Join us
Daily Top 2Weekly Top 5

होळी खेळताना डोळ्यात रंग गेल्यास चटकन ‘हा’ उपाय करा, डोळे सांभाळा-टाळा नेहमी होणाऱ्या चुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:00 IST

Holi Eye Safety Tips: बऱ्याचदा लोक घाबरून डोळे चोळू लागतात किंवा कशाचाही विचार न करता डोळ्यात काहीतरी टाकतात. ज्यामुळे समस्या आणखी वाढते.

Holi Eye Safety Tips: होळीचा दिवस येताच गल्ली-बोळांमध्ये रंगांची उधळण, मस्तीचं वातावरण असतं. पण रंग खेळताना एक छोटीशी चूक डोळ्यांसाठी मोठी समस्या निर्माण करू शकते. रंग खेळताना अचानक गुलाल किंवा ओला रंग डोळ्यात गेला तर जळजळ, डोळे लाल होणे आणि धुसर दिसणे अशा समस्या होतात. बऱ्याचदा लोक घाबरून डोळे चोळू लागतात किंवा कशाचाही विचार न करता डोळ्यात काहीतरी टाकतात. ज्यामुळे समस्या आणखी वाढते. मुळात योग्यवेळी योग्य तो उपाय केला तर डोळे पूर्णपणे सुरक्षित राहतात. 

पाण्याने धुवा, पण हळूहळू 

डोळ्यात रंग गेला तर सगळ्यात आधी डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. डोळे पाण्याने हळूहळू धुवा. असं केल्याने डोळ्यातील रंग बाहेर निघेल आणि जळजळ कमी होईल. अनेक एक्सपर्ट सांगतात की, सुरूवातीचे २ ते ३ मिनिटं डोळे स्वच्छ करणं जास्त फायदेशीर ठरतं.

डोळे अजिबात चोळू नका 

डोळ्यात काही गेल्यावर सामान्य प्रतिक्रिया असते डोळे चोळणं. पण ही सगळ्यात मोठी चूक असते. चोळल्याने रंगाचे कण कॉर्नियावर स्क्रॅचेस निर्माण होतात. अनेकदा होळीनंतर डोळ्यात जळजळ होण्याचं कारण रंग नाही तर डोळे चोळणं असतं.

आय ड्रॉप डॉक्टरांच्या सल्ल्याने 

जर डोळे धुतल्यानंतरही डोळ्यांची जळजळ कमी झाली नसेल, डोळे कोरडे वाटत असतील तर लुब्रिकेटिंग आय ड्रॉप फायदेशीर ठरू शकतो. पण कोणताही ड्रॉप आपल्या मनाने वापरू नका. चुकीच्या ड्ऱॉपने अॅलर्जी किंवा इन्फेक्शन वाढू शकतं. त्यामुळे ड्रॉप डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरा. 

वेदना, सूज आणि धुसर दिसत असेल तर... 

जर डोळे लाल झाले असतील, वेदना होत असेल, टोचल्यासारखं वाटत असेल किंवा धुसर दिसत असेल तर दुर्लक्ष करू नका. या गोष्टी केमिकल इरिटेशन किंवा कॉर्निअल इजेच्या संकेत असू शकतात. अशात वेळीच डॉक्टरांना दाखवा. 

गुलाबजल किंवा घरगुती उपाय काळजीपूर्वक 

बरेच लोक डोळ्यांमध्ये गुलाबजल किंवा दूध टाकण्याचा सल्ला देतात. पण या गोष्टी नेहमीच सुरक्षित ठरतील असं नाही. जर गुलाबजल शुद्ध किंवा स्टरलाइज्ड नसेल तर इन्फेक्शना धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असा काही उपाय करू नका.

English
हिंदी सारांश
Web Title : Holi Eye Safety: First Aid and Mistakes to Avoid If Color Enters Eyes

Web Summary : If color enters your eyes during Holi, gently rinse with water. Avoid rubbing, which can cause corneal scratches. Consult a doctor for persistent irritation or blurred vision and for appropriate eye drops. Avoid unsterilized home remedies.
टॅग्स :डोळ्यांची निगात्वचेची काळजीहोळी 2026