Join us

हजारांचं पेडीक्युअर कशाला? २ रुपयांचा शाम्पू आणा अन् घरीच पाय स्वच्छ करा; टॅनिंग होईल दूर आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2024 18:03 IST

How to give yourself a quick pedicure at home by using Shampoo : पाय चमकतील - टॅनिंगही निघेल; २ रुपयांच्या शाम्पूने पेडीक्युअर नेमकं कसं करायचं पाहा..

प्रत्येक जण आपल्या स्किनची पुरेपूर काळजी घेतो (Skin Care). उन्हाळ्यात स्किन टॅन होऊ नये म्हणून, विविध उपाय अवलंबतो. पण चेहरा आणि हाताव्यतिरिक्त आपण पायांकडे दुर्लक्ष करतो (Pedicure). उन्हाळ्यात पाय प्रचंड टॅन होतात. शिवाय हे टॅनिंग सहसा लवकर निघत नाही. पायात जमा झालेली घाण, टॅनिंग काढण्यासाठी आपण पेडीक्युअर करतो. ब्यूटी पार्लरमध्ये पेडीक्युअर केल्याने खूप खर्च होतो.

शिवाय खर्च करूनही लवकर टॅनही होतात. जर आपल्याला ब्यूटी पार्लरमध्ये न जाता घरगुती साहित्यांचा वापर करून पेडीक्युअर करायचं असेल तर, २ रुपयांच्या शाम्पूने आपण पेडीक्युअर करू शकता. पण शाम्पूने पेडीक्युअर नेमकं कसं करायचं? पाहा(How to give yourself a quick pedicure at home by using Shampoo).

पेडीक्युअर करण्यासाठी लागणारं साहित्य

कोमट पाणी

समुद्री मीठ

शाम्पू

१० पैकी १ पदार्थ रोज खा, चाळीशीतही त्वचा दिसेल वीस वर्षांच्या तरुणीसारखीच कोमल-सुंदर

लिंबू

हळद

नेलकटर

अशा पद्धतीने करा पेडीक्युअर

घरात पेडीक्युअर करण्यासाठी प्रथम आपले पाय स्वच्छ पाण्याने धुवा. आता टब अर्धा कोमट पाण्याने भरा. त्यात २ चमचा समुद्री मीठ, शाम्पूचे छोटे पॅकेट आणि अर्धा चमचा हळद घालून मिक्स करा. आता त्या पाण्यात १० मिनिटांसाठी पाय ठेवा. नंतर टबमधून पाय बाहेर काढा आणि अर्धा लिंबू आपल्या पायावर चोळा. निदान ५ मिनिटासाठी लिंबाच्या सालीने पाय स्वच्छ करत रहा.

केस प्रचंड गळतात? पांढरेही होतात? कपभर कडीपत्त्याचा १ सोपा उपाय; केस होतील इतके दाट की..

आता दुसऱ्या टबमध्ये कोमट पाणी भरून घ्या. त्यात पाय ठेवा, व ब्रशने पाय घासा. ब्रशच्या मदतीने घासल्याने टाचांची मृत त्वचा निघून जाईल. काही वेळानंतर आपले पाय पुन्हा एकदा कोमट पाण्याने धुवा, नंतर नेल कटरने नखे कापून आवडता नेल पेंट लावा. अशा प्रकारे घरगुती साहित्यात कमी वेळात, कमी खर्चात पेडीक्युअर होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी