Winter Bath Skin Health : थंडीला सुरूवात झाली की, बऱ्याच लोकांना आंघोळीचा कंटाळा येतो. तशी रोज आंघोळ करण्याची सवय आरोग्य आणि त्वचेसाठी फायदेशीर असते. पण थंडीत अनेकांना कंटाळा येतो. बरेच लोक आंघोळीचा कंटाळा करतात म्हणून घरातील मोठ्यांचा ओरडाही खातात. पण आता आंघोळीवरून ओरडा खाण्याची गरज पडणार नाही. कारण नव्याने करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार रोज आंघोळ करण्याची गरज नाही. फॅटलॉस कोच हर्षित राजने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने सांगितलं आहे की, रोज आंघोळ का करू नये. या व्हिडिओत 'फॅमिली मॅन-3' मधील अभिनेते मनोज वाजपेयी, जयदीप अहलावत आणि अभिनेत्री प्रियामणि गमतीदारपणे यावर भाष्य करत आहेत.
रोज आंघोळ करू नये का?
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत अभिनेता मनोज वाजपेयी सांगतात की, नवीन रिसर्च आला आहे की, रोज आंघोळ करू नये. त्यानंतर प्रियामणि म्हणते की, आपण रोज आंघोळ करणं गरजेचं नाहीये, तीन दिवसातून एकदा आंघोळ करणं पुरेसं आहे. रोज आंघोळ केल्याने शरीराला अनेक नुकसान होतात. त्यामुळे रोज आंघोळ करणं टाळलं पाहिजे.
हिवाळ्यात रोज आंघोळ करणं नुकसानकारक असतं का?
अलिकडेच करण्यात आलेल्या डर्मेटेलॉजीच्या एका रिसर्चनुसार, हिवाळ्यात रोज आंघोळ न केल्यास आपलं लाइफपॅन ३४ टक्क्यांनी वाढू शकतं. हिवाळ्यात जेव्हा आपण रोज आंघोळ करतो, तेव्हा त्वचेवरील नॅचरल ऑइल नष्ट होतं. हेच ऑइल त्वचा कोरडी होण्यापासून, बॅक्टेरियापासून आणि इन्फेक्शन होण्यापासून त्वचेचा बचाव करतं. त्यामुळे रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, हिवाळ्यात रोज आंघोळ करणं गरजेचं नाही. आठवड्यातून २ ते ३ वेळा शॉवर घेणं पुरेसं आहे.
रोज आंघोळ करण्याचे नुकसान
- रोज आंघोळ केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते. गरम पाण्यामुळे त्वचेवरील नॅचरल ऑइल नष्ट होतं.
- प्रोटेक्टिव ऑइल लेअर नसल्याने त्वचा अधिक संवेदनशील होते. इन्फेक्शन आणि बॅक्टेरियाचा धोका अधिक वाढतो.
- त्वचेवरील नॅचरल ऑइल नष्ट झाल्याने त्वचेवर सुरकुत्या आणि ड्रायनेस लवकर येते.
रोज आंघोळीऐवजी काय करावं?
- रोज आंघोळ करण्याऐवजी त्वचा मॉइश्चरायजरने हायड्रेट करा. खासकरून हात, पाय आणि चेहऱ्यावर हे नक्की लावा.
- त्वचेवर रोज धूळ, घाम जमा होतो. त्यामुळे हात आणि चेहरा रोज धुवा. बाकी शरीर साफ करण्यासाठी आठवड्यातून २ ते ३ वेळा शॉवर घ्या.
- हिवाळ्यात गरम पाणी आवश्यक आहे. पण जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा ड्राय होते आणि त्वचेसंबंधी अनेक समस्याही होऊ शकतात.
- रोज आंघोळ करण्याऐवजी कपडे स्वच्छ ठेवा आणि अंडरगारमेंट्स रोज बदला.
- जर आपण रोज जिमला जात असाल किंवा व्यायाम करत असाल तर वर्कआउटनंतर थोडावेळ शॉवर घेऊ शकता.
