Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा टम्म फुगेल्या पुरीसारखा दिसतो ? झोपताना करा ३ गोष्टी, सकाळी चेहरा दिसेल फ्रेश

सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा टम्म फुगेल्या पुरीसारखा दिसतो ? झोपताना करा ३ गोष्टी, सकाळी चेहरा दिसेल फ्रेश

Does your face look puffy in the morning? Do these 3 things before sleeping, you will look fresh the next day : रात्री झोपताना घ्या काळजी. सकाळी चेहरा अजिबात फुगलेला दिसणार नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2026 09:00 IST2026-01-17T09:00:00+5:302026-01-17T09:00:02+5:30

Does your face look puffy in the morning? Do these 3 things before sleeping, you will look fresh the next day : रात्री झोपताना घ्या काळजी. सकाळी चेहरा अजिबात फुगलेला दिसणार नाही.

Does your face look puffy in the morning? Do these 3 things before sleeping, you will look fresh the next day | सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा टम्म फुगेल्या पुरीसारखा दिसतो ? झोपताना करा ३ गोष्टी, सकाळी चेहरा दिसेल फ्रेश

सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा टम्म फुगेल्या पुरीसारखा दिसतो ? झोपताना करा ३ गोष्टी, सकाळी चेहरा दिसेल फ्रेश

सकाळी उठून आरशात पाहिल्यावर चेहरा सुजलेला आणि डोळ्यांभोवती फुगवटा दिसतो. असा अनेकांना अनुभव येतो ही सूज केवळ थकवा किंवा झोपेअभावीच येते असे नाही, तर त्यामागे काही सवयी आणि शरीरातील बदल कारणीभूत असतात. त्यामुळे झोपताना चेहर्‍याला काय लावावे आणि कोणती काळजी घ्यावी, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. चेहर्‍याला सुज येण्यामागची कारणे वेगवेगळी असू शकतात. (Does your face look puffy in the morning? Do these 3 things before sleeping, you will look fresh the next day)रात्री जास्त मीठ खाल्ले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले तर शरीरात पाणी धरुन ठेवले जाते आणि त्याचा परिणाम सकाळी चेहऱ्यावर सूज म्हणून दिसतो. अपुरी झोप, उशिरापर्यंत जागरण, सतत स्क्रीन पाहणे यामुळेही डोळ्यांभोवती फुगवटा येतो. शरीरात पाणी कमी असल्यासही शरीर संरक्षणासाठी पाणी साठवून ठेवते, त्यामुळे सूज दिसू शकते. काही वेळा अ‍ॅलर्जी, सायनसचा त्रास किंवा हार्मोन्समधील बदल यामुळेही चेहरा फुगलेला दिसतो.

ही सूज टाळण्यासाठी झोपण्याआधी चेहर्‍याची योग्य काळजी घेणे उपयुक्त ठरते. सर्वात आधी चेहरा नीट स्वच्छ करणे गरजेचे आहे. मेकअप, धूळ आणि तेलकटपणा काढून नंतर लावलेले नैसर्गिक घटक प्रभावीपणे काम करतात. झोपताना चेहर्‍याला लावण्यासाठी कोरफड हा उत्तम पर्याय आहे. कोरफडीत थंडावा देणारे आणि सूज कमी करणारे गुणधर्म असतात. चेहर्‍यावर पातळ थर लावून हलक्या हाताने मसाज केल्यास त्वचा शांत होते आणि सकाळी फुगवटा कमी जाणवतो.

गुलाब पाणी देखील सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. गुलाब पाणी कापसाने चेहर्‍यावर लावून झोपल्यास त्वचा ताजीतवानी राहते आणि रक्ताभिसरण सुधारते. विशेषतः डोळ्यांभोवती हलकेच गुलाब पाणी लावल्यास सकाळी डोळ्यांची सूज कमी होते. कोरडी त्वचा असल्यास बदाम तेल किंवा नारळ तेलाचा अतिशय हलका थर लावता येतो. मात्र जास्त तेल लावू नये कारण जड तेलामुळे त्वचा फुगल्यासारखी दिसू शकते. हलक्या मसाजमुळे चेहर्‍यावर साठलेले पाणी आणि सूज कमी होण्यास मदत होते.

काकडीचा रस हा नैसर्गिक उपायही फायदेशीर ठरतो. काकडीचा थंडावा त्वचेवरील सूज कमी करतो. झोपण्याआधी काकडीचा रस चेहर्‍यावर लावून वाळू दिल्यास त्वचा सकाळी अधिक फ्रेश दिसते. फक्त चेहर्‍याला काय लावावे एवढेच नव्हे, तर झोपण्याची पद्धतही महत्त्वाची आहे. खूप सपाट उशीवर झोपल्यास चेहऱ्यावर पाणी साठते. थोडी उंच उशी वापरल्यास हा त्रास कमी होतो. झोपण्याआधी पाणी योग्य प्रमाणात पिणे, पण अगदी झोपण्याच्या आधी खूप पाणी पिणे टाळणेही उपयोगी ठरते. झोपायची वेळही महत्वाची असते. वेळेत झोपा. जास्त जागरण करु नका. 
 

Web Title : सुबह चेहरे की सूजन कम करें: ताजगी के लिए 3 उपाय आजमाएं।

Web Summary : सुबह चेहरे की सूजन कम करने के लिए सोने से पहले चेहरा धोएं, एलोवेरा या गुलाब जल लगाएं। सिर ऊंचा रखें, ठीक से हाइड्रेट करें और समय पर सोएं।

Web Title : Beat morning face puffiness: 3 bedtime tips for a fresh look.

Web Summary : Reduce morning face swelling by cleansing, applying aloe vera or rose water before bed. Elevate your head, hydrate properly, and sleep on time for a fresher look.