Skin Care Tips: धावपळच्या जीवनात त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगळा वेळ काढणं अनेकांसाठी अवघड होतं. ज्यामुळे त्वचेसंबंधी कितीतरी समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकजण तर कमी वयातच म्हातारे दिसू लागतात. ४० वय पार करताच त्वचेवर सुरकुत्या आणि म्हातारपणा दिसू लागतं. आपल्याला सुद्धा ही समस्या असेल आणि दूर करायची असेल तर एका खास तेलानं चेहऱ्याची मसाज करू शकता.
खोबऱ्याचं तेल केवळ केसांसाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर असतं. जर आपल्याला कोणतेही केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरायचे नसतील, साइड इफेक्ट्स होऊ द्यायचे नसतील तर खोबऱ्याचं तेल बेस्ट पर्याय ठरतो. रोज सकाळी ५ मिनिटं या तेलानं चेहऱ्याची मसाज कराल तर कमालीचा फरक दिसू शकतो. या तेलानं त्वचा हेल्दी आणि ग्लोईंग होते. इतकंचन नाही तर वाढत्या वयाची लक्षणंही कमी होतात.
त्वचा हायड्रेट राहते
सकाळी नेहमीप्रमाणे चेहरा चांगला साफ करा, त्यानंतर खोबऱ्याच्या तेलाचे ३ ते ४ थेंब हातावर घेऊन चेहऱ्याची चांगली मसाज करा. यामुळे त्वचा हायड्रेट राहतं. ज्यामुळे त्वचा सतेज दिसते.
काळे डाग आणि पिगमेंटेशन दूर होईल
जर आपणही चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिगमेंटेशननं चिंतेत असाल, तर खोबऱ्याचं तेल फायदेशीर ठरू शकतं. या तेलानं चेहऱ्याची मसाज केल्यास त्वचा आतून साफ होते. ज्यामुळे काळे डाग आणि पिगमेंटेशनही दूर होतं.
त्वचा टाइट होते
जर त्वचा सैल पडली असेल आणि टाइट करायची असेल तर खोबऱ्याचं तेलानं मसाज करायला हवी. नियमितपणे हा उपाय केल्यास त्वचेचा सैलपणा दूर होतो आणि त्वचा टाइट होते.
सुरकुत्या दूर होतील
जर कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू असतील तर खोबऱ्याचं तेल यात फायदेशीर ठरू शकतं. खोबऱ्याच्या तेलानं नियमितपणे चेहऱ्याची मसाज केली तर त्वचेवरील सुरकुत्या गायब होतील आणि आपण वाढत्या वयातही तरूण दिसू शकाल.