Hot Water Bath Tips In Winter : थंडी अजून पूर्णपणे सुरू झालेली नसली तरी थंडी पडू लागल्यावर जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करायला सुरुवात करतात. गोठवणाऱ्या थंडीत अंगावर गरम पाणी घेतल्यावर जो काही आराम मिळतो, तो शब्दात सांगता येईल असा नाहीच. पण जरी हे शरीराला काही काळासाठी आरामदायी किंवा आनंद देणारं वाटत असलं तरी जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. चला जाणून घेऊया त्याचे काही दुष्परिणाम.
त्वचेचं नुकसान
गरम पाणी त्वचेवरील नॅचरल मॉइश्चरायझर आणि तेलं दूर करतं. त्यामुळे स्किन कोरडी पडते, भेगा पडतात आणि खाज, पुरळ, रॅशेस अशा समस्या वाढतात. जास्त वेळ गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेतील नॅचरल ऑइल नष्ट होतं आणि स्किनचा नाजूक संतुलन बिघडतं.
इन्फेक्शनचा धोका
थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी आणि फाटलेली असल्याने बॅक्टेरिया सहजपणे त्वचेमध्ये प्रवेश करतात. अशा वेळी गरम पाण्याने जास्त वेळ अंघोळ केल्याने त्वचा अधिक सुकते आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो.
प्रजनन क्षमतेवर परिणाम
संशोधनानुसार, जर एखादी व्यक्ती ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ गरम पाण्यात राहिली, तर पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर आणि निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. अतिउष्ण पाण्यामुळे टेस्टिक्युलर टेंपरेचर वाढतं, ज्यामुळे शुक्राणू कमकुवत होतात.
सुरकुत्या येतात
गरम पाण्याची वाफ चेहऱ्यावर गेल्याने त्वचेचे पोर्स मोठे होतात आणि स्किनचं मॉइश्चर कमी होतं. परिणामी चेहऱ्यावर सुरकुत्या, डलनेस आणि वेळेआधी वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात.
केसगळती वाढते
गरम पाण्याने केस धुतल्यास स्काल्प ड्राय होते आणि केस कमकुवत होतात. त्यामुळे केस तुटतात, गळतात आणि केसगळती वाढते. दीर्घकाळ हे चालू राहिल्यास टक्कल पडण्याची शक्यता वाढते.
Hot showers Can Dry Out Your Skin या लेखात सांगितले आहे की नियमित गरम पाण्याच्या आंघोळीत त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होतो, त्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते, रॅशेस, खाज वाढू शकते.
मग गरम पाण्याने किती वेळ आंघोळ करावी?
तज्ज्ञांच्या मते, गरम पाण्याने १० ते २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ करू नये. आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे, जेणेकरून त्वचेतील ओलावा टिकून राहील आणि ड्रायनेस, खाज, रॅशेससारख्या समस्या टाळता येतील.