आपण सेलिब्रिटींना पाहून आपल्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासारखे केस आपल्याला हवे असतात. त्वचाही तशीच हवीहवीशी वाटते. (Mrunal Thakur says apply this oil every day, forget about other products)मग आपण विविध महागातील प्रॉडक्ट वापरतो. अनेक अभिनेत्री केसांना एक्सटेंशन लावतात त्यामुळे त्यांचे केस मस्त भरगच्च दिसतात. तसेच ज्या महाग प्रॉडक्ट्सच्या जाहिराती आपण बघतो, त्या खऱ्याच असतील असे नाही. (Mrunal Thakur says apply this oil every day, forget about other products)आठवड्याभरात केस गळायचे थांबतील वगैरे असे दावे खोटे असतात. अनेक सेलिब्रिटी या कंपनीचे प्रॉडक्ट वापरा, हे करा ते करा सांगत असताना, मृणाल ठाकूरने मात्र वेगळाच पर्याय सांगितला आहे.
मृणाल म्हणते, मी अजिबात कोणतं एक्सटेंशन वापरत नाही. माझे केस खुप छान आहेत. कारण मी कोणतेही प्रॉडक्ट वापरत नाही, फक्त आपला भारतीय पर्याय वापरते. मी केसांना मस्त तेल चापून लावते. असे मृणालने सांगितले. केसांना तेल लावणे महिलांना आवडत नाही. मात्र केसांसाठी तेल फार गरजेचे असते. मृणाल ठाकूरने सांगितले की, इतर प्रॉडक्ट्स बाजूला ठेवा काहीच वापरायची गरज नाही. फक्त बदामाचे तेल वापरा. त्वचा आणि केस दोन्हीसाठी फार फायदेशीर ठरेल. बाकी काही वापरायची वेळच येणार नाही.
बदामाचे तेल हे त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी फायद्याचे असते. तसेच बदामाचे तेल अँण्टी एजिंग आहे. बदामाच्या तेलामध्ये जीवनसत्त्व 'ई' भरपूर प्रमाणात असते. तसेच या तेलामध्ये भरपूर मॅग्नेशियम असते. इतरही अनेक खनिजे या तेलामध्ये असतात. बदामाच्या तेलामध्ये झिंक असते. या सगळ्या गुणधर्मांमुळे बदामाचे तेल केसांसाठी तसेच त्वचेसाठी फार फायदेशीर ठरते. त्वचेवरील डाग तसेच मुरूम बदामाच्या तेलामुळे गायब होतात. त्वचा छान मऊ होते. त्वचा जर कोरडी पडत असेल तर, त्वचेला गरजेची असणारी आर्द्रता या तेलामुळे मिळते. उन्हामुळे होणारी त्वचेची जळजळ बंद होते. बदाम तेल पुरळ, फोड सगळेच बरे करते.
केसांसाठी बदामाचे तेल अतिशय फायद्याचे ठरते. केसांशी संबंधी सगळ्या समस्या बऱ्या होतील. केस जर फार गळत असतील तर, केसांची गळती थांबून आरोग्य वाढेल. पांढर्या केसांचेही प्रमाण कमी होईल. केस पुन्हा छान काळेभोर दिसायला लागतील. तुटक केसांना पोषण मिळेल. मात्र आठवड्याभरात असे काही होणार नाही सातत्याने काही महिने बदामाचे तेल वापरा. मग मिळणारे फायदेही कायमस्वरूपी असतील.