lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > जाता जात नाही हट्टी डार्क सर्कल? मधात मिसळा फक्त २ गोष्टी, काळी वर्तुळे गायब-डोळे दिसतील टपोरे

जाता जात नाही हट्टी डार्क सर्कल? मधात मिसळा फक्त २ गोष्टी, काळी वर्तुळे गायब-डोळे दिसतील टपोरे

Natural, effective remedy of honey to lighten dark circles : नाकी डोळी छान, पण डोळ्यांखालील काळ्या वर्तुळामुळे त्रस्त झालात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2024 05:20 PM2024-02-16T17:20:20+5:302024-02-16T17:21:14+5:30

Natural, effective remedy of honey to lighten dark circles : नाकी डोळी छान, पण डोळ्यांखालील काळ्या वर्तुळामुळे त्रस्त झालात?

Natural, effective remedy of honey to lighten dark circles | जाता जात नाही हट्टी डार्क सर्कल? मधात मिसळा फक्त २ गोष्टी, काळी वर्तुळे गायब-डोळे दिसतील टपोरे

जाता जात नाही हट्टी डार्क सर्कल? मधात मिसळा फक्त २ गोष्टी, काळी वर्तुळे गायब-डोळे दिसतील टपोरे

बऱ्याचदा सगळं काही चांगलं असतं, पण डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांमुळे चेहऱ्यावरची शोभा कमी होते. चेहरा निस्तेज आणि कायम थकलेला दिसतो. काळ्या वर्तुळांमुळे कितीही छान मेकअप केला तरी, चेहरा डल वाटतो. जर आपल्याला या कटकटीतून मुक्त व्हायचं असेल तर, नैसर्गिक उपायाचा वापर करून पाहा. काही लोकं डार्क घालवण्यासाठी केमिकल ब्यूटी उत्पादनांचा वापर करून पाहतात (Skin Care Tips). पण यामुळे डोळ्यांना इजा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर आपण देखील डार्क सर्कलमुळे त्रस्त असाल तर, सौंदर्य उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा मधाचा वापर करून पाहा.

मधातील गुणधर्म चेहरा क्लिन करेल (Beauty Tips). शिवाय डार्क सर्कलही गायब होतील(Natural, effective remedy of honey to lighten dark circles).

चेहऱ्यासाठी मध म्हणजे वरदान

चेहऱ्यावर गोल्डन ग्लो यासह डार्क सर्कलपासून सुटका हवी असेल तर, आपण मधाचा वापर करून पाहू शकता. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात.

केस गळतीला वैतागलात? घरात तयार करा अँटी हेअर फॉल ऑईल; केसांना मिळेल नवीन जीवनदान

डार्क सर्कल घालवण्यासाठी मधाचा वापर कसा करावा?

मध आणि लिंबू

डार्क सर्कल घालवण्यासाठी आपण मध आणि लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत समप्रमाणात लिंबाचा रस आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. तयार मिश्रण डोळ्यांखाली लावा, व २ ते ३ मिनिटांसाठी मसाज करा. यानंतर पाण्याने पेस्ट काढा. आपण याचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ऍसिड त्वचेवरील डाग काढण्यास मदत करतात.

ब्रायडल गोल्डन ग्लो हवाय? मग मधात मिसळा २ गोष्टी; दिसाल इतके सुंदर की..

मध आणि एलोवेरा

मध आणि एलोवेरा जेल डार्क सर्कल घालवण्यासाठी मदत करतात. यासाठी एका वाटीत समप्रमाणात मध आणि एलोवेरा जेल घेऊन मिक्स करा. तयार पेस्ट डोळ्यांखाली लावा. १० ते १५ मिनिटानंतर पाण्याने पेस्ट घालवा. आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. कोरफडीमध्ये अनेक गुणधर्म असतात. त्यात व्हिटॅमिन ए, सी, ई, फॉलिक ॲसिड, कोलीन, बी १, बी २, बी ३ आणि बी ६ व व्हिटॅमिन बी १२ आढळते. जे चेहऱ्याला नवीन जीवनदान देते.

Web Title: Natural, effective remedy of honey to lighten dark circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.