Dry Skin Home Remedy : थंडीच्या दिवसांमध्ये थंड वाऱ्यामुळे त्वचा कोरडी पडणे स्वाभाविक आहे. ओठ फाटतात त्यामुळे मोकळेपणाने हसताही येत नाही. जास्तीत जास्त लोकांना त्वचा ड्राय होण्याची समस्या होते. त्यात ज्या लोकांची त्वचा आधीच ड्राय असते, त्यांना तर अधिक समस्या होते. त्यामुळे या दिवसांमध्ये त्वचा नॉर्मल ठेवणं एखाद्या आव्हानापेक्षा काही कमी नाही. कारण अनेकदा काही उपाय करून सुद्धा त्वचा कोरडी राहते, उलते. मात्र, असेही काही नॅचरल उपाय आहेत, जे महागड्या ब्यूटी प्रॉडक्टपेक्षाही जास्त फायदेशीर ठरू शकतात. असेच तीन उपाय आज आपण पाहणार आहोत. ज्यांच्या मदतीनं त्वचा मुलायम आणि ग्लोइंग ठेवू शकता.
खोबऱ्याचं तेल आणि ग्लिसरीन
खोबऱ्याचं त्वचा आतून मुलायम ठेवण्याचं काम करतं. त्वचेतील ओलावा कायम ठेवतं. तेच जर आपण यात ग्लिसरीन घालून त्वचेवर लावलं तर थंडीत आपली त्वचा नेहमीच टवटवीत आणि ग्लोइंग दिसेल. यासाठी एका वाटीमध्ये २ चमचे ग्लिसरीन आणि ५ ते ६ चमचे खोबऱ्याचं तेल मिक्स करा. रात्री झोपण्याआधी हे मिश्रण त्वचेवर लावा. सकाळी चेहरा पाण्याने धुवा. काही दिवसातच आपल्याला फरक दिसून येईल.
फक्त दही
ड्राय स्किनची समस्या जर लगेच दूर करायची असेल तर आपण चेहऱ्यावर फक्त दही सुद्धा लावू शकता. एक चमचा दही घ्या आणि चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. ५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुतल्यावर आपल्या त्वचा साफ आणि मुलायम झाल्याची जाणवेल. दह्यामध्ये त्वचा एक्सफोलिएट करण्याचे गुण असतात. जे आपल्या त्वचेमधील घाण साफ करण्यास मदत करतात. याने पोर्स मोकळे होतात आणि स्किन हेल्दी दिसू लागते.
मध आणि कोरफडीचा गर
बऱ्याच महिला किंवा तरूणी चेहऱ्यावर फक्त कोरफडीचा गर लावतात. पण कोरफडीच्या गराचा आणखी जास्त फायदा मिळवण्यासाठी त्यात १ चमचा मध घालून लावा. हे मिश्रण चेहऱ्यावर एखाद्या मास्कसारखं काम करतं. कोरफडीच्या गरानं एकीकडे त्वचा आतून साफ होते, तर दुसरीकडे मधातील अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-एजिंग गुण त्वचा तरूण ठेवतात. तसेच नॅचरली मॉइश्चराइज करतात. दोन्ही गोष्टी एकत्र करून लावल्यास त्वचा मुलायम आणि ग्लोइंग होते.
