आजकाल प्रत्येकालाच 'ग्लास स्किन' म्हणजेच आरशाप्रमाणे नितळ, चमकदार आणि मुलायम त्वचा हवी असते. यासाठी लोक महागडी उत्पादने वापरतात, पण जर तुम्ही योग्य 'नाईट स्किन केअर रुटीन' पाळले, तर घरी बसूनही तुम्ही त्वचेला निरोगी आणि तेजस्वी बनवू शकता. ज्याप्रमाणे शरीराला विश्रांतीसाठी रात्रीच्या झोपेची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आपल्या त्वचेची दुरुस्ती (Repairing) देखील रात्रीच होते. रात्री त्वचेची काळजी घेतल्यास त्वचेला ताजेतवाने आणि चमकदार बनवण्यासाठी मदत मिळते. (Do 3 things before going to bed at night, your face will glow)
चेहरा क्लींज करा
दिवसभर आपली त्वचा धूळ, प्रदूषण आणि मेकअपचा सामना करत असते. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करणे खूप आवश्यक आहे. आधी तेल-आधारित क्लीन्झर वापरा. यामुळे मेकअप, सनस्क्रीन आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल पूर्णपणे निघून जाते.
त्यानंतर तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार असलेल्या फेस वॉशने चेहरा स्वच्छ करा. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये राहिलेली घाण आणि अशुद्धी दूर होते. चेहरा स्वच्छ न केल्यास मुरुमं, ब्लॅकहेड्स आणि त्वचेची छिद्रे बंद होण्याची समस्या वाढू शकते.
टोनिंग
चांगल्या प्रतीचा, अल्कोहोल-मुक्त टोनर कापसाच्या बोळ्यावर घेऊन चेहऱ्याला लावा किंवा हाताने हळूवारपणे चेहऱ्यावर थापून घ्या. टोनरमुळे त्वचेतील हरवलेला ओलावा परत मिळतो आणि सौंदर्य उत्पादनांसाठी त्वचा तयार होते. टोनरनंतर कोरियन ब्युटी रुटीनमध्ये एसेंस वापरला जातो. हे खूप हलके असते आणि त्वचेला खोलवर हायड्रेट करते.
तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार सीरम निवडा (उदा. व्हिटॅमिन सी, नियासिनमाइड किंवा हायलुरोनिक ऍसिड). सीरमचे २-३ थेंब घ्या आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा आतून चमकदार आणि टवटवीत बनते.
डोळ्यांची काळजी कशी घ्याल?
रात्री झोपण्यापूर्वी बोटांच्या मदतीने डोळ्यांभोवतीच्या त्वचेला हलकेच आय क्रीम लावा. यामुळे रक्त परिसंचरण सुधारते आणि डोळ्यांखालील सूज कमी होते. चांगला, हलका मॉइश्चरायझर लावा. यामुळे सीरमचे फायदे त्वचेत टिकून राहतात आणि त्वचेतील ओलावा बंद होतो. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल किंवा तुम्हाला जास्त चमक हवी असेल, तर मॉइश्चरायझरऐवजी स्लीपिंग मास्क लावा. हा मास्क रात्रभर त्वचेला पोषण देतो आणि सकाळी तुम्हाला 'ग्लास स्किन'चा अनुभव मिळेल.