आजच्या व्यस्त आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे केस गळणे ही अत्यंत सामान्य समस्या झाली आहे. वाढते प्रदूषण, असंतुलित आहार, झोपेचा अभाव आणि मानसिक ताण या सर्व गोष्टी केसांच्या आरोग्यावर परिणाम करतात. (Hair loss? Not just pollution and water, but the lack of 'this' vitamin is the cause)काही प्रमाणात केस गळणे नैसर्गिक असले तरी दररोज मोठ्या प्रमाणात केस गळत असतील, तर त्यामागे शरीरातील पोषणतत्वांची कमतरता हे एक गंभीर कारण असू शकते.
केस गळण्याची अनेक कारणे असतात. चुकीचा आहार, हार्मोन्समधील असंतुलन, रक्तातील लोहाची कमतरता, वारंवार केमिकलयुक्त शाम्पूचा वापर, स्टायलिंग प्रोडक्ट्समुळे होणारा त्रास, तसेच प्रदूषित पाण्यामुळे होणारे नुकसान या सगळ्या गोष्टी केसांना कमकुवत करतात. महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते, तर पुरुषांमध्ये अनुवंशिक कारणे आणि हार्मोन्समुळे टक्कल पडण्याची शक्यता अधिक असते.
केसांच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वांची पातळी योग्य असणे अत्यावश्यक असते. विशेषतः जीवनसत्त्व डी, बायोटिन (B7), जीवनसत्त्व इ, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लोह या पोषक घटकांचा केसांच्या वाढीशी थेट संबंध असतो. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे केसांच्या मुळांमध्ये पेशी कमकुवत होतात आणि नवीन केसांची वाढ थांबते. बायोटिन म्हणजेच व्हिटॅमिन B7 केसांना बळकट करते आणि गळती रोखते. व्हिटॅमिन E केसांना बाह्य प्रदूषण आणि सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण देते. व्हिटॅमिन A टाळूतील नैसर्गिक तेलाचे संतुलन राखते, तर व्हिटॅमिन C कोलॅजन निर्मितीस मदत करून केसांना मऊ आणि मजबूत करते. लोह आणि झिंक या दोन्ही घटकांची कमतरता झाल्यास केस कमकुवत होऊन सहज गळतात.
या समस्येवर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे. सूर्यप्रकाश, दूध, मशरुममधून शरीराला जीवनसत्त्व डी मिळते. बदाम, शेंगदाणे, रताळे बायोटिनचे उत्तम स्रोत आहेत. अॅव्होकॅडो, सूर्यफूल बिया आणि ऑलिव्ह तेलातून व्हिटॅमिन इ मिळते, तर आवळा, संत्रे आणि पेरु हे जीवनसत्त्व सी साठी सर्वोत्तम फळे आहेत. लोहासाठी हिरव्या भाज्या, पालक, डाळी आणि बीन्स नियमित आहारात असाव्यात.
केस गळणे थांबवण्यासाठी योग्य आहारासोबत बाह्य काळजीही गरजेची आहे. केसांना नियमित तेल मालीश केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केसांना पोषण मिळते. गरम तेलाने हलक्या हाताने मालीश करणे, नैसर्गिक हर्बल शाम्पू वापरणे आणि जास्त केमिकलयुक्त उत्पादनांपासून दूर राहणे हे उपयुक्त ठरते. पुरेशी झोप, ताणमुक्त जीवनशैली आणि पाणी भरपूर पिणे हेही केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
Web Summary : Hair loss is common due to lifestyle, pollution, and stress. Vitamin deficiencies (D, B7, E, A, C), iron, and poor diet weaken hair. Balanced nutrition, oil massage, and stress management are essential for healthy hair.
Web Summary : जीवनशैली, प्रदूषण और तनाव के कारण बाल झड़ना आम है। विटामिन (डी, बी7, ई, ए, सी), आयरन की कमी और खराब आहार बालों को कमजोर करते हैं। स्वस्थ बालों के लिए संतुलित पोषण, तेल मालिश और तनाव प्रबंधन आवश्यक हैं।