Malaika Arora Skin Hack: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्विट असते. आपल्या इन्स्टा अकाऊंटवर मलायका नेहमीच त्वचेसंबंधी टिप्स आणि हॅक्स शेअर करत असते. मलायकानं तिच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये त्वचेसंबंधी असाच एक खास उपाय सांगितला आहे. बऱ्याच जणांना सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा सुजलेला दिसतो. अनेकदा तर बराचवेळ सूज जातही नाही. ज्यामुळे व्यक्ती थकलेली आणि आजारी दिसते. मलायकानं हीच सकाळी चेहऱ्यावर दिसणारी सूज कमी करण्यासाठी उपाय सांगितला आहे.
मलायकानं सांगितलं की, 'अनेकदा असं होतं की, जेव्हा मी झोपेतून उठते तेव्हा चेहरा सुजलेला दिसतो. बरेच लोक चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी बर्फ लावतात. एखाद्या बाउलमध्ये ते बर्फ टाकतात आणि त्यात चेहरा काही वेळ बुडवतात. पण मी असं करत नाही'. मलायकानं सांगितलं की, तिला सायनसची समस्या आहे. अशात बर्फाचा वापर समस्या आणखी वाढवू शकतो.
मग काय करते मलायका?
मलायकानं सांगितलं की, 'चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी मी एक सोपा उपाय फॉलो करते. यासाठी तुम्हाला दोन रबर बॅंडची गरज लागेल. सकाळी दोन रबर बॅंड घेऊन कानांच्या चारही बाजूने बांधा. हा उपाय करून चेहऱ्यावरील सूज बरीच कमी होते. त्वचा टाइट दिसू लागते'. मलायका सांगते की, 'रबर बॅंड जेवढा टाइट बांधाल तेवढा फायदा जास्त मिळेल. कारण यानं त्वचेची स्किन खेचली जाते'.
व्हिडिओत मलायकानं पुढे सांगितलं की, 'हा उपाय फायदेशीर ठरतो कारण आपले कान आणि मानेच्या आजूबाजूला लिम्फ नोड्स असतात. जे सूज कमी करण्यास आणि शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत करतात. जेव्हा आपण कानांवर रबर बॅंड बांधतो तेव्हा हे लिम्फ ड्रेनेज प्रोसेस वाढवतात. अशात तुम्ही मेकअप करण्याआधी काही वेळासाठी रबर बॅंड बांधून ठेवू शकता. काही वेळानं तुम्हाला चेहऱ्यावरील सूज कमी झालेली दिसेल'.