Lokmat Sakhi >Beauty > रोज गळून केस विरळ झाले? जावेद हबीब सांगतात १ कांदा या पद्धतीनं लावा, लांब-दाट होतील केस

रोज गळून केस विरळ झाले? जावेद हबीब सांगतात १ कांदा या पद्धतीनं लावा, लांब-दाट होतील केस

Jawed Habib Hair Fall Control Top 3 Tips (How to Grow Hairs Faster) :हेअर केअर उत्पादनांचा वापर, स्काल्प स्वच्छ ठेवण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे केस तुटणं कमी होतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 14:08 IST2025-09-15T13:57:33+5:302025-09-15T14:08:21+5:30

Jawed Habib Hair Fall Control Top 3 Tips (How to Grow Hairs Faster) :हेअर केअर उत्पादनांचा वापर, स्काल्प स्वच्छ ठेवण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे केस तुटणं कमी होतं.

Jawed Habib Shared Hair Fall Control Top 3 Tips How Effective Fresh Onion Juice on Scalp | रोज गळून केस विरळ झाले? जावेद हबीब सांगतात १ कांदा या पद्धतीनं लावा, लांब-दाट होतील केस

रोज गळून केस विरळ झाले? जावेद हबीब सांगतात १ कांदा या पद्धतीनं लावा, लांब-दाट होतील केस

केस गळणं (Hair Fall) सौंदर्यासाठी नुकसानाकारक ठरतं. एकदा केस गळायला लागले की १५ दिवस ते महिनाभर विंचरताना किंवा धुताना गळत राहतात. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये हेअर फॉल कंट्रोल करण्याचे उपाय सांगितले होते. यात ते आपल्या चाहत्यांना जास्त हिट स्टायलिंग टाळणं, जेंटल हेअर केअर उत्पादनांचा वापर, स्काल्प स्वच्छ ठेवण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे केस तुटणं कमी होतं. त्यांनी या पोस्टमध्ये हेअरफॉल सोल्यूशन असं कॅप्शन दिलं आहे. (Jawed Habib Hair Fall Control Top 3  Tips How Effective Fresh Onion Juice on Scalp)

केस गळणं थांबवण्याचे 3 उपाय कोणते

आपल्या केसांची लांबी कमी ठेवा. केस रोज कंडिशनर लावून मग धुवा. केस धुण्याआधी केसांवर ताजा कांद्याचा रस लावा. केस छोटे ठेवल्यानं केस गळणं कमी होतं आणि हेअरफॉल नियंत्रणात येण्यासही मदत होते. जावेद यांनी घामामुळे केसांमध्ये होणारा कोंडा आणि केस गळती रोखण्यासाठी रोज केस धुण्याचा सल्ला दिला आहे.

आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी एंटी फंगल, एंटी बॅक्टेरिअल प्रॉपर्टीजसाठी केस धुण्याआधी स्काल्पवर मोहोरीच्या तेलाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी ओल्या केसांना 5 ते 10 मिनिटं मोहोरीचं तेल लावून नंतर धुण्याचा सल्ला दिला आहे.

कांद्याचा रस लावल्यानं खरंच केस गळती थांबते का?

केसांना कांद्याचा रस लावणं एक हा एक जुना प्रसिद्ध उपाय आहे. हेल्दी हेअर ट्रिटमेंटसाठी हा उपाय केला जातो. केसांची काळजी घेण्यासाठी हेअर वॉश करण्याआधी केसांना ताजा कांद्याचा रस लावायला हवा. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार कांद्याचा रस केसांना लावल्यानं केस गळती थांबवण्यास मदत होते. कांद्यात डाएटरी सल्फरचे प्रमाण असते जे शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे. सल्फर अमिनो एसिड्समध्ये असते.

जया किशोरी केसांना लावतात किचनमधले २ पदार्थ; घनदाट-सुंदर केसांचं गुपित घरगुती पदार्थांत

जे एक प्रोटीन कंपोनेंट आहे. खासकरून केराटीनमध्ये सल्फर मोठ्या प्रमाणात  असते. जे मजबूत केसांसाठी आवश्यक असते. स्काल्पवर लावल्यानं केस गळती थांबते आणि केसांचा चांगला विकास होण्यासही मदत होते. कांद्यातील सल्फर कोलोजन प्रोडक्शन वाढवते. कोलोजन हेल्दी स्किन सेल्स प्रोडक्शन आणि हेअर ग्रोथमध्ये मदत करते. 

Web Title: Jawed Habib Shared Hair Fall Control Top 3 Tips How Effective Fresh Onion Juice on Scalp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.