Join us

त्वचेवर लिंबू लावण्याआधी त्वचेचा पोत ओळखा, लिंबामुळे त्वचा होऊ शकते निस्तेज, 'या' लोकांनी घ्यावी खास काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2025 19:59 IST

Know your skin texture before applying lemon to your skin, lemon can make your skin dull : त्वचेवर लिंबू लावण्याआधी लक्षात घ्या या काही बाबी.

लिंबाचा रस हा सौंदर्यवर्धक उपाय म्हणून वर्षानुवर्षे वापरला जातो आहे. आजही अनेकजण त्वचा उजळण्यासाठी, डाग कमी करण्यासाठी किंवा केसांवरील कोंडा घालवण्यासाठी लिंबाचा वापर करतात. (Know your skin texture before applying lemon to your skin, lemon can make your skin dull)पण हा उपाय जरी जुना आणि नैसर्गिक असला तरी प्रत्येकासाठी योग्यच असेल असे नाही. लिंबाचा रस चुकीच्या पद्धतीने वापरल्यास तो त्वचेवर आणि केसांवर हानीकारक परिणाम करु शकतो.

लिंबात सिट्रिक अॅसिड असते, जे त्वचेवरील तेल, मळ आणि मृत पेशी काढण्यास मदत करते. त्यामुळे तो एक नैसर्गिक क्लेंझर मानला जातो. परंतु हेच आम्ल त्वचेवर जास्त प्रमाणात किंवा थेट लावल्यास जळजळ, खाज, लालसरपणा किंवा त्वचेची झीज होण्यास कारणीभूत ठरु शकते. विशेषतः ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांनी लिंबाचा रस चेहऱ्यावर थेट वापरणे टाळावे. काही वेळा सूर्यप्रकाशात गेल्यास 'फोटोडर्मेटायटिस' नावाची प्रतिक्रिया होऊ शकते, ज्यामुळे त्वचेवर काळे डाग आणि डागांच्या खुणा कायम राहू शकतात.

केसांसाठी लिंबाचा रस वापरण्याचा सल्ला अनेक घरगुती उपायांमध्ये दिला जातो. तो कोंडा कमी करतो आणि टाळू स्वच्छ ठेवतो, पण त्यातील आम्लामुळे केसांच्या नैसर्गिक ओलाव्याचा समतोल बिघडू शकतो. दीर्घकाळ वापरल्यास केस कोरडे आणि निस्तेज होऊ शकतात. ज्यांचे केस आधीच कोरडे किंवा रंगवलेले आहेत, त्यांनी लिंबाचा रस वापरु नये. केसांना लावलेला रंग खराब होतो. 

काहीजण त्वचा उजळण्यासाठी लिंबू रोज लावतात, पण तो जास्त वेळा वापरल्याने त्वचेची संरक्षणात्मक थर कमी होत जातो. सूर्यप्रकाशातील किरणांपासून होणारे नुकसान वाढते. त्यामुळे त्वचा लवकर वयस्कर दिसते आणि डाग कायम राहतात. म्हणूनच लिंबाचा रस सौंदर्यवर्धक म्हणून वापरताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तो थेट न लावता इतर नैसर्गिक घटकांमध्ये, जसे की मध, गुलाबपाणी, बेसन किंवा कोरफड यांच्यासोबत मिसळून वापरणे अधिक सुरक्षित ठरते. त्यामुळे लिंबू वापरताना काळजी घ्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Know your skin before applying lemon; it can cause damage.

Web Summary : Lemon juice can lighten skin, but it can cause irritation, dryness, and sun damage if used incorrectly, especially on sensitive skin. Mix with natural ingredients and use cautiously.
टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यत्वचेची काळजीब्यूटी टिप्स