थंडीचे दिवस असो किंवा उन्हाचा प्रखर तडाखा दोन्ही काळात आपल्या त्वचेची, विशेषत: चेहऱ्याची, जास्त काळजी घेणे आवश्यक असते. कारण या ऋतूंमध्ये हवामानातील बदलामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. (Does your skin crack in winter? White spots on your face? 4 solutions, your skin will look beautiful and soft even in winter)परिणामी चेहरा कोरडा पडतो, फुटतो, ओठांजवळ झोंबते आणि काही वेळा त्वचेवर पांढरे डाग दिसू लागतात. हा त्रास केवळ सौंदर्याशीच नाही तर त्वचेच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे.
थंडीत वातावरण कोरडे असते. यावेळी आपल्या त्वचेतील तेलग्रंथी कमी प्रमाणात कार्य करतात, त्यामुळे त्वचा नाजूक आणि कोरडी पडते. उलट उन्हाळ्यात सूर्यकिरण आणि गरम वारे त्वचेतून ओलावा काढून टाकतात. अशा दोन्ही परिस्थितींमध्ये त्वचेचा नैसर्गिक तोल बिघडतो. याशिवाय पुरेसे पाणी न पिणे, वारंवार गरम पाण्याने चेहरा धुणे, जास्त केमिकलयुक्त साबण किंवा फेसवॉश वापरणे, आहारात फळे व भाज्या कमी घेणे ही कारणेदेखील त्वचा कोरडी होण्यास कारणीभूत ठरतात. या समस्येवर काही सोपे घरगुती उपाय प्रभावी ठरतात.
१. मध आणि मलईचा फेसपॅक: एक चमचाभर मध आणि एक चमचाभर ताजी साय मिसळून चेहर्यावर लावा. १५ मिनिटांनी धुवून टाका. हा पॅक त्वचेला खोलवर पोषण देतो आणि चेहरा मऊ व तजेलदार ठेवतो.
२. कोरफड: रात्री झोपण्यापूर्वी चेहर्यावर कोरफडीचा अर्क लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि झोंबणे थांबते. तो नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.
३. तूप किंवा खोबरेल तेल: ओठांजवळ फुटलेल्या जागी शुद्ध तूप किंवा खोबरेल तेल हलक्या हाताने लावा. त्यामुळे त्वचा मऊ राहते आणि डाग कमी होतात.
४. काकडी आणि मधाचा पॅक: काकडीचा रस व मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि पांढरे डाग कमी होतात.
तसेच, दररोज पुरेसे पाणी पिणे, फळे, सूप आणि हिरव्या भाज्या आहारात घेणे आवश्यक आहे. खूप गरम पाण्याने चेहरा धुवू नका. नेहमी कोमट पाणी वापरा. बाहेर पडताना सनस्क्रीन वापरल्यास त्वचा सूर्यकिरणांपासून सुरक्षित राहते.
Web Summary : Winter dryness causes skin issues. Use honey-cream, aloe vera, ghee, or cucumber-honey packs. Hydrate, eat well, avoid hot water, and use sunscreen for healthy skin.
Web Summary : सर्दियों में रूखापन त्वचा की समस्याएं पैदा करता है। शहद-क्रीम, एलोवेरा, घी या खीरा-शहद पैक का उपयोग करें। हाइड्रेटेड रहें, अच्छा खाएं, गर्म पानी से बचें और स्वस्थ त्वचा के लिए सनस्क्रीन का प्रयोग करें।