त्वचारोग टाळण्यासाठी सगळ्यात सोपा आणि प्राथमिक उपाय म्हणजे स्वच्छता राखणे. चेहरा, त्वचा, पाय, हात, नखे सारेच अगदी स्वच्छ ठेवता आले पाहिजे. तरच त्वचा सुरक्षित आणि चांगली राहते. नखं साफ करणे म्हणजे फार कठीण काम नाही मात्र पायाची नखे साफ करणे जरा कठीण जाते. पावसाळ्यात तर चिखल, माती आणि घाण अडकून पार नखांचा रंगच बदलून जातो. माती जास्त झाली की ठणकाही लागतो. पण ती माती काढणे त्रासदायक आणि कठीण जाते. अशावेळी हे उपाय करा. नखात माती अडकल्यामुळे अनेक त्रास होऊ शकतात. दिवसभर चालणे, चप्पल किंवा बूट वापरणे, घाम आणि धूळ यामुळे नखांमध्ये अडकलेली घाण सहज निघत नाही. ही घाण साठून राहिल्याने दुर्गंधी, बुरशी किंवा नख तुटण्याची शक्यता असते. अडकलेली माती त्रासदायकही ठरु शकत. नखांमध्ये जमा झालेली घाण काढण्यासाठी नियमित स्वच्छतेची सवय गरजेची आहे.
१. आठवड्यातून दोन ते तीन वेळातरी पाय कोमट पाण्यात बुडवायचे. कोमट पाणी करुन त्यात थोडे मीठ टाकायचे. त्या पाण्यात पाय किमान दहा मिनिटे तरी भिजवायचे. हाताने चोळायचे. असे केल्याने पायाची नखे मऊ होतात आणि अडकलेली घाण सहज काढता येते.
२. नखे मोठी असतील तर घाण पटकन साचते. त्यामुळे नखं वेळोवेळी कापावीत. त्यात आळस करुन चालत नाही. नखात अडकलेली घाण काढताना धारदार वस्तू वापरू नये, कारण त्यामुळे जखम होऊ शकते. त्यामुळे पि तसेच पेन वापरुन टोचून घाण काढायचा प्रयत्न करु नका.
३. घरच्या घरी सोपा उपाय करता येतो.घरीच मस्त लिक्विड तयार करायचे. बादलीत कोमट पाणी घ्यायचे. त्या पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा. थोडा लिंबाचा रस आणि थोडे मीठ घालून व्यवस्थित ढवळायचे. या द्रावणात पाय दहा मिनिटे भिजवल्यावर नखांमधील घाण मऊ होऊन सहज सुटते. यामुळे नखांची चमकही टिकते आणि दुर्गंधी कमी होते. आठवड्यातून किमान दोन वेळा ही प्रक्रिया केल्यास पाय स्वच्छ राहतात. पाय स्वच्छ धुतल्यावर नेहमी कोरडे करून मगच सॉक्स किंवा बूट घालावेत. कारण ओलसरपणामुळे घाण आणि बुरशी नखांमध्ये जास्त तयार होते.