प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब (Jawed Habib) त्यांच्या सौंदर्य आणि केसांच्या टिप्ससाठी ओळखले जातात. अलिकडेच त्यांनी एक साध्या नैसर्गिक उपायाबद्दल माहिती दिली आहे (Skin Care Tips). जो चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. बटाट्याची सालं वापरून सुरकुत्या कमी करण्यासाठी इंस्टाग्रावर एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.
बटाट्याच्या सालीमध्ये अनेक महत्वपूर्ण जीवनसत्वे असतात यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात जे त्वचेसाठी खूप फायदेशीर फायदेशीर ठरतात. बटाट्याच्या सालीत स्टार्च असते जे त्वचेला ओलावा देते आणि त्वचा टाईट, सॉफ्ट बनवण्यास मदत करते. (Jawed Habib Says Apply Potato On Your Face to Get Rid Of Pigmentation)
जावेद हबीब यांनी सांगितल्यानुसार बटाट्याच्या सालीचा हा उपाय करणं एकदम सोपं आहे. एका बटाट्याचे साल काळजीपूर्वक काढून घ्या. ही साल चेहऱ्याच्या ज्या भागावर सुरकुत्या आहेत. त्या भागावर हलक्या हातानं आणि गोल आकारात मसाज करत घाला. सुमारे ५ ते १० मिनिटं मसाज करू शकता. मसाज झाल्यानंतर चेहरा साध्या पाण्यानं स्वच्छ धुवा.
इडलीवाल्याकडे मिळते तशी परफेक्ट नारळाची चटणी घरीच करा; पाहा सोपी-झटपट रेसिपी
बटाट्याची सालं त्वचेला नैसर्गिकरित्या उजळवण्यास मदत करतात तसंच त्वचेचं पोषणही करतात. नियमितपणे हा उपाय केल्यास त्वचेची लवचीकता सुधारते आणि सुरकुत्या कमी होण्यासही मदत होते असा त्यांचा दावा आहे .हा उपाय नैसर्गिक असला तरी कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी आपल्या त्वचा रोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच उत्तम ठरतं.
बटाट्याच्या सालीचे त्वचेसाठी फायदे
बटाट्याचे साल आपण सहसा फेकून देतो पण जावेद हबीब सांगतात की यामध्ये त्वचेसाठी उपयुक्त अशी अनेक पोषक तत्व आहेत. बटाट्याच्या सालीमुळे जीवनसत्व बी, बी-कॉप्लेक्स आणि पोटॅशियम तसंच भरपूर एंटी ऑक्सिडेंट्स असतात.
बटाट्याच्या सालीतील नैसर्गिक घटक त्वचेची लवचीकता सुधारण्यास मदत करतात. ज्यामुळे सुरकुत्या कमी करण्यास मदत होते आणि एंटी ऑक्सिडेंट्स फ्री रॅडिकल्सशी लढण्यासही मदत करतात. जे त्वचा लवकर वृद्ध होण्यास कारणीभूत ठरतात.
बटाट्याच्या सालीतले कॅटेकोलेझ आणि कोजिक एसिड यांसारखी नैसर्गिक संयुगं त्वचेवरील काळे डाग, टॅनिंग, पिग्मेंटेनशन कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे त्वचा अधिक उजळदार आणि तेजस्वी दिसते. बटाट्यात पाण्याचे प्रमाण चांगले असल्यामुळे त्याचे साल त्वचेला नैसर्गिक ओलावा देते आणि त्वचा कोरडी पडत नाही तसंच मऊ राहते.
