वचेवर पिंपल्सचे मागे राहिलेले डाग आणि व्रण नकोसे वाटतात... आरशात पाहताना चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिगमेंटेशन पाहून यावर काहीतरी ठोस उपाय करण्याची इच्छा होतेच. त्वचेची योग्य ती काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करणे कधीही फायदेशीर आणि असरदार ठरतात. त्वचेवरील पिंपल्स निघून जातात आणि मागे सोडून जातात ते हट्टी काळे डाग. हे डाग घालवण्यासाठी आपण अनेक महागडे उपाय करतो, पण आपल्या स्वयंपाकघरातच एक असा 'जादूई' पदार्थ आहे जो या समस्येवर रामबाण उपाय ठरू शकतो, तो म्हणजे जायफळ...(natural remedy for dark spots & pigmentation on face).

'जायफळ' हा केवळ मसाल्याचा पदार्थ नसून सौंदर्याचा खजिना आहे. जायफळामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेचा रंग उजळण्यास आणि (nutmeg and mulethi face pack) काळे हट्टी डाग कमी करण्यास मदत करतात. घराच्याघरीच जायफळ क्रीम (Nutmeg Cream) कशी तयार करायची आणि (how to get rid of dark spots & pigmentation) त्याचा वापर कसा करायचा ते पाहूयात... 

जायफळ क्रीम तयार करण्यासाठी लागणारे साहित्य... 

१. जायफळ - २ ते ३ तुकडे२. जेष्ठमध पावडर - २ टेबलस्पून ३. व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल - २ ते ३ कॅप्सूल४. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून ५. गुलाबपाणी - १/२ कप ६. बदाम तेल - २ टेबलस्पून 

बापरे! कंगव्यात केसांचा एवढा मोठा गुंता, जसं टक्कल पडेल! खोबरेल तेल आणि मेथी दाण्याचा उपाय, ३० दिवसांत पाहा बदल...

मोगऱ्याच्या कळ्या - गुलाबाची नक्षी, कळ्यांच्या दुपट्ट्यांचे ८ मनमोहक प्रकार! अंबानींच्या सुनेची स्टाइल आता हळदस्पेशल ओढणी...

जेष्ठमध - जायफळपासून घरगुती क्रीम तयार करण्यासाठी... 

सर्वातआधी जायफळाचे दोन तुकडे करून घ्या. आता हे जायफळ गुलाब पाण्यात मिसळून सहाणेवर व्यवस्थित घासून त्याचा लेप तयार करा. या तयार झालेल्या लिक्विडमध्ये ज्येष्ठमध पावडर, एलोवेरा जेल, बदाम तेल आणि व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल व्यवस्थित मिसळून घ्या. हे सर्व घटक एकत्र फेटल्यानंतर क्रीम तयार होईल. ही तयार क्रीम रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने त्वचेचा मसाज करा. या उपायामुळे त्वचेचा असमान रंग सुधारतो, तसेच चेहऱ्यावरील पिंपल्सचे काळे डाग कमी होऊन त्वचा स्वच्छ व चमकदार होते. ही क्रीम तुम्ही एका काचेच्या छोट्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता.

तमन्ना भाटियाच्या मिल्की त्वचेचा 'देसी' फॉर्म्युला! स्वयंपाकघरातील ३ पदार्थ देतात ५ मिनिटांत ग्लो...

हा घरगुती उपाय करण्याचे फायदे... 

१. जायफळ त्वचेत खोलवर जाऊन पिंपल्सचे काळे व हट्टी डाग फिकट करण्यास मदत करते.

२.  गुलाबपाणी आणि एलोवेरा जेलमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

३. डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी हे क्रीम गुणकारी आहे.

४. २ ते ३ आठवड्यांत त्वचेवरील काळे डाग हलके दिसू लागतात, त्वचेचा रंग अधिक समान दिसतो. 

५. पिंपल्स पुन्हा येण्याची शक्यता कमी होते त्वचा मऊ आणि फ्रेश वाटते.

English
हिंदी सारांश
Web Title : Nutmeg-licorice cream: Erase dark spots, save parlor costs!

Web Summary : Get rid of dark spots with a homemade nutmeg and licorice cream. This natural remedy lightens pigmentation, reduces blemishes, and gives glowing, even-toned skin. Save money and pamper your skin!
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय