Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > बापरे! कंगव्यात केसांचा एवढा मोठा गुंता, जसं टक्कल पडेल! खोबरेल तेल आणि मेथी दाण्याचा उपाय, ३० दिवसांत पाहा बदल...

बापरे! कंगव्यात केसांचा एवढा मोठा गुंता, जसं टक्कल पडेल! खोबरेल तेल आणि मेथी दाण्याचा उपाय, ३० दिवसांत पाहा बदल...

how to use coconut oil methi dana to stop hair fall : coconut oil and methi dana for hair fall : गुडघ्यापर्यंत लांब आणि दाट केसांचे सिक्रेट! आजीच्या बटव्यातील खोबरेल तेल मेथी दाण्याचा उपाय आजच करुन पहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2026 21:43 IST2026-01-24T14:08:30+5:302026-01-24T21:43:32+5:30

how to use coconut oil methi dana to stop hair fall : coconut oil and methi dana for hair fall : गुडघ्यापर्यंत लांब आणि दाट केसांचे सिक्रेट! आजीच्या बटव्यातील खोबरेल तेल मेथी दाण्याचा उपाय आजच करुन पहा...

how to use coconut oil methi dana to stop hair fall coconut oil and methi dana for hair fall | बापरे! कंगव्यात केसांचा एवढा मोठा गुंता, जसं टक्कल पडेल! खोबरेल तेल आणि मेथी दाण्याचा उपाय, ३० दिवसांत पाहा बदल...

बापरे! कंगव्यात केसांचा एवढा मोठा गुंता, जसं टक्कल पडेल! खोबरेल तेल आणि मेथी दाण्याचा उपाय, ३० दिवसांत पाहा बदल...

सकाळी उठल्या - उठल्या उशीवर पडलेले केस किंवा कंगव्यात अडकलेले केसांचे पुंजके पाहून अनेकजणींना याची भीतीच वाटते. केसगळतीची समस्या आता इतकी कॉमन झाली आहे की, अगदी कमी वयातही केस गळण्याची समस्या सतावते. आजकाल बदललेली लाईफस्टाईल, ताणतणाव, चुकीचा आहार, प्रदूषण आणि केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट्स यांसारख्या अनेक कारणांमुळे केसगळतीची समस्या सतावते. केस गळू लागले की ते थांबवण्यासाठी आपण वेगवेगळे महागडे उपाय करून पाहतो अनेकदा याचा परिणाम फक्त तात्पुरता दिसून येतो, आणि पुन्हा केसगळती सुरूच राहते(coconut oil and methi dana for hairfall).

महागडे शाम्पू आणि हेअर ट्रिटमेंट करूनही अनेकदा हवा तसा फरक दिसत नाही. अशावेळी आठवण येते ती आपल्या आजी-पणजींच्या घरगुती बटव्यातील अस्सल पारंपरिक उपायांची... केसांच्या आरोग्यासाठी खोबरेल तेल आणि मेथी दाणे यांचे मिश्रण हे एखाद्या अमृतापेक्षा कमी नाही. मेथी दाण्यांमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म केसांच्या मुळांना मजबूती देतात, तर खोबरेल तेल त्यांना पोषण पुरवते. मेथीच्या दाण्यांमध्ये 'निकोटिनिक ॲसिड' आणि 'प्रोटीन'चे प्रमाण इतके (home remedy to stop hair fall naturally) जास्त असते की, ते हेअर फॉलिकल्सना पुन्हा जिवंत करण्याची ताकद देतात. जेव्हा हे गुणधर्म शुद्ध खोबरेल तेलासोबत एकत्र येतात, तेव्हा केसगळती थांबण्यास मदत होते. मोठया प्रमाणांत होणारी केसगळती थांबण्यासाठी, एकदा (how to use coconut oil methi dana to stop hair fall) मेथी दाणे आणि खोबरेल तेलाचा हा 'मॅजिकल' उपाय नक्की करून पाहा. 

खोबरेल तेल आणि मेथी दाण्यांचे तेल कसे तयार करावे?

मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन (Protein) आणि निकोटिनिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असते, जे केसांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. तसेच यात 'लेसिथिन' नावाचे घटक असतात, जे केसांना नैसर्गिक चमक देतात आणि कोंड्याची समस्या मुळापासून नष्ट करतात.

साहित्य :-

१. खोबरेल तेल - १ कप
२. मेथी दाणे - २ टेबलस्पून 

कृती :-

मेथी दाणे थोडेसे कुटून घ्या. कढईत खोबरेल तेल गरम करून त्यात कुटलेले मेथी दाणे घाला. मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे तेल गरम करा. मेथी दाणे काळे होईपर्यंत तेल मंद आचेवर उकळू द्या. तेल थंड झाल्यावर गाळून बाटलीत भरुन स्टोअर करा. 

तमन्ना भाटियाच्या मिल्की त्वचेचा 'देसी' फॉर्म्युला! स्वयंपाकघरातील ३ पदार्थ देतात ५ मिनिटांत ग्लो...

मासिक पाळीत पोट दुखत असताना डाव्या कुशीवर झोपावे की उजवा, तज्ज्ञ सांगतात ‘ही’ पोझिशन उत्तम-लागेल शांत झोप...

हे तेल लावण्याची योग्य पद्धत... 

१. आठवड्यातून किमान दोनदा या तेलाने केसांच्या मुळांशी आणि स्काल्पवर हलक्या हाताने मसाज करा.

२. तेल लावल्यानंतर किमान तासभर किंवा शक्य असल्यास रात्रभर केसांवर तेल तसेच राहू द्या.

३. दुसऱ्या दिवशी कोमट पाण्याने आणि माईल्ड शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत.

केसांसाठी मेहेंदी भिजवताना ३ पदार्थ मिसळा, केसांवर येईल महागड्या कलरपेक्षा सुंदर रंगाची शेड-‘अशी’ भिजवा मेहेंदी... 

हा घरगुती पारंपरिक उपाय करण्याचे फायदे... 

१. केसांची मुळे मजबूत होतात :- मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन, आयर्न आणि लेसिथिन भरपूर प्रमाणात असते. हे घटक केसांच्या मुळांना पोषण देतात. खोबरेल तेल केसांच्या मुळांपर्यंत खोलवर पोहोचते, त्यामुळे केस मजबूत होऊन तुटणे आणि गळणे कमी होते.

२. केसगळती कमी होते :- नियमित तेल लावल्याने टाळूतील रक्ताभिसरण सुधारते. मेथीतील पोषक तत्वे आणि खोबरेल तेलाचा ओलावा मिळून केस गळण्याची समस्या हळूहळू कमी होऊ लागते.

३. डोक्यातील कोंडा कमी होतो :- मेथी दाण्यांमध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे कोंडा आणि खाज कमी करण्यास मदत करतात. खोबरेल तेल टाळू कोरडी होऊ देत नाही, त्यामुळे कोंड्याची समस्या नियंत्रणात राहते.

४. केस लांब आणि दाट होण्यास मदत :- मेथी दाणे केसांच्या वाढीस चालना देतात. नियमित वापर केल्यास केसांची वाढ सुधारते, केस दाट दिसू लागतात आणि नैसर्गिक चमक येते.

५. केस मऊ आणि चमकदार होतात :- खोबरेल तेल केसांना नैसर्गिकपणे मॉइश्चराईझ करते. मेथी दाण्यांचा अर्क केसांना पोषण देतो, त्यामुळे केस कोरडे, रुक्ष न राहता मऊ, रेशमी आणि चमकदार होतात.

Web Title : बालों का झड़ना रोकें: नारियल तेल और मेथी दाना बालों के विकास के लिए।

Web Summary : बाल झड़ने से परेशान हैं? नारियल तेल में मेथी दाना मिलाकर आजमाएं। यह मिश्रण बालों की जड़ों को मजबूत करता है, रूसी कम करता है और 30 दिनों में स्वस्थ, चमकदार बालों को बढ़ावा देता है। नियमित उपयोग से दिखेगा असर।

Web Title : Stop hair fall: Coconut oil and fenugreek seeds for hair growth.

Web Summary : Battling hair fall? Try a traditional remedy: coconut oil infused with fenugreek seeds. This blend strengthens hair roots, reduces dandruff, and promotes healthy, shiny hair within 30 days. Regular use shows visible results.