Lokmat Sakhi >Beauty > १० पैकी १ पदार्थ रोज खा, चाळीशीतही त्वचा दिसेल वीस वर्षांच्या तरुणीसारखीच कोमल-सुंदर

१० पैकी १ पदार्थ रोज खा, चाळीशीतही त्वचा दिसेल वीस वर्षांच्या तरुणीसारखीच कोमल-सुंदर

10 Foods That Can Help You Look Younger : तरुण त्वचेचं गुपित; न चुकता १० पैकी १ गोष्ट खा; ब्यूटी पार्लरला जाण्याची गरज भासणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2024 02:57 PM2024-04-02T14:57:31+5:302024-04-02T15:23:23+5:30

10 Foods That Can Help You Look Younger : तरुण त्वचेचं गुपित; न चुकता १० पैकी १ गोष्ट खा; ब्यूटी पार्लरला जाण्याची गरज भासणार नाही..

10 Foods That Can Help You Look Younger | १० पैकी १ पदार्थ रोज खा, चाळीशीतही त्वचा दिसेल वीस वर्षांच्या तरुणीसारखीच कोमल-सुंदर

१० पैकी १ पदार्थ रोज खा, चाळीशीतही त्वचा दिसेल वीस वर्षांच्या तरुणीसारखीच कोमल-सुंदर

त्वचा कायम चिरतरुण राहावी यासाठी बरेच जण विविध गोष्टी करतात (Skin Care Tips). पण महागडे सौंदर्य उतपादानांचा वापर केल्यानेच त्वचा टवटवीत होते असे नाही. आपला आहार देखील तितकाच महत्वाचा आहे (Beauty Tips). पौष्टीक आहार फक्त आरोग्यासाठी नसून, चेहऱ्यासाठी देखील महत्वाची ठरते. स्किन केअर रुटीनसह, आहारात देखील काही बदल करणं गरजेचं आहे.

तज्ज्ञमंडळीच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये पोषक घटकांचा समावेश केल्याने, स्किनच्या निगडीत अनेक समस्या दूर होतात. शिवाय वृद्धत्वाची लक्षणेही कमी होतात. वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी आहारात नेमकं कोणत्या पदार्थांचा समावेश करावा? पाहूयात(10 Foods That Can Help You Look Younger).

वृद्धत्वाची लक्षणे कमी करणारे पदार्थ

- त्वचेवर दिसणारी वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी आपण दोन  पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. ऑलिव्ह ऑइल आणि डार्क चॉकलेट हे दोन पदार्थ आरोग्य आणि स्किनसाठी फायदेशीर ठरते. आपण स्वयंपाकामध्ये ऑलिव्ह ऑइलचा उपयोग करू शकता, आणि डार्क चॉकलेट खाऊ शकता.

- डॉर्क चॉकलेटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म असतात. हे घटक आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

- आपण ऑलिव्ह ऑइलसोबत तुपाचा देखील आहारात समावेश करू शकता. तुपामधील गुणधर्म आरोग्यासाठी पुरेपूर फायदेशीर ठरू शकते.

फायबर आणि सायट्रिक ॲसिड आपल्या त्वचेचं सरंक्षण करते

भूक लागली? कपभर गव्हाचं पीठ-२ कांद्याचे करा झटपट कांदा पराठा; १० मिनिटात डिश रेडी

ॲन्टी एजिंग क्रीम्स वापरण्यासोबतच आपण अँटी-एजिंग पदार्थ खायला हवे. या गोष्टींमुळे आपली त्वचा कायम तुकतुकीत आणि सुंदर दिसू शकते. यामुळे आहारात या गोष्टींचा समावेश जरूर करा.

- दही

- मध

- केळी

- डाळिंब

- लिंबू

आपल्या आहारात अधिक भाज्यांचा समावेश करा. ज्यात फायबरचे प्रमाण जास्त असायला हवे. शिवाय..

- काकडी

- गाजर

- टोमॅटो

- बीटरूट सॅलेड खा.

ग्रीन- टी त्वचेसाठी उत्तम

ग्रीन-टी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते. शिवाय नियमित हा चहा प्यायल्याने त्वचेच्या पेशी निरोगी राहतात. ग्रीन-टी त्वचेची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया वेगवान करते. तसेच त्वचेची चमक आणि आर्द्रता दोन्ही राखण्यास मदत होते. शिवाय या चहामुळे शरूर हायड्रेट राहते.

भूक लागली? कपभर गव्हाचं पीठ-२ कांद्याचे करा झटपट कांदा पराठा; १० मिनिटात डिश रेडी

सुका मेवा आरोग्यासह त्वचेसाठी फायदेशीर

- नियमित मुठभर सुकामेवा खाल्ल्याने आरोग्य आणि स्किनला फायदा होतो. सुका मेवा खाल्ल्याने आपल्याला अँटी-एजिंग क्रीम लावण्याची गरज भासणार नाही. कारण ड्रायफ्रुट्समध्ये आढळणारे पोषक घटक, आपल्याला त्वचेची नैसर्गिक चमक आपोआप वाढवतात.

-विशेषतः काजू, बदाम, मनुका आणि अक्रोड हे चार ड्रायफ्रुट्स रोज खा. तर, दिवसातून दोनदा एक ग्लास दूध प्या. यामुळे कधीही पार्लरमध्ये जाण्याची किंवा फेशियल करण्याची गरज भासणार नाही.

Web Title: 10 Foods That Can Help You Look Younger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.