Lokmat Sakhi >Beauty > मेकअप किटमधील कॉम्पॅक्ट पावडर फुटून त्याचा भुगा झाला ? १ सोपी ट्रिक, कॉम्पॅक्ट पावडर अशी करा सेट...

मेकअप किटमधील कॉम्पॅक्ट पावडर फुटून त्याचा भुगा झाला ? १ सोपी ट्रिक, कॉम्पॅक्ट पावडर अशी करा सेट...

How to Restore Broken Compact Powder : कॉम्पॅक्ट पावडर फुटून त्याचा भुगा - खडे होतात, अशी पावडर पुन्हा वापरण्यायोग्य करण्यासाठी एक सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2023 11:16 AM2023-10-02T11:16:04+5:302023-10-02T11:28:21+5:30

How to Restore Broken Compact Powder : कॉम्पॅक्ट पावडर फुटून त्याचा भुगा - खडे होतात, अशी पावडर पुन्हा वापरण्यायोग्य करण्यासाठी एक सोपा उपाय...

How To Fix A Broken Compact Powder Without Using Alcohol, How to Fix Broken Compact Powder At Home, | मेकअप किटमधील कॉम्पॅक्ट पावडर फुटून त्याचा भुगा झाला ? १ सोपी ट्रिक, कॉम्पॅक्ट पावडर अशी करा सेट...

मेकअप किटमधील कॉम्पॅक्ट पावडर फुटून त्याचा भुगा झाला ? १ सोपी ट्रिक, कॉम्पॅक्ट पावडर अशी करा सेट...

मेकअप करणे हा प्रत्येक स्त्रीचा अगदी आवडीचा विषय असतो. मेकअप करताना आपल्याला लिपस्टिक, मस्कारा, आयशॅडो, लूज पावडर, आयलायनर यांसारखी वेगवेगळी सौंदर्य प्रसाधन लागतात. या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण आपला सुंदर मेकअप करु शकतो. आपल्यापैकी प्रत्येक स्त्रीच्या मेकअप किटमध्ये मेकपक करण्याचा काही बेसिक गोष्टी या असतातच. या बेसिक गोष्टींमध्ये चेहेऱ्याला लावण्याची मेकअप पावडर ही आवर्जून प्रत्येकीच्या किटमध्ये असतेच. मेकअप पावडर मध्ये आजकाल वेगवेगळे प्रकार देखील पाहायला मिळतात(How to set broken compact powder without alcohol).

मेकअप किटमधील हमखास वापरली जाणारी मेकअप पावडर म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर. साधारणतः छोट्याशा चौकोनी डबीत समोर एका बाजूला आरसा व दुसऱ्या बाजूला पावडर अशी कॉम्पॅक्ट पावडरची (HOW TO FIX BROKEN COMPACT POWDER) डबी सगळ्यांकडेच असते. कॉम्पॅक्ट पावडर (Compact Powder) आपण बरेचदा वापरतो. कॉम्पॅक्ट पावडरची (Compact Powder) डबी आकाराने अतिशय लहान असल्यामुळे काहीवेळा ती आपल्या हातातून पडून फुटते. बऱ्याचजणींना या समस्येचा सामना करावा लागतो. कित्येकींच्या मेकअप किटमधील इतर सामान हे व्यवस्थित असते परंतु कॉम्पॅक्ट पावडर ही फुटलेली असते. अशी फुटलेली कॉम्पॅक्ट पावडर (How to Fix Broken Compact Powder At Home) सांभाळून वापरणे म्हणजे एक मोठा टास्कच असतो. काहीवेळा तर आपण ही कॉम्पॅक्ट पावडर फुटली तर ती न वापरता फेकून देतो. परंतु एक सोपी ट्रिक वापरुन आपण ही फुटलेली कॉम्पॅक्ट पावडर आहे तशीच पुन्हा वापरण्यायोग्य करु शकतो(How To Fix A Broken Powder Without Using Alcohol).

कॉम्पॅक्ट पावडर फुटली...आता नेमकं करायचं काय ? 

१. सगळ्यांत आधी ही फुटून विस्कळीत झालेली कॉम्पॅक्ट पावडर एका स्वच्छ झिप लॉक बॅगमध्ये काढून घ्यावी. 

२. आता चमच्याच्या मदतीने या पावडरचे लहान लहान तुकडे फोडून त्याची पावडर करुन घ्यावी. 

३. या कॉम्पॅक्ट पावडरची व्यवस्थित बारीक पूड झाली की ती परत आहे त्याच पावडर बॉक्समध्ये ओतून घ्यावी. 

चेहऱ्याला बर्फाने मसाज करता ? पण ४ गोष्टी चुकल्या तर चेहरा दिसतो विद्रूप - त्वचा होते खराब...

BB क्रिम वापरण्याची योग्य पद्धत माहिती आहे का ? चुकलं तर, क्रिम लावूनही दिसाल भयंकर...

४. पावडर आहे त्या बॉक्समध्ये ओतल्यावर ती चमच्याच्या किंवा बोटांच्या मदतीने व्यवस्थित पसरवून घ्यावी. 

५. त्यानंतर या पावडरवर एक टिश्यू पेपर हलकेच अंथरून घ्यावा, आणि टिश्यू पेपरवर चमच्याच्या खोलगट भागाने दाब देत पावडर त्या डबीत बसवून घ्यावी. 

६. कॉम्पॅक्ट पावडरमध्ये बाईंडर असतो त्यामुळे तिच्यावर चमच्याने दाब दिल्यास ती पुन्हा पहिल्यासारखी त्या पावडरच्या डबीत फिक्स होते. 

७. आता सगळ्यात शेवटी एका स्वच्छ टिश्यू पेपरच्या मदतीने हा पावडरचा डबा पुसून घ्यावा. 

सततच्या केस गळतीने हताश झालात ? करा सोपा ‘पोटली मसाज’, केस गळणं थांबेल लवकर...

अशा प्रकारे आपण एका साध्या - सोप्या ट्रिकचा वापर करून ही फुटलेली कॉम्पॅक्ट पावडर आहे त्या डबीत पुन्हा पहिल्यासारखीच सेट करुन वापरु शकतो. या ट्रिकचा वापर करुन जरा आपण फुटलेली कॉम्पॅक्ट पावडर पुन्हा त्याच डबीत बसवली तर ती व्यवस्थित बसून दीर्घकाळ टिकते. तसेच कॉम्पॅक्ट पावडरचा डबा उलटा केल्यास त्यातून ही पावडर खाली पडतही नाही.

Web Title: How To Fix A Broken Compact Powder Without Using Alcohol, How to Fix Broken Compact Powder At Home,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.