Join us

दिवाळीच्या सुट्टीत उन्हांत खेळून मुलांची त्वचा झाली टॅन? १ घरगुती उपाय - रापलेली त्वचाही होईल उजळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2025 15:29 IST

How to Clean Blackness on Kids : kids skincare tips for tan removal : दिवाळीच्या सुट्टीत उन्हात खेळून मुलांच्या टॅन झालेल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सोपा आणि परिणामकारक घरगुती उपाय...

दिवाळीची सुट्टी! म्हणजे मुलांसाठी मजा, मस्ती आणि खूप सारे खेळ, फटाके उडवणं असो, मित्रांसोबत सायकल चालवणं असो किंवा अंगणात खेळणं... मुलांच्या उत्साहाला कसलीही सीमा नसते. पण या धावपळीत, खेळण्याच्या नादात मुलं उन्हाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. पण या काळात सतत उन्हात राहिल्यामुळे त्यांच्या नाजूक त्वचेवर टॅनिंग येतं, त्वचा काळपट दिसू लागते आणि कोरडेपणा वाढतो. मुलांची नाजूक त्वचा उन्हामुळे काळपट झालेली दिसते आणि त्वचेवर उन्हाचे चट्टे, टॅनिंग स्पष्टपणे दिसू लागतात(kids skincare tips for tan removal).

लहान मुलांची त्वचा खूपच नाजूक असते आणि म्हणूनच बाजारातील केमिकलयुक्त क्रीम्स मुलांच्या त्वचेसाठी योग्य नसतात, यासाठी नैसर्गिक आणि घरगुती उपाय वापरणं केव्हाही सर्वात सुरक्षित ठरते. मुलांच्या नाजूक त्वचेवर कोणत्याही केमिकलशिवाय टॅनिंग कमी करण्यासाठी आपण एक घरगुती, सुरक्षित उपाय नक्कीच करु शकतो. आपल्या स्वयंपाकघरातच असे काही अनेक घटक असतात जे त्वचेवरील काळेपणा कमी करून मुलांची त्वचा पुन्हा मऊ, उजळ आणि तजेलदार बनवतात. दिवाळीच्या सुट्टीत उन्हात खेळून मुलांच्या टॅन झालेल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सोपा आणि परिणामकारक घरगुती उपाय पाहूयात... 

चिंचेचा कोळ आणि मध यांच्या एकत्रित मिश्रणाने त्वचेवरील टॅनिंग कसे काढावे... 

उन्हामुळे त्वचेवर आलेले टॅनिंग काढण्यासाठी आपण अनेक महागड्याब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करतो. पण बऱ्याचदा आपल्या स्वयंपाकघरातच असे काही नैसर्गिक घटक असतात, जे कमी खर्चात आणि सुरक्षितपणे त्वचेला पूर्वीसारखा ग्लो परत देतात. चिंचेचा कोळ आणि मध हे असेच दोन खास पदार्थ आहेत, ज्यांचे मिश्रण टॅनिंग दूर करण्यासाठी उत्कृष्ट घरगुती उपाय आहे.

पन्नाशीतही माधुरीच्या चेहऱ्यावरील ग्लो आहे टिकून! करते फक्त ६ गोष्टी दररोज - म्हणून दिसते आजही सुंदर... 

आवश्यक असणारे साहित्य :- 

चिंचेचा कोळ १ मोठा चमचा (तयार चिंचेचा कोळ किंवा चिंच गरम पाण्यात भिजवून केलेला कोळ), १ छोटा चमचा मध, पर्यायी घटक १ छोटा चमचा बेसन किंवा दही, तेलकट त्वचेसाठी बेसन तर कोरड्या त्वचेसाठी दही उत्तम. एका वाटीत चिंचेचा कोळ घ्या. त्यात मध आणि  बेसन/दही मिसळा. सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून एक मऊ पेस्ट तयार करा. ही पेस्ट जास्त पातळ नसावी.

कोमट पाण्याने तुमचा चेहरा आणि टॅन झालेली जागा (उदा. मान, हात) स्वच्छ करा. तयार केलेला फेस पॅक टॅनिंग झालेल्या भागावर आणि चेहऱ्यावर जाडसर लावा. डोळ्यांभोवतीची नाजूक त्वचा टाळा. हा पॅक १५ ते २० मिनिटे पूर्णपणे सुकू द्या. पॅक सुकल्यावर, तो घासून काढू नका. थंड पाण्याने हलका मसाज करत गोलाकार दिशेने फिरवत पॅक स्वच्छ धुवा. त्वचा स्वच्छ केल्यानंतर लगेचच मॉइश्चरायझर लावा. हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा नियमितपणे केल्यास,  काही दिवसांतच त्वचेच्या रंगात आणि टॅनिंगमध्ये फरक जाणवेल. त्वचेवरील डाग कमी होतील आणि नैसर्गिक चमक परत येईल.

प्रेशर कुकरमध्ये १५ मिनिटांत करा झटपट साजूक तूप! तासंतास लोणी कढवण्याची पद्धत झाली जुनी - पाहा सोपी युक्ती...    

हा उपाय नेमका कसा फायदेशीर... 

१. चिंचेमध्ये नैसर्गिकरित्या 'टार्टारिक अ‍ॅसिड' असते. हे त्वचेचे नैसर्गिक एक्सफोलिएशन करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेवरील डेड स्किन आणि काळवंडलेला टॅनिंगचा थर लगेच निघून जातो. चिंचेत असलेले घटक त्वचेचा रंग उजळण्यास मदत करतात आणि त्वचेवरील काळे डाग कमी करतात.

२. टॅनिंगमुळे त्वचा अनेकदा लालसर आणि कोरडी होते. मधामध्ये दाह-शामक गुणधर्म असतात, जे त्वचेला थंडावा देतात. मध त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते. चिंच एक्सफोलिएट करत असताना, मध त्वचेला कोरडे पडू देत नाही.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीघरगुती उपायलहान मुलंपालकत्व