lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > How to get pink lips naturally : थंडीमुळे ओठ काळपट, कोरडे पडलेत? शहनाज हुसैननं सांगितले मऊ, गुलाबी ओठांसाठी खास उपाय

How to get pink lips naturally : थंडीमुळे ओठ काळपट, कोरडे पडलेत? शहनाज हुसैननं सांगितले मऊ, गुलाबी ओठांसाठी खास उपाय

How to get pink lips naturally : ब्यूटी एक्सपर्ट शेहनाज हुसैन यांनी काळ्या ओठांपासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 11:50 AM2022-01-27T11:50:49+5:302022-01-27T12:09:00+5:30

How to get pink lips naturally : ब्यूटी एक्सपर्ट शेहनाज हुसैन यांनी काळ्या ओठांपासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

How to get pink lips naturally : Shahnaz husain tips to get rid of dark lips naturally | How to get pink lips naturally : थंडीमुळे ओठ काळपट, कोरडे पडलेत? शहनाज हुसैननं सांगितले मऊ, गुलाबी ओठांसाठी खास उपाय

How to get pink lips naturally : थंडीमुळे ओठ काळपट, कोरडे पडलेत? शहनाज हुसैननं सांगितले मऊ, गुलाबी ओठांसाठी खास उपाय

मेकअप न करता कोणाच्याही समोर जायचं म्हटलं तर काळे ओठ अजिबात चांगले दिसत नाहीत. मऊ आणि गुलाबी ओठ खूप आकर्षक दिसतात आणि तुमच्या सौंदर्यात भरही घालतात. (Lips Care Tips)  यामुळेच महिला त्यांच्या त्वचेसोबतच ओठांचीही विशेष काळजी घेतात. रोजच्या जगण्यातील काही सवयी तुमचे ओठ काळे पडण्यासाठी कारणीभूत ठरतात. सिगारेट ओढणे, डेड स्किन आणि केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर यांमुळे ते काळे होऊ लागतात. ब्यूटी एक्सपर्ट शेहनाज हुसैन यांनी काळ्या ओठांपासून सुटका मिळवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. (Shahnaz husain tips to get rid of dark lips naturally)

पोषक तत्वांची कमतरता

सिगारेट ओढल्याने ओठ काळे होतात हे आपणा सर्वांना माहीत आहे. कारण त्यात निकोटीन असते, ज्याचा त्वचेवर परिणाम होतो. यासोबतच पोषणाची कमतरता हेही एक प्रमुख कारण आहे. A, C, B2 या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे ओठ कोरडे आणि काळे पडतात. त्यामुळे तुमच्या आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा.  पपई, टोमॅटो, गाजर, हिरव्या पालेभाज्या, नट, तृणधान्ये, दूध इत्यादींचा आहारात समावेश केल्यास फायदा होऊ शकतो. जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल, तर तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आहारात काही बदल करणे चांगले.

ओठांना स्क्रब करा

जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर स्क्रबिंग फायदेशीर ठरू शकते. यासाठी साखर घ्या आणि त्यात काही थेंब ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस मिसळा. आता या मिश्रणाने तुमचे ओठ पूर्णपणे स्क्रब करा आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा. याशिवाय चेहरा धुतल्यानंतर मऊ तेलाने ओठ चोळा. हे फार लवकर करण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा. चोळल्यानंतर थोडी क्रीम घ्या आणि ओठांवर लावा. आता तासभर राहू द्या.

रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल ओठांवर लावा आणि रात्रभर राहू द्या. तुम्हाला हवं असल्यास, त्वचेचा टोन हलका करण्यासाठी तुम्ही बदामाची पेस्ट देखील लावू शकता. याशिवाय दररोज ओठांवर कोरफडीचे जेल लावा. 15 ते 20 मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा.

फक्त ५ रूपयांच्या कढीपत्त्यानं मिळवा काळेभोर, दाट केस; पांढऱ्या केसांचं टेंशन कायमचं विसराल

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी देखील तेल प्रभावी मानले गेले आहे. यासाठी अर्गन ऑईल, खोबरेल तेल किंवा जोजोबा तेल वापरता येईल. तिन्ही तेलांमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. जे तुमचे ओठ निरोगी ठेवण्यास मदत करतात.

फक्त ५०० रूपयात होईल किचनचा मेकओव्हर; स्टायलिश, नव्या कोऱ्या किचनसाठी या घ्या टिप्स

तुम्ही सनस्क्रीनसह लिप बाम देखील लावू शकता. तसेच सनस्क्रीन लोशनचे काही थेंबही लावता येतात. ते काही मिनिटे ठेवा आणि नंतर ओठांवर फाउंडेशन लावा. यानंतरच लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस लावू शकता. हे तुमच्या ओठांचे अतिनील किरणांपासून संरक्षण करेल आणि काळे होण्यास प्रतिबंध करेल.  केमिकल्सयुक्त लिपस्टिकऐवजी हर्बल उत्पादनं वापरा.

ओठांची अशी घ्या काळजी

तुमचे ओठ मऊ ठेवण्यासाठी आणि काळे होण्यापासून रोखण्यासाठी, तुम्ही त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत लिपस्टिक लावल्यानंतर क्लींजिंग जेल आणि क्रीमने काढून टाका. कधीही खराब लिपस्टिक किंवा मेकअप वापरू नका. जुन्या किंवा कालबाह्य झालेल्या लिपस्टिकपासून ओठांचे संरक्षण करा. जर तुम्हाला वाटत असेल की लिपस्टिक खूप गुळगुळीत झाली आहे किंवा दुर्गंधी येत असेल, तर ती न वापरणंच चांगले.
 

Web Title: How to get pink lips naturally : Shahnaz husain tips to get rid of dark lips naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.