Join us

स्वच्छ घासूनही दात पिवळे दिसतात? पांढऱ्याशुभ्र दातांसाठी टुथपेस्टमध्ये 'हा' पदार्थ मिसळा आणि पाहा फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 18:45 IST

How to Whiten Teeth Naturally : दात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबापेक्षा चांगला पर्याय नाही. कडुनिंब रोज वापरल्याने दात चमकदार दिसू लागतील.

कोणाच्याही समोर गेल्यानंतर चेहरा आपलं इंप्रेशन असते. जर हसल्यानंतर दात पिवळे दिसत असतील तर चारचौघात लाज वाटते. अनेकदा स्वच्छ घासूनही दात पिवळट दिसतात. (How do you properly clean your teeth) पिवळ्या दातांना पांढरे करण्यासाठी अनेक डेंटल ट्रिटमेंट्स आहेत पण या ट्रिटमेंट्स खूपच खर्चिक असतात. काही घरगुती तुम्हाला पांढरेशुभ्र दात मिळवून देऊ शकतात. ओरल हायजिनचा अभाव, जास्त चहा, कॉफी पिणं, स्मोकींग, जेनेटीक्टक्स पिवळ्या दातांसाठी कारणीभूत ठरतं.(How to Whiten Teeth Naturally)

मीठ आणि राईचं तेल

दातांचा पिवळपटपणा दूर करण्यासाठी मीठ आणि राईच्या तेलाचा उपाय फायदेशीर आहे. अर्धा चमचा मीठ आणि काही थेंब राईचं तेल मिसळा. आता हे मिश्रण आपल्या दातांवर लावून मसाज करा. ही प्रक्रिया आठवड्यातून एकदा करा, तुम्हाला फरक जाणवेल.

बेकिंग सोडा

दातांचा पिवळटपणा दूर करण्यासाठी एक चिमुटभर बेकींग सोडा टुथपेस्टमध्ये मिसळून ब्रश करा. दातांवर जमलेला पिवळा थर निघून जाईल. एका आठवड्यातून कमीत कमी २ वेळा तुम्ही हा उपाय करू शकता.

स्ट्रोबेरी

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की स्ट्रॉबेरी खाण्यासोबतच दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठीही ते उपयुक्त आहे. यासाठी स्ट्रॉबेरी मॅश करून दातांवर चोळा. ब्रश वापरून दात स्वच्छ करा. या प्रक्रियेनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुण्यास विसरू नका.

कडुनिंबाची काडी

दात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबापेक्षा चांगला पर्याय नाही. कडुनिंब रोज वापरल्याने तुमचे दात चमकदार दिसू लागतील.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य