Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > परफ्यूम-डिओचा फवारा मानेवर मारण्याची सवय घातक, डॉक्टर सांगतात-‘ही’ चूक तब्येतीला किती महागात पडतेय..

परफ्यूम-डिओचा फवारा मानेवर मारण्याची सवय घातक, डॉक्टर सांगतात-‘ही’ चूक तब्येतीला किती महागात पडतेय..

Is it bad to spray perfume on your neck : याच विषयावर फर्टिलिटी आणि न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. क्रिस्टाबेल अकिनोला यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये इशारा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:32 IST2026-01-22T10:37:41+5:302026-01-22T13:32:33+5:30

Is it bad to spray perfume on your neck : याच विषयावर फर्टिलिटी आणि न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. क्रिस्टाबेल अकिनोला यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये इशारा दिला आहे.

Habit of always spraying perfume on the neck is dangerous, doctor issue warning | परफ्यूम-डिओचा फवारा मानेवर मारण्याची सवय घातक, डॉक्टर सांगतात-‘ही’ चूक तब्येतीला किती महागात पडतेय..

परफ्यूम-डिओचा फवारा मानेवर मारण्याची सवय घातक, डॉक्टर सांगतात-‘ही’ चूक तब्येतीला किती महागात पडतेय..

Is it bad to spray perfume on your neck : शरीराची चांगला सुगंध यावा आणि घामाची दुर्गंधी येऊ नये यासाठी बरेच लोक रोज परफ्यूम किंवा डिओड्रंट वापरतात. या सुगंधित गोष्टींचा वापर करत असताना अनेक लोक थेट मान किंवा गळ्यावर स्प्रे करतात. जास्तीत जास्त लोकांना हीच सवय असते. पण अनेकांना हे माहीत नसतं की, ही सवय सामान्य असली तरी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. याच विषयावर फर्टिलिटी आणि न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. क्रिस्टाबेल अकिनोला यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये इशारा दिला आहे. त्यांच्या मते, मानेला परफ्यूम लावल्याने दीर्घकाळात हार्मोन्सशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. चला जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे.

मानेवर परफ्यूम लावणे का धोकादायक आहे?

डॉक्टरांच्या मते, मानेची त्वचा खूप पातळ, उबदार आणि संवेदनशील असते. येथे रक्तवाहिन्या जास्त असल्यामुळे या भागावर लावलेले केमिकल्स लवकर शरीरात शोषले जातात. याच भागाच्या खाली थायरॉइड ग्रंथी असते. थायरॉइड ग्रंथी शरीरातील अनेक महत्त्वाच्या क्रिया नियंत्रित करते. जसे की वजन, ऊर्जा पातळी, मूड, हृदयाची गती, मासिक पाळी, फर्टिलिटी आणि गर्भधारणेशी संबंधित प्रक्रिया. या ग्रंथीवर परिणाम झाला तर संपूर्ण शरीराचा समतोल बिघडू शकतो.

डॉ. क्रिस्टाबेल पुढे सांगतात की अनेक परफ्यूममध्ये Endocrine Disruptors नावाची रसायने असतात. रोज मानेवर परफ्यूम लावल्याने ही रसायने हळूहळू शरीरात साठू शकतात. यामुळे पुढील समस्या उद्भवू शकतात.

थायरॉइड डिस्फंक्शन

कारण नसताना वजन वाढणे किंवा घटणे

सतत थकवा जाणवणे

हार्मोनल असंतुलन

फर्टिलिटीशी संबंधित अडचणी

गर्भधारणेदरम्यान समस्या वाढणे

सुरक्षितपणे परफ्यूम कसा वापरावा?

डॉक्टरांनी परफ्यूम वापरण्याच्या काही सुरक्षित पद्धती सांगितल्या आहेत. परफ्यूम थेट त्वचेवर लावण्याऐवजी कपड्यांवर हलका स्प्रे करणे केव्हाही चांगले. टाळूवर न लावता केसांच्या खालच्या बाजूला किंवा टोकांवर परफ्यूम लावू शकता. जर त्वचेवर लावायचे असेल, तर मानेऐवजी शरीराच्या खालच्या भागावर (उदा. गुडघ्याच्या मागे) लावणे अधिक सुरक्षित आहे.


काखेत परफ्यूम लावणं महिलांसाठी अधिक धोक्याचं

काखेत परफ्यूम लावणं स्तनांच्या जवळ असल्यामुळे काही अभ्यासांनुसार याचा ब्रेस्ट टिश्यूवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, विशेषतः जर केमिकल्सचा संपर्क दीर्घकाळ राहिला तर. काखेजवळ लिम्फ नोड्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवतात. परफ्यूममधील केमिकल्स या ग्रंथींवर परिणाम करू शकतात, ज्यामुळे इम्युनिटी कमकुवत होण्याचा धोका वाढतो.

Web Title : गर्दन पर परफ्यूम स्प्रे करना हानिकारक, डॉक्टरों ने बताए परिणाम

Web Summary : गर्दन पर परफ्यूम का स्प्रे हार्मोन को बाधित कर सकता है क्योंकि रसायन रक्तप्रवाह में अवशोषित हो जाते हैं। विशेषज्ञ थायरॉइड समस्याओं, हार्मोनल असंतुलन और प्रजनन क्षमता की समस्याओं से बचने के लिए कपड़ों या निचले शरीर के अंगों पर स्प्रे करने की सलाह देते हैं। बगल पर परफ्यूम स्तन ऊतक और प्रतिरक्षा को प्रभावित कर सकता है।

Web Title : Spraying perfume on neck is harmful, doctors warn of consequences.

Web Summary : Spraying perfume on the neck can disrupt hormones due to chemicals absorbed into the bloodstream. Experts advise spraying on clothes or lower body parts to avoid thyroid issues, hormonal imbalance, and fertility problems. Perfume on armpits may affect breast tissue and immunity.