आपण आपल्या आजुबाजुच्या कित्येक जणी पाहातो, ज्यांची त्वचा खूप छान असते. वय वाढलेलं असलं तरी त्यांच्या त्वचेचा तुकतुकीतपणा, चमकदारपणा किंवा त्वचेचा टाईटनेस कमी होत नाही. त्यामुळे मग वय वाढलं तरी त्या तरुणच दिसतात. त्वचेचं तारुण्य टिकवून ठेवायचं असेल तर त्यासाठी नेहमीच पार्लरला जाऊन महागडं फेशियल किंवा क्लिनअप करून घ्यायला हवं असं नाही (how to get wrinkle free skin?). तर आपण रोजच्या रोज काही गोष्टी नियमितपणे केल्या तरी त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवता येतं. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहूया..(simple home remedies to get young, beautiful and glowing skin)
त्वचेचं तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी साध्या सोप्या गोष्टी...
१. त्वचा कोमल, तुकतुकीत ठेवायची असेल तर ती हायड्रेटेड ठेवणं खूप गरजेचं आहे. यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्या. यामुळे शरीर शुद्ध व्हायलाही मदत होते. शरीर आतून शुद्ध असेल तर त्याचा परिणाम आपोआपच त्वचेवर दिसूनयेतो.
केस गळणं नैसर्गिकपणे थांबेल आणि वाढतीलही भराभर, रोज ५ गोष्टी करा- केस होतील दाट, लांब
२. हंगामी फळं खायला हवीत. अगदी रोजच्या रोज एखादं तरी फळं खायला हवं. फळांमध्ये व्हिटॅमिन सी, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि त्याशिवाय इतरही अनेक खनिजे असतात. जे सौंदर्य आणि आरोग्य दोन्हीही भरभरून देतात.
प्लास्टिकच्या खुर्च्या खूपच जुनाट, मळकट दिसू लागल्या? 'या' पद्धतीने पुसा- नव्यासारख्या स्वच्छ दिसतील
३. तेलकट, तुपकट, जंकफूड, मीठ जास्त असणारे पदार्थ नेहमीच कमी प्रमाणात खा. ज्या दिवशी असे पदार्थ जास्त प्रमाणात खाण्यात येतील त्यादिवशी भरपूर पाणी आठवणीने प्या.
४. शरीर फिट राहण्यासाठी जशी व्यायामाची गरज असते तशीच गरज आपल्या त्वचेलाही असते. त्यामुळे रोज ५ मिनिटांचा वेळ स्वत:साठी देऊन फेसयोगा नक्की करा. यामुळे त्वचेचा लवचिकपणा टिकून राहण्यास मदत होते.
५. त्वचेची स्वच्छता आणि काळजीही महत्त्वाची आहे. यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुवा. प्रत्येकवेळी चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चराईज करा. दररोज सनस्क्रिन आणि रात्री झोपण्यापुर्वी नाईट क्रिम लावा. घरच्याघरी आठवड्यातून एकदा घरगुती पदार्थ वापरून त्वचेचं स्क्रबिंग करा. तसेच घरगुती फेसपॅकही लावा. यामुळेही त्वचा स्वच्छ, नितळ आणि सुंदर राहाते.