lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > पार्लरला जायला वेळच नाही? मग घरीच करा फेशिअल, घरीच फेशियल करण्याची सोपी पद्धत

पार्लरला जायला वेळच नाही? मग घरीच करा फेशिअल, घरीच फेशियल करण्याची सोपी पद्धत

DIY :काही सोप्या टिप्स वापरून घरी फेशिअल केलं तरी चेहऱ्यावर छान ग्लो (Instant glow) येतो. त्यामुळे पार्लरला जायला वेळ नसेल, तर कधी घरच्या घरीही अशा पद्धतीने फेशिअल करून बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 07:11 PM2021-11-24T19:11:58+5:302021-11-24T19:13:50+5:30

DIY :काही सोप्या टिप्स वापरून घरी फेशिअल केलं तरी चेहऱ्यावर छान ग्लो (Instant glow) येतो. त्यामुळे पार्लरला जायला वेळ नसेल, तर कधी घरच्या घरीही अशा पद्धतीने फेशिअल करून बघा...

Home hacks : Beauty treatments, How to do facial at home? | पार्लरला जायला वेळच नाही? मग घरीच करा फेशिअल, घरीच फेशियल करण्याची सोपी पद्धत

पार्लरला जायला वेळच नाही? मग घरीच करा फेशिअल, घरीच फेशियल करण्याची सोपी पद्धत

Highlightsफेशिअल कसं करायचं यासाठी या काही टिप्स मात्र नक्की फॉलो करा...

बऱ्याच जणींच्या मागे घर, ऑफिस या सगळ्या कामांची एवढी गडबड असते, की सगळं करताना त्या स्वत:कडे एकदम दुर्लक्ष करतात. सगळी काम, सगळ्यांच्या वेळा, स्वत:च्या ऑफिसच्या वेळा सांभाळताना अनेक जणींना पार्लरमध्ये जायला वेळच मिळत नाही. त्यामुळे मग त्वचा, केस या सगळ्यांचेच खूप हाल होतात. अशा वेळी घरच्या घरी आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, फेशिअल करायला काहीच हरकत नाही. फेशिअल कसं करायचं यासाठी या काही टिप्स मात्र नक्की फॉलो करा...

 

कसं करायचं घरच्या घरी फेशिअल?
facial at home

- फेशिअल सुरूवात करण्याआधी केस नीट बांधून घ्या आणि तुमचा चेहरा क्लिंजर लावून स्वच्छ धुवून घ्या.
- क्लिंजर नसेल तर २ चमचे दही, १  चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस हे मिश्रण वापरा. हा लेप चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
- यानंतर तुमच्याकडे जे कोणतं स्क्रब असेल त्याने चेहऱ्याला मसाज करा. खूप जोरजोरात चेहरा रगडू नका. हलक्या हाताने मसाज करा. 
- घरी स्क्रब नसेल तर सरळ दोन चमचे दूध घ्या, त्यात एक चमचा बेसन पीठ किंवा ओट्स किंवा मसूर डाळीचे पीठ टाका आणि थोडा मध टाका. घरच्याघरी तयार झालेल्या या स्क्रबरने चेहरा स्वच्छ करा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. 

 

- चेहरा स्क्रब केल्यानंतर तुमच्या नेहमीच्या मॉईश्चरायझरने चेहऱ्याला मसाज करा. 
- यानंतर बाजारात मिळणारे मुलतानी माती फेसपॅक चेहऱ्याला लावा.
- फेसपॅक सुकला की चेहरा धुवून घ्या. 
- चेहरा धुतल्यानंतर पुन्हा मॉईश्चरायझर लावा. 
- घरच्या घरी झालं तुमचं मस्त फेशिअल.
- फेशिअल झाल्यानंतर ८ ते १० तास धुळीत जाणं टाळा. 

 

Web Title: Home hacks : Beauty treatments, How to do facial at home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.