lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > कुरतडलेली, वाकडीतिकडी, घाणेरडी नखं अनेक ‘सिक्रेट्स’ सांगतात, Healthy नखांसाठी खास टिप्स!

कुरतडलेली, वाकडीतिकडी, घाणेरडी नखं अनेक ‘सिक्रेट्स’ सांगतात, Healthy नखांसाठी खास टिप्स!

कितीही लपवलं, चेहऱ्याला कितीही मेकअपने सजवलं तरी आपले हात , आपली नखं सांगतातआपलं व्यक्तिमत्व कसं आहे .

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:29 PM2021-04-29T16:29:20+5:302021-04-29T17:02:53+5:30

कितीही लपवलं, चेहऱ्याला कितीही मेकअपने सजवलं तरी आपले हात , आपली नखं सांगतातआपलं व्यक्तिमत्व कसं आहे .

healthy nails are beautiful nails, how to make them healthy, nail art is not enough for nail health | कुरतडलेली, वाकडीतिकडी, घाणेरडी नखं अनेक ‘सिक्रेट्स’ सांगतात, Healthy नखांसाठी खास टिप्स!

कुरतडलेली, वाकडीतिकडी, घाणेरडी नखं अनेक ‘सिक्रेट्स’ सांगतात, Healthy नखांसाठी खास टिप्स!

Highlightsसुंदर नखं हवीत? मग नुसतं नेलपॉलिश लावून भागणार नाही

श्रावणी बॅनर्जी

आपण  कितीही लपवलं, चेहऱ्याला कितीही मेकअपने सजवलं तरी आपले हात आपलं वय सांगतात हे आपल्याला माहिती आहे का? हात आणि त्यासह आपली नखं. आपली नखं सांगतात की आपलं व्यक्तिमत्व कसं आहे ते. आता तुम्ही म्हणाल की ज्यांना परवडतं ते मेनिक्युअर करुन हात सुंदर ठेवतात. त्याचं काय कौतुक आम्हाला सांगता, त्यांच्याकडे पैसे  आहेत एवढंच समजू शकतं. व्यक्तिमत्व कसं कळेल नखांवरुन? तर त्याचं उत्तर हेच की, मेनिक्युअर ही मलमपट्टी झाली आरोग्य नव्हे. नेलआर्ट, मेनिक्युअर यापलिकडे आपल्या नखांचं आरोग्य सुंदर असेल तर आपले हात सुंदर दिसतील. त्यामुळे नखांचं सौंदर्य हा विषयही महत्वाचा आहे.

तर आता प्रश्न असा की, आपली नखं सुंदर दिसावीत म्हणून काय करता येईल?

नखांचं आरोग्य आणि सौंदर्य उत्तम रहावं म्हणून या गोष्टी जरुर करा..

 

१. होतं काय, आपण नखांचं पॉलिश बदलतो. ट्रायआऊट करतो पण नखांचं आरोग्य पाहत नाही. आपला आहार, व्यायाम, आपल्या शरीरातील व्हिटॅमिन्स, कॅलशिअमची कमतरता अशा अनेक गोष्टींचा नखांवर त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे आपली तब्येत, आहार याकडे लक्ष ठेवणं हे क्रमप्राप्त वरवरच्या रंगरंगोटीने झाकपाक होते. सुंदरता आणि आरोग्य नाही मिळत.

२. त्यामुळे एक तर आपली नखं स्वच्छ ठेवा. नखात घाण अडकते, काळ्या रेषा दिसतात. अशी घाणेरडी, तुटकी, अनहायजेनिक बोटं किळसवाणी दिसतात. ते टाळा, नखांची स्वच्छता आपल्या पोटाच आरोग्य म्हणूनही फार महत्वाची आहे.

३. Acetone free नेलपॉलिश वापरा. बाकी स्वस्त, किंवा काहीही न पाहता खरेदी केलेल्या नेलपॉलिश लावू नका.

४. नखांना मॉइश्चर मिळायला हवं. त्यामुळे कायम किंवा किमान झोपताना तरी पेट्रोलिअम जेली, खोबरेल तेल, बदाम तेल जे शक्य आहे ते लावा. 

५. तुमची नखं फारच पातळ असतील, सतत तुटत असतील तर बाजारात नेल हार्डनर मिळतात ती वापरा.

६.नेलपॉलिश लावताना आधी क्लिअर पॉलिश कोट द्या, मग नेलपेण्ट लावा.

७.नखांना फंगसचा त्रास असेल तर लवंडेर ऑइल असलेलं मॉइश्चरायझर लावा.

८. गरज नसेल त्याकाळात नखांना नेलपेण्ट लावू नका, सतत नेलपॉलिश लावलेली नखंही लवकर आजारी होतात.

९. हात नाजूक दिसायला हवे असतील तर नखांना गोल आकार द्या.

१०.चौकोनी नखांची फॅशन असली तरी त्या नखांत घाण जास्त अडकते त्यामुळे शक्यतो चौकोनी नखं नाहीत तर गोल नखंच ठेवणं उत्तम.

११. सगळ्यात महत्वाचं नखं चांगली रहावी म्हणून घरात कामच करायचं नाही असं काही नाही. भांडी घासताना फारतर ग्लोवज् घाला. 

 

Web Title: healthy nails are beautiful nails, how to make them healthy, nail art is not enough for nail health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.