Hangnail Treatment: हिवाळ्याचा वातावरण जसं आल्हाददायक असतं, तसंच या काळात काही त्रासदायक समस्यांनाही सामोरं जावं लागतं. त्यापैकी सर्वात सामान्य समस्या म्हणजे नखांच्या भोवतीची त्वचा सोलणे किंवा निघणे. कधी कधी ही त्वचा इतकी खोलवर सोलते की रक्त येतं आणि वेदनाही होतात. त्यामुळे टायपिंग करणं, भांडी धुणं, स्वयंपाक करणं यांसारख्या दैनंदिन कामांमध्ये अडचण निर्माण होते. म्हणूनच आज आपण या समस्येची कारणं आणि त्यावर उपाय जाणून घेणार आहोत.
नखांच्या भोवतीची त्वचा का सोलते?
नखांच्या आजूबाजूची त्वचा सोलण्याच्या समस्येला हँगनेल (Hangnail) असं म्हणतात. हेल्थलाइनच्या अहवालानुसार यामागे अनेक कारणं असू शकतात. त्वचा फाटणे किंवा खूप कोरडी व कमकुवत होणे. हिवाळ्यात ही समस्या अधिक दिसून येते, कारण थंडीत त्वचा लवकर कोरडी होते. तसेच जे लोक वारंवार नखे चावतात किंवा नखांच्या बाजूची त्वचा खूप कापतात, त्यांना हँगनेल होण्याची शक्यता जास्त असते.
हँगनेलपासून कसा मिळवावा आराम?
हात नियमितपणे धुवा, जेणेकरून त्या ठिकाणी घाण किंवा बॅक्टेरिया साचणार नाहीत.
हँगनेल काढण्यापूर्वी त्वचा मुलायम करा. यासाठी बोटं कोमट साबणाच्या पाण्यात भिजवा. किंवा हलक्या हाताने मिनरल ऑइल किंवा पेट्रोलियम जेली लावा.
त्यानंतर स्वच्छ नेल क्लिपर किंवा क्युटिकल कात्रीने फक्त बाहेर आलेला कोरडा भाग कापा. जिवंत त्वचा कापण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा रक्त येऊ शकतं.
चुकून रक्त आलं तर आधी पाण्याने स्वच्छ धुवा, अँटीबॅक्टेरियल मलम लावा आणि पट्टी बांधा.
रक्त न आलं असल्यास, हँगनेल काढल्यानंतर मॉइश्चरायझरचा वापर कर
हँगनेल टाळण्यासाठी काय कराल?
हिवाळ्यात हात कोरडे पडू नयेत म्हणून हातमोजे (ग्लोव्ह्ज) वापरा.
कोरडी व फाटलेली त्वचा टाळण्यासाठी हँड क्रीम किंवा पेट्रोलियम जेलीचा नियमित वापर करा. झोपण्यापूर्वी नखांच्या भोवती मॉइश्चरायझर नक्की लावा.
नखे चावण्याची सवय सोडून द्या.
नखांवर अॅसिटोन असलेले प्रॉडक्ट्स कमी वापरा, कारण यामुळे त्वचा लवकर कोरडी होते.
