आजकाल लठ्ठपणा एक गंभीर समस्या बनली आहे. बेली फॅट आणि साइड फॅट आजकाल अनेकांची समस्या झाली आहे. बेली फॅट कमी करणं आणि साइड फॅट कमी करणं अवघड मानलं जातं. बेली फॅट शरीरातील अशी चरबी आहे जे पोटाच्या भागात जमा होते. तर साइड फॅट अशी चरबी आहे जी कंबरेच्या आजूबाजूला जमा होते.
अनेकदा बघण्यात येतं की, जेव्हा एखादी व्यक्ती वजन कमी करण्यास सुरूवात करते तेव्हा बेली आणि साइड फॅट क्वचितच कमी होतं. अनेक लोकांना तर अनेक महिने काहीच फरक दिसत नाही.
अशात इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध फिटनेस एक्सपर्ट सोनिया हुड्डाने तीन अशा एक्सरसाईज सांगितल्या आहेत. ज्याद्वारे बेली फॅट आणि साइड फॅट सहजपणे कमी करता येते. या तीन एक्सरसाईज बेली अप्पर, मिडल आणि लोअर अॅब्सना टार्गेट करते.
सोनियाने सांगितलं की, या एक्सरसाईज तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा करायच्या आहेत. प्रयत्न करा की, एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी एक्सरसाईज करा. एक्सपर्टने दावा केला आहे की, या एक्सरसाईजच्या माध्यमातून तुम्हाला नव्या वर्षाच्या आधीच बराच फरक दिसून येईल.
लेग रेज
ही एक्सरसाईज करण्यासाठी मॅटवर लेटून पाय एक-एक करून वर उचला, जेणेकरून पोटावर दबाव पडेल. हवं तर तुम्ही फ्लेटर किकही करू शकता. यात दोन्ही पाय वर उचलून एक एक करून डावी किंवा उजवीकडे घेऊन जायचे आहे. १५ वेळा ही प्रक्रिया करायची आहे.
बायसिकल क्रंचेस
यात मॅटवर लेटून हात डोक्याच्या मागे घ्या. आता दोन्ही पाय हवेत उचलून सायकलिंगसारखे चालवायचे आहेत. सोबतच पाठ थोडी वर उचलून पायांकडे न्यायची आहे. दोन्हीकडून कमीत कमी १५ रॅप करायचे आहेत.
हाप क्रंचेस
हाप क्रंचेस करण्यासाठी तुम्ही मॅटवर लेटून तोंड छताकडे करा. हात जोडून वरच्या भागात ठेवून पाठ अर्धी वर उचलायची आहे. याचे तीन सेट करा आणि प्रत्येक सेटमध्ये २० रॅप करा.