तुमचे केस आणि त्वचा यांचं सौंदर्य टिकवून ठेवण्याचा सगळ्यात सोपा आाणि स्वस्त उपाय म्हणजे खोबरेल तेल. त्यामुळे आपल्या महिन्याच्या किराणा यादीमध्ये खोबरेल तेल असतेच. दक्षिण भारतात तर खोबरेल तेलाचा आपल्यापेक्षाही खूप जास्त वापर केला जातो. तिथले लोक केसांना आणि त्वचेला नियमितपणे खोबरेल तेल लावून मसाज करतात. त्यामुळेच तर त्यांची त्वचा तुकतुकीत असते तर केस अगदी दाट आणि काळेभोर असतात. तुम्हालाही विकतचं केमिकल्स असणारं खोबरेल तेल नको असेल तर घरच्याघरी नारळपासून खोबरेल तेल तयार करण्याची ही पद्धत एकदा बघाच (how to make pure coconut oil at home?). आपण लोण्यापासून तूप जेवढ्या सहजतेने काढतो (simple trick to make pure virgin coconut oil at home), तेवढ्याच सहजतेने घरच्याघरी नारळाचं तेलही काढता येतं..(South Indian style of making coconut oil at home)
घरीच खोबरेल तेल किंवा नारळाचं तेल तयार करण्याची पद्धत
घरच्याघरीच फ्रेश नारळं वापरून तेल कसं तयार करायचं याची रेसिपी mummagadekar या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
यासाठी २ ते ३ नारळं घ्या आणि त्याचे बारीक काप करा. नारळाचे काप मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्यामध्ये ते काप बुडतील एवढं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्या.
World TB Day : साधा खोकला समजून दुर्लक्ष करणं पडेल महागात, टीबीची लक्षणं वेळीच ओळखा
आता ही पेस्ट एका सुती कपड्यातून गाळून घ्या जेणेकरून नारळाचं दूध वेगळं निघेल. जो चोथा उरलेला आहे त्यात पुन्हा पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्या आणि पुन्हा एकदा गाळून नारळाचं दूध काढून घ्या.
आता नारळाचं दूध पक्कं झाकण असणाऱ्या एका डब्यात ठेवा आणि तो डबा ३ ते ४ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.
त्यानंतर डबा फ्रिजच्या बाहेर काढा. डब्यामध्ये वरच्या बाजुला नारळाच्या दुधाची घट्ट मलाई जमा झालेली दिसेल. ही मलई अलगदपणे कढईमध्ये काढून घ्या आणि ज्याप्रमाणे लोणी कढवतो त्याप्रमाणे नारळाची मलाईसुद्धा कढवा. काही वेळातच मलाईपासून नारळाचं तेल निघालेलं दिसेल.
तरुणपणीच बसता- उठता गुडघे दुखतात? 'या' पद्धतीने चाला- म्हातारपणीही गुडघे दुखणार नाहीत
हे तेल थंड झाल्यानंतर गाळून घ्या आणि बाटलीमध्ये भरून ठेवा. दक्षिण भारतात या तेलाला virgin coconut oil म्हणतात. हे तेल त्वचेला आणि केसांना मालिश करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. लहान बाळांच्या त्वचेला मालिश करण्यासाठीही त्याचा वापर होतो.