Join us

त्वचेवरील घाण आणि डोळ्यांवरील ताण दोन्ही कमी होईल, गुलाब पाणी वापरल्याने मिळतात कमालीचे फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2025 13:31 IST

health care tips, beauty tips, dirt on the skin and stress on the eyes will be reduced, rose water provides great benefits : गुलाब पाणी वापरल्याचे अनेक फायदे आहेत. पाहा कसे वापराल.

त्वचा, आरोग्य छान राहावे यासाठी अनेक पारंपरिक आणि नैसर्गिक असे उपाय आपण करतो. त्यापैकी एक म्हणजे गुलाब पाणी. अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्स असतात जी तयार करताना त्यात गुलाब पाण्याचा वापर केला जातो. ती आपल्याला आकर्षक वाटतात आणि आपण वापरतो. मात्र त्यात फक्त गुलाब पाणी नसून रसायनेही असतात. (health care tips, beauty tips, dirt on the skin and stress on the eyes will be reduced, rose water provides great benefits.)त्यामुळे गुलाब पाणीच थेट वापरणे जास्त फायद्याचे ठरते. गुलाबाच्या पाकळ्या वाफवल्या जातात. त्या प्रक्रियेतून तयार केलेले हे पाणी अनेक गुणांनी भरलेले असते. यात अँण्टी ऑक्सिडंट्स असतात जे त्वचेवरील मुक्त रॅडिकल्सची काळजी घेतात. अँण्टी बॅक्टेरियल गुणधर्मही असता त्यामुळे त्वचा सुरक्षित राहते. तसेच अँण्टी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे सूज, लालसरपणा आणि खाज कमी होते. शिवाय गुलाब पाण्याचा सुगंध मन प्रसन्न ठेवतो आणि मानसिक तणावावरही तो सकारात्मक परिणाम करतो.

गुलाब पाण्यामुळे त्वचा एकदम छान राहते. धूळ, प्रदूषण आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर अनेक परिणाम होतात. चेहरा खराब दिसतो. त्वचाछिद्र बंद होतात आणि मुरुमांचा त्रास वाढतो. अशा वेळी गुलाब पाणी टोनरप्रमाणे वापरल्यास त्वचेतील अतिरिक्त तेल कमी होते. छिद्र स्वच्छ राहतात आणि त्वचेचा पोत चांगला राहतो.  चेहर्‍यावर गुलाब पाणी कापसाने लावायचे त्यामुळे त्वरित थंडावा मिळतो. त्वचा कोमल होते. 

डोळ्यासाठी गुलाब पाणी औषधासारखे काम करते. आजकाल सतत मोबाइल, लॅपटॉप सारखी उपकरणे वापरली जातात. त्यामुळे डोळ्यांना फार त्रास होते. झोपताना गुलाब पाणी शिंपडलेला कापसाचा बोळा डोळ्यावर ठेवणे फार फायद्याचे ठरते. डोळ्यांना आराम मिळतो आणि ताण निघून जातो. 

केसांच्या आरोग्यासाठीही गुलाब पाणी तितकेच फायदेशीर आहे. टाळूवरील कोरडेपणा, खाज आणि कोंडा यावर नैसर्गिक उपाय ठरतो. गुलाब पाण्याने केस धुतल्यास किंवा तेलामध्ये मिसळून लावल्यास केसांना मऊपणा, चमक आणि सुगंध येतो. केसांच्या मुळांना पोषण मिळाल्यामुळे केस गळणे कमी होते आणि त्यांची वाढ चांगली होते. आरोग्यासाठी गुलाब पाणी वापरणे फायद्याचे ठरते. त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा गुलाब पाण्याचा बोळा चेहऱ्यावरुन नक्की फिरवा.   

टॅग्स :ब्यूटी टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यहोम रेमेडीत्वचेची काळजी