Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > रात्री झोपताना १ ग्लास दुधात हा पदार्थ घालून प्या; सकाळी चेहऱ्यावर येईल तेज, सुंदर चेहरा दिसेल

रात्री झोपताना १ ग्लास दुधात हा पदार्थ घालून प्या; सकाळी चेहऱ्यावर येईल तेज, सुंदर चेहरा दिसेल

Golden Milk For Healthy Skin : आपल्या चेहऱ्यावर तेज असावं, चेहरा टवटवीत ताजातवाना दिसावा असं प्रत्येकाच वाटतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 20:10 IST2026-04-08T19:57:50+5:302026-04-08T20:10:15+5:30

Golden Milk For Healthy Skin : आपल्या चेहऱ्यावर तेज असावं, चेहरा टवटवीत ताजातवाना दिसावा असं प्रत्येकाच वाटतं.

Natural Glow On Face With Golden Milk Know Easy Method : Golden Milk For Healthy Skin | रात्री झोपताना १ ग्लास दुधात हा पदार्थ घालून प्या; सकाळी चेहऱ्यावर येईल तेज, सुंदर चेहरा दिसेल

रात्री झोपताना १ ग्लास दुधात हा पदार्थ घालून प्या; सकाळी चेहऱ्यावर येईल तेज, सुंदर चेहरा दिसेल

चेहऱ्यावर ग्लो  (Natural Glow) येण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय  करतात. दर महिन्याला ब्लीच फेशियल  करतात तर काहीजण पार्लरमध्ये जाऊन डी टॅन, मसाज, क्लिनअप अशा सर्विस घेतात. पण या सगळ्यापेक्षा तुम्ही काय खाता, कसं खाता हे सुद्धा त्वचेसाठी महत्वाचं असतं.

आपल्या चेहऱ्यावर तेज असावं, चेहरा टवटवीत ताजातवाना दिसावा असं प्रत्येकाच वाटतं. त्यासाठी रात्रीच्यावेळी तुम्ही गोल्डन मिल्क पिऊ शकता. या गोल्डन मिल्कच्या सेवनानं सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर ग्लो आलेला दिसून येईल. (Natural Glow On Face With Golden Milk  Know Easy Method)

रांचीच्या ब्युटी एक्सपर्ट गरिमा सांगतात  की बाहेरून तुम्ही कितीही मसाज करा किंवा क्रिम लावा. पण चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी चांगला आहार घेणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच रात्री झोपताना एक ग्लासभर दुधात थोडा गुळ, थोडं केसर आणि थोडी हळद घालून ठेवा. याला ब्युटी मिल्क किंवा गोल्डन मिल्क असंही म्हणतात. याचे सेवन अवश्य करायला हवे. याशिवाय हळद घातलेलं दूध प्यायल्यानं अनेक तब्येतीच्या समस्याही कमी होतात, शांत झोप लागते.

ब्युटी मिल्कचे (गोल्डन मिल्क) फायदे काय आहेत?

हेल्थ लाईनच्या रिपोर्टनुसार ब्युटी मिल्क प्यायल्यानं शरीरातील उष्णता कमी होते. चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो टिकून  राहतो आणि चेहरा तजेलदार दिसतो.  बाहेरून तुम्ही कितीही क्रिम्स लावल्या तरी तुम्ही हे दूध प्यायलाने त्वचा आतून रिपेअर होईल आणि त्याचा परिणाम चांगला दिसून येईल. केसरमध्ये व्हिटामीन ए, बी, सी ओमेगा फॅटी एसिड्स आणि मेलानिन यांसारखे पोषक तत्व असतात. ज्यामुळे चेहऱ्याचे डॅमेज सेल रिपेअर करता येतात.  चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी करतात येतात. तसंच रक्त शुद्ध होण्यासही मदत होते. (Ref)

यात थोडा गूळसुद्धा घालू शकता

याव्यक्तिरिक्त यात थोडा गुळाचा खडा घातल्यास  शरीरातील कफ बलेंन्स राहील. तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहील. ब्लड फ्लो नियमित होईल तसंच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसू लागेल. रात्री झोपण्याआधी गरमागरम हे दूध प्यायल्यास शरीर आणि चेहऱ्यामध्ये बदल दिसायला सुरूवात होईल.

Web Title : ग्लोइंग, खूबसूरत त्वचा के लिए सोने से पहले हल्दी दूध पिएं।

Web Summary : सोने से पहले हल्दी, केसर और गुड़ मिलाकर दूध पीने से त्वचा में निखार आता है। ब्यूटी एक्सपर्ट इसे बाहरी उपचारों से बेहतर मानते हैं। यह शरीर की गर्मी कम करता है, त्वचा की कोशिकाओं की मरम्मत करता है, रक्त प्रवाह में सुधार करता है और प्राकृतिक चमक लाता है।

Web Title : Drink golden milk before sleep for glowing, beautiful skin.

Web Summary : Golden milk, a blend of milk, turmeric, saffron, and jaggery, promotes radiant skin. Beauty experts recommend it over external treatments. It reduces body heat, repairs skin cells, improves blood flow, and adds a natural glow, especially when consumed warm before bed.