Join us

वय कमी पण केस खूपच पिकलेत? ५ उपाय, डाय न लावता केस होतील काळेभोर-राहतील दाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 00:02 IST

How to blacken white hair naturally : आजकाल  तरूण मुलामुलींमध्ये केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलंय.पांढऱ्या केसांना काळे बनवण्यासाठी लोक बाजारात मिळणाऱ्या हेअर कलर्सचा वापर करतात.

सौंदर्य वाढवण्यात केसांची फार महत्वाची भूमिका असते. आपले केस लांबसडक-दाट दिसावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सध्याच्या ताण-तणावपूर्ण वातावरणात तरूणपणात केस  (Premature Greying) पांढरे होण्याची समस्या उद्भवते. केस पांढरे होणं अनेकांसाठी चिंतेचे कारण ठरतं. आजकाल  तरूण मुलामुलींमध्ये केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलंय.पांढऱ्या केसांना काळे बनवण्यासाठी लोक बाजारात मिळणाऱ्या हेअर कलर्सचा वापर करतात.  यामुळे केस काळे होतात.  पण यात हानीकारक केमिकल्स असतात. जे हळूहळू केसांचे नुकसान करतात. (How to Turn Grey or White Hair Black Naturally)

जर तुमचे केस पांढरे होत असतील तर  केसांना नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी काही घरगुती उपाय गुणकारी ठरू शकतात. यामुळे केस मुळापासून मजबूत होतील आणि  केसांना नैसर्गिक चमक येईल. (Natural Home Remedies For Grey Hair) आधीच्या काळी लोकांचे केस दाट, मजबूत आणि काळेभोरही असायचे. पण आता तरूण पणातच केस कमकुवत, पांढरे, पातळ होऊ लागले आहेत.  केस पांढरे होण्याची अनेक कारणं आहेत.

१) पोषक तत्वांची कमतरता, लोहाची कमतरता, कॅल्शियम, व्हिटामीन बी-१२, डी-३ अशा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस लवकर पांढरे होतात.

२)  जास्तवेळ उन्हात राहणं, रात्रभर जागरण,  स्मोकींग,  दारूचं सेवन, प्रदूषित हवा ही केस खराब होण्याची कारणं आहेत.

३) स्ट्रेस डिप्रेशनमुळे ताण-तणाव, चिंता, क्रोध वाढतो.

४) अनुवांशिक कारणांमुळेही अनेकांचे केस  तुटतात.

५) प्रेग्नंसी, मेनोपॉजदरम्यान हॉर्मोनल बदल झाल्यानं केसाचं तुटणं सुरूच  राहतं.

६) हार्मोनल बदल- प्रेग्नंसी आणि मेनोपॉज दरम्यान  केस पांढरे होतात.

७) केसांवर  तुम्ही केमिकल्सयुक्त कलर, हेअर हाय, शॅम्पू इत्यादींचा वापर करू शकता. 

ग्रीन टी

केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करा. कारण यात एंटी एजिंग गुण असतात. जे केसांसाठी फायदेशीर ठरतात.  व्हिटामीन बी ची शरीरात कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या.  केस लगेच काळे होत नाहीत. यासाठी तुम्हाला पेशंन्स ठेवावे लागतील.  कोणताही उपाय तुम्हाला लगेच  रिजल्ट दाखवणार नाही.  यासाठी कमीत कमी १ ते  २ महिने वाट पाहावी लागेल.

हिना अमलकी आणि भृंगराज

पांढऱ्या केसांना काळे आणि दाट बनवण्यासाठी हिना, अमलकी, भृंगराजचा तुम्ही वापर करू शकता.  यासाठी याची पेस्ट बनवून केसांवर लावा.

कांद्याचा रस

कांद्याचा रस केसांना लावल्यानं केस पांढरे होण्यापासून रोखता येतं. यामुळे टक्कल पडत नाही.  कांद्याचा रस केसांच्या रिग्रोथसाठी फायदेशीर ठरतो. मोहोरीच्या तेलात कांद्याचा रस मिसळून केसांच्या मुळांना लावा. कमीत कमी १५ ते २० मिनिटं मालिश करा आणि अर्ध्या तासानंतर पाण्यानं केस स्वच्छ धुवा. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही कमीत कमी २ ते ३ वेळा  हा प्रयोग करू शकता. 

आवळा आणि शिकेकाई

पांढऱ्या केसांसाठी हा प्रभावी उपाय आहे. याचा वापर करून तुम्ही लांब-दाट केस मिळवू शकता. आवळा आणि शिकेकाई रात्रभर  लोखंडाच्या कढईत भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट बनवून केसांना लाववा. अर्ध्या तासानं पाण्यानं केस स्वच्छ धुवा. यामुळे केस दाट, मजबूत होतील. आठवड्यातून कमीत कमी एकदा हा उपाय नक्की करा.

नाराळाचं तेल

केसांना मुळापासून मजबूत बनवण्यासाठी सगळ्यात आधी केसांची नारळाच्या तेलानं व्यवस्थित मालिश करा. यासाठी नारळाचं  तेल आणि थोडं कॅस्टर ऑईल घेऊन त्यात मेथीचे दाणे घालून व्यवस्थित शिजवून  घ्या. थंड झाल्यानंतर केसांना व्यवस्थित तेल लावा.  सकाळी माईल्ड शॅम्पूनं केस धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहेल्थ टिप्स