Lokmat Sakhi >Beauty > चेहेरा तुकतुकीत फ्रेश दिसायला हवा, आठवडाभर चेहेर्‍याला काहीच लावू नका; करा स्किन फास्टिंग!

चेहेरा तुकतुकीत फ्रेश दिसायला हवा, आठवडाभर चेहेर्‍याला काहीच लावू नका; करा स्किन फास्टिंग!

आपल्या त्वचेला काही काळ ‘फास्टिंग मोड’वर टाकण्याची गरज असते. सौंदर्य जगतात ‘स्किन फास्टिंग’ ही संकल्पना चांगलीच रुळलेली आहे. त्वचेला काही काळ उपवास घडवून चेहेर्‍यावर नैसर्गिक चमक आणण्याची ही पध्दत आहे. या स्किन फास्टिंगचे काही नियम आणि पथ्यं आहेत. ती पाळल्याशिवाय त्वचेसाठीचा हा उपवास फळत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 07:31 PM2021-09-21T19:31:20+5:302021-09-21T19:40:24+5:30

आपल्या त्वचेला काही काळ ‘फास्टिंग मोड’वर टाकण्याची गरज असते. सौंदर्य जगतात ‘स्किन फास्टिंग’ ही संकल्पना चांगलीच रुळलेली आहे. त्वचेला काही काळ उपवास घडवून चेहेर्‍यावर नैसर्गिक चमक आणण्याची ही पध्दत आहे. या स्किन फास्टिंगचे काही नियम आणि पथ्यं आहेत. ती पाळल्याशिवाय त्वचेसाठीचा हा उपवास फळत नाही.

The face should look fresh, don't put anything on the face for a week; Do skin fasting! | चेहेरा तुकतुकीत फ्रेश दिसायला हवा, आठवडाभर चेहेर्‍याला काहीच लावू नका; करा स्किन फास्टिंग!

चेहेरा तुकतुकीत फ्रेश दिसायला हवा, आठवडाभर चेहेर्‍याला काहीच लावू नका; करा स्किन फास्टिंग!

Highlightsसौंदर्य तज्ज्ञ म्हणतात की सतत सौंदर्य उत्पादनं वापरल्यामुळे त्वचा स्वत:ची सुरक्षा करण्याची क्षमता गमावते. स्किन फास्टिंग करायचं म्हणजे चेहेर्‍यावर आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे लावतो ते लावणं बंद करणं. जर त्वचेची काही समस्या असेल तर स्किन फास्टिंग करु नये.

चेहेर्‍यावर चमक येण्यासाठी, तो उजळण्यासाठी अमूक करा , तमूक लावा, पार्लरमधे जाऊन विशिष्ट प्रकारचं फेशिअल किंवा स्किन केअर क्लिनिकमधे जाऊन स्किन ट्रीटमेण्टपर्यत अनेक गोष्टी केल्या जातात. चेहेर्‍याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत क्रीम्स, लोशन्स, मॉश्चरायझर, टोनर , फेसपॅक असं काही ना काही लावत असतो. आपल्याला वाटतं एवढे सगळे उपाय केल्यानंतर आपली त्वचा छान निरोगी होईल. पण एवढ्या सगळ्या उपायांनी आपली त्वचा थकते असं सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसेल?

सौंदर्य तज्ज्ञ सांगतात की आपलं शरीर जसं काम, तणाव , विषारी घटक यामुळे थकतं, त्यातली ताकद जाते . शरीराला आपली नैसर्गिक ताकद मिळवण्यासाठी, वाढवण्यासाठी रोजच्या दिनचर्येच्या उलट गोष्टीची आवश्यकता असते. शरीराला ब्रेक हवा असतो. रोजच्या कामातून, ताणातून, खाण्यापिण्याच्या पदार्थातून. शरीरातील विषारी पदार्थ निघून जाण्यासाठी, थकलेल्या शरीरातील यंत्रणेला विश्रांती देण्यासाठी उपवास करतो तशाच उपवासाची गरज आपल्या त्वचेला देखील असते. आपल्या त्वचेला काही काळ ‘फास्टिंग मोड’वर टाकण्याची गरज असते. सौंदर्य जगतात ‘स्किन फास्टिंग’ ही संकल्पना चांगलीच रुळलेली आहे. त्वचेला काही काळ उपवास घडवून चेहेर्‍यावर नैसर्गिक चमक आणण्याची ही पध्दत आहे. या स्किन फास्टिंगचे काही नियम आणि पथ्यं आहेत. ती पाळल्याशिवाय त्वचेसाठीचा हा उपवास फळत नाही.

छायाचित्र- गुगल

स्किन फास्टिंग म्हणजे?

 स्किन फास्टिंग करायचं म्हणजे चेहेर्‍यावर आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे लावतो ते लावणं बंद करणं. हे पथ्यं किमान आठवडाभर तरी पाळायचं असतं. या स्किन फास्टिंगची सुरुवात रात्रीपासून करावी. झोपण्यापूर्वी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. चेहेरा रुमालानं टिपून घ्यावा. चेहेर्‍याला काहीही न लावता झोपून घ्यावं. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर चेहेरा कोमट पाण्यानं धुवावा. चेहेरा जर तेलकट होत असेल तर थोडा जास्त वेळ चेहेरा धुवावा. दिवसभर चेहेर्‍याला काहीही लावू नये.

छायाचित्र- गुगल

हे मात्र लक्षात ठेवा!

 स्किन फास्टिंग करताना काही गोष्टी मात्र लक्षात ठेवाव्या. जर त्वचेची काही समस्या असेल तर स्किन फास्टिंग करु नये. स्किन फास्टिंग दरम्यान पाणी भरपूर प्यावं. जर या काळात पाणी कमी पिलं गेलं तर त्वचा कोरडी, निस्तेज आणि खराब होते. एका आठवडयापेक्षा जास्त काळ स्किन फास्टिंग करु नये. त्वचेवर जर काही समस्येसाठी जर उपचार चालू असतील तर स्किन फास्टिंग करु नये. स्किन फास्टिंग दरम्यान काहीही न लावल्यामुळे चेहेरा कोरडा पडत असेल तर चेहेर्‍याला थोडं गुलाब पाणी लावावं.

छायाचित्र- गुगल

स्किन फास्टिंगनं होतं काय?

 सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात की सतत सौंदर्य उत्पादनं वापरल्यामुळे त्वचा स्वत:ची सुरक्षा करण्याची क्षमता गमावते. ही क्षमता त्वचेत परत येण्यासाठी स्किन फास्टिंग ही आवश्यक प्रक्रिया आहे. स्किन फास्टिंगमुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. या प्रक्रियेमुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते. त्वचेतील विषारी घटक बाहेर पडतात. त्वचा निरोगी होते. यासाठी स्किन फास्टिंग महत्त्वाचं आहे.

Web Title: The face should look fresh, don't put anything on the face for a week; Do skin fasting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.