बहुतांश महिलांची हीच अडचण असते की त्यांना त्वचेची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळच नसतो. रोजच्या कामाच्या धावपळीमध्ये त्वचेसाठी वेळ काढणं अजिबात जमत नाही. त्यामुळे मग हळूहळू त्वचा निस्तेज दिसायला लागते. डेडस्किन वाढायला लागते. काही जणींना तर पिगमेंटेशन किंवा ॲक्नेचा त्रासही होतो. बऱ्याचदा कपाळ, ओठांच्या आजूबाजूचा भाग, डोळ्यांच्या बाजूचा भाग काळपट दिसायला लागतो. त्वचेचा रंग एकसारखा राहात नाही. असे कोणतेही त्रास तुम्हाला होत असतील तर पुढे सांगितलेला एक अतिशय सोपा उपाय करून बघा. आठवड्यातून फक्त एकदाच काही दिवस नियमितपणे हा उपाय केला तर त्वचेमध्ये खूप चांगला बदल दिसून येऊ शकतो.(home hacks to reduce acne and pigmentation)
पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स, ॲक्ने कमी करण्यासाठी सोपा घरगुती उपाय
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी थोडसं कच्चं दूध घेऊन त्याने चेहऱ्याला व्यवस्थित मालिश करा. २ ते ३ मिनिटे मालिश करा. त्यानंतर ५ ते ६ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. यामुळे त्वचेवरची धूळ, घाण, मळ निघून जातो. यानंतर त्वचेवर बर्फ फिरवा किंवा बर्फाच्या पाण्यात काही सेकंदासाठी चेहरा बुडवा.
'या' गोष्टींमुळे मुलं आई- बाबांपासून कायमची दुरावली जातात, मुलांचं आणि तुमचं नातं घट्ट ठेवायचं तर...
यानंतर दही आणि ज्येष्ठमधाची पावडर एकत्र करून त्वचेला लावा. अगदी हलक्या हाताने अर्धा मिनिट मसाज करा. त्यानंतर साधारण २ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हा लेप लावल्यानंतर त्वचा कोरडी होऊ देऊ नका.
चेहऱ्यावर पाणी शिंपडत राहा. यानंतर चेहरा धुऊन टाका आणि पुन्हा एकदा चेहऱ्यावरून बर्फ फिरवा किंवा बर्फाच्या पाण्यात काही सेकंदासाठी चेहरा बुडवा.
पौष्टिक असते म्हणून काकडी कधीही खाऊ नये- पाहा काकडी खाण्याची योग्य वेळ कोणती
यानंतरची तिसरी स्टेप म्हणजे ५ मिनिटांसाठी तुमच्या चेहऱ्यावर हलक्या हाताने टॅपिंग करा आणि त्यानंतर २ मिनिटे शीतली प्राणायाम करा.
आता सगळ्यात शेवटी चेहऱ्यावर टोमॅटोचा रस आणि कोरफडीचा ताजा गर एकत्र करून त्याचा लेप लावा. १० मिनिटांनी चेहरा धुवून मॉइश्चराईज करा. त्वचेमध्ये चांगला बदल दिसून येईल.
Web Summary : Struggling with dull skin, pigmentation, or acne? Try this simple home remedy: massage with raw milk, apply a curd and licorice powder mask, and finish with tomato and aloe vera. Regular use can visibly improve your skin.
Web Summary : रूखी त्वचा, पिगमेंटेशन या मुंहासों से परेशान हैं? कच्चे दूध से मालिश करें, दही और मुलेठी पाउडर का मास्क लगाएं, टमाटर और एलोवेरा से खत्म करें। नियमित उपयोग से त्वचा में सुधार हो सकता है।