lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > ना शॅम्पू, ना महागड्या ट्रिटमेंट; या डाळींच्या सेवनानं मिळतील लांबसडक केस, फायदे वाचून व्हाल अवाक्

ना शॅम्पू, ना महागड्या ट्रिटमेंट; या डाळींच्या सेवनानं मिळतील लांबसडक केस, फायदे वाचून व्हाल अवाक्

मुगाच्या डाळीनं केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.  कारण त्यात प्रोटिन्सह, एंटीऑक्सिडेंट्स, मॅग्नीशियम, कॉपर, पोटॅशियम, विटमिन-बी असते. त्यामुळे केसांना पोषण मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 06:08 PM2021-05-17T18:08:55+5:302021-05-17T18:33:43+5:30

मुगाच्या डाळीनं केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.  कारण त्यात प्रोटिन्सह, एंटीऑक्सिडेंट्स, मॅग्नीशियम, कॉपर, पोटॅशियम, विटमिन-बी असते. त्यामुळे केसांना पोषण मिळते.

Moong dal hair care use moong dal in your daily diet and hair mask to grow your hair fast | ना शॅम्पू, ना महागड्या ट्रिटमेंट; या डाळींच्या सेवनानं मिळतील लांबसडक केस, फायदे वाचून व्हाल अवाक्

ना शॅम्पू, ना महागड्या ट्रिटमेंट; या डाळींच्या सेवनानं मिळतील लांबसडक केस, फायदे वाचून व्हाल अवाक्

Highlightsमुगाच्या डाळीनं केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.  कारण त्यात प्रोटिन्सह, एंटीऑक्सिडेंट्स, मॅग्नीशियम, कॉपर, पोटॅशियम, विटमिन-बी असते. 

केसांना लांब आणि दाट बनवण्यासाठी प्रोटिन्सचीआवश्यकता असते. डाळी, प्रोटीन्सचे  सगळ्यात उत्तम स्त्रोत आहेत. यापैकी काही खास डाळी आहेत ज्या रोजच्या आहारात खाल्ल्या गेल्या आणि केसांवर लावल्या गेल्या की केस फार लवकर वाढतात, दाट होतात आणि त्यांचे गळणे कमी होतो. मुग डाळ खाल्ल्यानं शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. सतत केसांनाही फायदा मिळतो. आज आम्ही तुम्हाला केसांसाठी मुगाची डाळ किती फायदेशीर ठरते याबाबत सांगणार आहोत. (Reduce Hair Fall With Moong Dal)

मुगाच्या डाळीनं केसांवर चांगला परिणाम होतो

मुगाच्या डाळीनं केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.  कारण त्यात प्रोटिन्सह, एंटीऑक्सिडेंट्स, मॅग्नीशियम, कॉपर, पोटॅशियम, विटमिन-बी असते. त्यामुळे केसांना पोषण मिळते. केस गळणं, पातळ केस, केस कोरडे पडणं, केसांना फाटे फुटणं, कोंडा होणं अशा समस्या कमी होतात.  मुगाच्या डाळीत मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व असतात. त्यामुळे केसांचे गळणे कमी होण्यास मदत होते. आयरन, कॅल्शियम आणि मॅग्निशियमच्या कमतरतेमुळे केस मोठ्या  प्रमाणात गळतात. 

मुग डाळ खाण्याची योग्य पद्धत

वेगवेगळ्या प्रकारे आठवड्यातून  ५ ते ६ वेळा मुग डाळीचे पदार्थांचे सेवन करू शकता. एकाच डाळीचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही इन्जॉय करू शकता. मुग डाळीचा डोसा, उकळलेले मुग, सॅलेड, चाट तयार करून तुम्ही या पौष्टीक कडधान्यांचा आनंद घेऊ शकता.

यावेळी खाल्यास अधिक लाभ मिळणार

उन्हाळ्याच्या दिवसात रात्री मूगडाळ खाल्ल्यास अधिक फायदा होतो. परंतु हे लक्षात ठेवा की जेव्हा हा नियम जास्त उष्णता असेल तेव्हाच लागू होतो. मूग डाळ हिवाळ्याच्या दिवसात रात्री खाऊ नये, त्या वेळी यामुळे शरीरात वेदना जाणवू शकतात. जर तुम्ही जेवणात मुगाचा समावेश करत असाल तर दुपारी खाण्याचा प्रयत्न करा. 

मुगाच्या डाळीचा हेअर मास्क असा बनवा

मूग डाळीचा  हेअर मास्क तयार करण्यासाठी प्रथम  कुकरमध्ये मुग डाळीची एक शिटी काढून शिजवून घ्या नंतर पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये दही, मध, अर्धा लिंबू आणि १ चमचा नारळ तेल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट ३० ते ४० मिनिटे डोक्याला लावा आणि नंतर केस कोमट पाण्यासह शॅम्पनं केस धुवा. आपण हा मास्क आठवड्यातून तीन ते चारवेळा केसांना लावला तर फरक नक्कीच दिसून येईल. कमीत कमी वेगळात केस लांब आणि दाट होण्यास मदत होईल.

मूग डाळीच्या सेवनानं मिळणारे इतर फायदे

मूग डाळ खाल्यानं केसांची लांबी वाढण्यासह इतर त्वचेलाही फायदे मिळतात.

त्वचा हायड्रेट राखण्यास  मदत मिळते.

त्वचेतील प्रोटिन्सची कमतरता पूर्ण होऊन त्वचा ग्लो करते. 

नखं अधिक चमकदार होतात. 

चेहरा आणि त्वचा टवटवीत दिसते. 

 

Web Title: Moong dal hair care use moong dal in your daily diet and hair mask to grow your hair fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.